शाळा सुरू झाल्या मुलांचीही लक्षणीय हजेरी

शाळा सुरू झाल्या मुलांचीही लक्षणीय हजेरी 

वेब टीम नगर : कोरोनामुळे शिक्षण व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला होता. अनेक दिवसांपासून ऑनलाईन सुरु असलेल्या शाळा अखेर ऑफलाईन द्वारे सुरु झाल्या आहेत.

नुकतेच राज्य शासनाने जाहीर केलेल्या तारखेनुसार राज्यातील शाळा सुरु झाल्या आहेत. यातच नगर जिल्ह्यातील पाहिली ते चौथीच्या चार हजार 582 शाळांमध्ये 2 लाख 10 हजार 640 विद्यार्थी दाखल झाले आहेत.

यात जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत 1 लाख 45 हजार तर शहरी भागातील शाळांमध्ये 65 हजार 477 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

गुरूवारी जिल्हा परिषदेच्या 4 हजार 61 शाळांमध्ये 1 लाख 45 हजार विद्यार्थी आलेले होते. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण हे 64.52 टक्के असून शहरी भागातील 521 शाळा सुरू झाल्या असून त्यात 65 हजार 477 विद्यार्थी शाळेत आले होते.

त्याचे प्रमाण हे 52.53 टक्के होते. दरम्यान जिल्ह्यात 1 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचे शालेय शिक्षण विभागाचे आदेश होते.मात्र, जिल्ह्यात जिल्हा परिषद पातळीवर 11 नोव्हेंबरपासून झेडपीच्या शाळा भरविण्यात येत होत्या.शासनाच्या परवानगीनंतर शहरी भागातील शाळा 1 डिसेंबरपासून सुरू झाल्या आहेत. यात सामाजिक अंतर राखून विद्यार्थ्यांना दिवसाआड शाळेत बोलविण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments