सासुरवाडीत शिवीगाळ व मारहाण झाल्याने जावयाने गळफास घेऊन केली आत्महत्या

सासुरवाडीत शिवीगाळ व मारहाण झाल्याने जावयाने गळफास घेऊन केली आत्महत्या 

वेब टीम राहूरी : या प्रकरणी मृताच्या नातेवाईकाने दिलेल्या फिर्यादीवरून सासरकडच्या पाच जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील मृत अनिल बाळासाहेब धाकतोडे (२३, रा. गंगापूर,ता. राहुरी) यांची पत्नी लोणी येथे माहेरी गेली होती.

पत्नीला आणण्यासाठी अनिल हा सासरवाडीला गेला असता सासरच्या मंडळीने शिवीगाळ व मारहाण केली.अनिल हा माघारी आल्यानंतर त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. 

सुनिता बाळासाहेब धाकतोडे यांनी राहुरी पोलिसात फिर्याद दिल्याने सासरकडील पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी सासरच्या पाच लोकांना अटक करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments