कोल्हापूरच्या व्यापाऱ्यास हनीट्रॅप मध्ये अडकवून सव्वातीन कोटींची लूट

कोल्हापूरच्या व्यापाऱ्यास हनीट्रॅप मध्ये अडकवून सव्वातीन कोटींची लूट

वेब टीम मुंबई : कोल्हापूरच्या साखर व्यापाऱ्यास हनी ट्रॅप मध्ये अडकून त्याच्याकडून सव्वातीन कोटींची खंडणी उकळण्याचा धक्कादायक प्रकार गुन्हे शाखेच्या कारवाईत उघडकीस आला आहे.  या प्रकरणी फॅशन डिझायनर महिलेसह दोन सराफांना अटक करण्यात आली आहे. रुकसाना ( वय 47,नाव बदलले आहे).  ,अनिल चौधरी वय 42 आणि मनिष वय 48 अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. रुकसानाही फॅशन डिझायनर आहे.

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूर येथील साखरेचे व्यापारी असलेले तक्रारदार व्यवसायानिमित्त 2016 मध्ये गोवा येथे गेले होते . तेथे आरोपी महिलेसोबत ओळख झाली पुढे ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. 

 2019 मध्ये संबंधित व्यावसायिक कामानिमित्त मुंबईत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबले  असताना  मैत्रिणी सोबत जेवणाचा आग्रह केला.  दोघेही त्यांच्या रुममध्ये पोहोचल्या गप्पा जेवण उरकल्यानंतर कागदपत्रे देण्याच्या बहाण्याने एक जण बाहेर लॉनमध्ये गेली आणि थोड्या वेळाने ती महिला परत आली.,  म्हणून ते दरवाजा उघडण्यासाठी दरवाजाकडे गेले.  संबंधित महिलेने तेथेच थांबवले पुढे काही समजण्याच्या आतच अचानक कपडे बदलून टॉवेल गुंडाळून बसलेल्या महिलेने धमकावत व्हिडिओ करण्यास सुरुवात केली.  पुढे हेच व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल करण्याची धमकी देत मार्च 2019 ते आत्ता पर्यंत 3 कोटी 26 लाख रुपये उकळले . पुढे आणखीन पैशांची मागणी झाल्याने तक्रारदार यांनी गुन्हे शाखेत तक्रार दिली.  त्यानुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे 18 नोव्हेंबर रोजी आरोपींनी आणखीन 17 लाखांची मागणी केली पैसे घेऊन अंधेरीतील एका कॉफीशॉपमध्ये बोलवले ठरल्याप्रमाणे व्यापारी पैसे घेऊन तेथे पोहोचताच शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली.

Post a Comment

0 Comments