एसटी संपाबाबत शासनाची न्यायालयात अवमान याचिका दाखल

एसटी संपाबाबत शासनाची न्यायालयात अवमान याचिका दाखल 

३७६ एसटी कर्मचाऱ्यांना केले निलंबित   

वेब टीम मुंबई : एसटी महामंडळ राज्य शासनात विलीन करावे आणि एसटी कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ या मागण्यांसाठी राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला मात्र आजही एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा निघाला नाही. राज्य सरकारने काढलेला जीआरमधील तपशील कर्मचारी संघटनांनी अमान्य केला आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी संपाच्या भूमिकेवर ठाम राहणार असल्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे. आजही राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी संपाचे हत्यार उपसले. याविरोधात एसटी महामंडळाने मोठी कारवाई सुरू केली आहे.

  एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्यामुळे महामंडळाकडून कठोर कारवाईची भूमीका घेण्यात आली आहे. संपावर असलेल्या ३७६ एसटी कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाने निलंबित  केले आहे. यामध्ये राज्यातील ४५ आगारांतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

  एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. प्रवास करण्यासाठी प्रवाशांना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. मात्र खाजगी वाहनांकडून प्रवाशांची आर्थिक लूट सुरु आहे. त्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाविरोधात राज्य परिवहन महामंडळाकडून उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली होती. मात्र राज्यसरकारने जीआर सादर करूनही एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला नाही त्यामुळे ३७६ एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments