अँड मिस युनिव्हर्स इज इंडिया .... हरनाझ संधू बनली विश्वसुंदरी
वेब टीम चंदीगड : भारताची हरनाज संधू मिस युनिव्हर्स बनली असून तब्बल २१ वर्षांनंतर एका भारतीय सौंदर्यवतीला हा किताब मिळाला आहे.
लारा दत्ता 2000 साली मिस युनिव्हर्स बनली होती. तेव्हापासून भारत या विजेतेपदाची प्रतीक्षा होती.70 वी मिस युनिव्हर्स स्पर्धा 12 डिसेंबर रोजी इस्रायलमधल्या एलिट मध्ये झाली.तर बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौटेला मिस युनिव्हर्स स्पर्धेला जज करण्याची संधी मिळाली.ती भारतासाठी ज्युरी टीमचा भाग होती.
पराग्वे आणि दक्षिण आफ्रिकेच्या स्पर्धकांना मागे टाकत हरनाझने ही स्पर्धा जिंकली तिला अंतिंम फेरीत तिला तरुणीना सल्ला विचारण्यात आला त्याप्रश्नांचे तिने दिलेले उत्तर ऐकून तिला हा किताब देण्यात आला . आजच्या काळातील तरुणांवर असलेला सर्वात मोठा दबाव हा त्यांच्या आत्मविश्वासाशी निगडीत असून तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात हे जाणून घेणं गरजेचे आहे तेच तुम्हाला इतरांपेक्षा सुंदर बनवते . संपूर्ण जगामध्ये जे काही घडतंय त्यावर बोलणे खूप गरजेचे आहे. बाहेर पाडा स्वतः साठी भूमिका घ्या . कारण तुम्हीच स्वतःचे शिल्पकार आहात तुम्हीच तुमचा आवाज आहात . माझा स्वतःवर विश्वास आहे म्हणूनच आज मी इथे उभी आहे. या उत्तरानेच तिने सर्वांची माने जिंकली .
चंदीगडच्या हरनाज संधूने अलीकडेच ‘मिस दिवा मिस युनिव्हर्स इंडिया 2021’चा किताब जिंकला.तेव्हापासून तिने मिस युनिव्हर्स 2021 चा ताज जिंकण्यासाठी मेहनत करायला सुरुवात केली. 21 वर्षीय हरनाज व्यवसायाने मॉडेल आहे.तिचे सुरुवातीचे शिक्षण शिवालिक पब्लिक स्कूल, चंदीगड येथून झाले. चंदीगडमधून ग्रॅज्युएशन केल्यानंतर, सध्या ती मास्टर्सचे शिक्षण पूर्ण करत आहे.मॉडेलिंग करून आणि अनेक स्पर्धा जिंकूनही, तिने स्वतःला अभ्यासापासून दूर ठेवले नाही.
हरनाझचे संपूर्ण कुटुंब शेती आणि नोकरी करते.तिने 2017 मध्ये कॉलेजमध्ये एका शोमध्ये पहिला स्टेज परफॉर्मन्स दिला होता. त्यानंतर हा प्रवास सुरू झाला. हरनाझला घोडेस्वारी, पोहणे, अभिनय, नृत्य आणि प्रवासाची खूप आवड आहे.जर तीला वेळ असेल ती हे छंद पूर्ण करत वेळ घालवते. भविष्यात संधी मिळेल तेव्हा चित्रपटात काम करण्याचीही तिची इच्छा आहे.
0 Comments