हाय प्रोफाइल वेश्या व्यवसायावर छापा !

हाय प्रोफाइल वेश्या व्यवसायावर छापा !

वेब टीम नगर : पोलीस उपाधीक्षक  संदीप मिटके यांना अहमदनगर शहरातील वाणी नगर तसेच केडगाव मध्ये अंबिका नगर येथे हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात आहे बाबत खात्रीशिर बातमी मिळाली.त्यानुसार  तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीतील वाणी नगर, तसेच कोतवाली पोलिस स्टेशन हद्दीतील अंबिका नगर केडगाव परिसरात बनावट ग्राहक पाठवुन पंचासमक्ष छापा टाकुन तिन  पिडीत परप्रांतीय  महिलांची सुटका करण्यात आली आहे.

स.पो.नि.  समाधान सोळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी दीपक एकनाथ लांडगे वय 30,  सागर जाधव याआरोपी विरुध्द तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि . क्र  947/2021 स्त्रियांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 चे कलम 3,4,5,7,8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून एका पीडित परप्रांतीय ( बंगाली) महिलेची सुटका करण्यात आली.

पोलीस नाईक शाहिद शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी योगेश पोपट ओव्हाळ रा. माळीवाडा अहमदनगर याच्या विरुद्ध कोतवाली पोलिस स्टेशन येथे गुन्हा रजि . क्र799/2021 महिलांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 कलम 3,4,5,7,8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून

दोन  पीडित परप्रांतीय ( बंगाली) महिलेची सुटका करण्यात आलेली आहे. एकाच वेळी दोन ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकण्याची अहमदनगर जिल्ह्यातील पहिलीच वेळ आहे.

या दोन्ही कारवायांची वैशिष्ट्य म्हणजे उच्चभ्रू वस्तीमध्ये भाड्याने फ्लॅट घेऊन महिलांकडून हाय प्रोफाइल वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता.

अहमदनगर शहरामध्ये बऱ्याच काळानंतर या प्रकारची कारवाई करण्यात आलेली आहे या कारवाईमुळे अहमदनगर शहरातील अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

सदरची कारवाई  मनोज पाटील पोलीस अधीक्षक, डॉ. सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक  संदीप मिटके ,

पोनि. संपत शिंदे, पोनि.गडकरी स.पो.नि.  समाधान सोळंकी, स.फौ. राजेंद्र आरोळे ,पो.हे.का सुरेश औटी पो.कॉ. तरटे, अमोल शिरसाट, चेतन मोहिते, गौतम सातपुते,सचिन जाधव, शाहिद शेख, विष्णू भागवत, सुमित गवळी, दीपक रोहकले, म.पोकॉ.जयश्री सुद्रिक, म.पोकॉ .प्रियंका भिंगारदिवे आदींनी केली.

Post a Comment

0 Comments