नगरटूडे संक्षिप्त
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
नगरटुडे आता नव्या स्वरूपात
बातम्या आणि जाहिरातींसाठी
संपर्क : देवीप्रसाद अय्यंगार
मो : ९९६०४९०९७१
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
डिजीटल शिक्षणासाठी अडीच कोटींचा निधी : आ.लहू कानडे
वेब टीम श्रीरामपूर : आमदार लहू कानडे यांच्या स्थानिक विकास निधीतून मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांना डिजिटल शिक्षणासाठी अडीच कोटी निधी देण्यात आला असल्याची माहिती अशोक कानडे यांनी दिली.
मातुलठाण येथील शाळेत एलईएडी संचाचे उद्घाटन करताना बोलत होते. यावेळी ज्ञानेश्वर मुरकुटे, पंचायत समिती सदस्य अरुण नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे,ॲड. समीन बागवान, बाबासाहेब कोळसे, सतीश बोर्डे, उपसरपंच जयश्री बोर्डे, ग्रामसेविका साळवे, एकनाथ दरेकर, सुनील वाणी, सोमनाथ बोर्डे, संदीप गुलदगड, विजय वाणी,दीपक कणसे, महेंद्र बोर्डे, विलास बोर्डे, पंकज पाटील, साहेबराव बोर्डे, चंद्रभान वाणी, विकास बोर्डे, संजय थोरात, विलास बोर्डे, संजय कणसे, सतीश वाणी, दत्तू पवार,रामभाऊ चिंधे, कैलास गुलदगड, कैलास वाणी, श्रीकांत बोर्डे, शंकर बोर्डे, धनंजय बोर्डे, विलास दरेकर, किरण वाणी, मुख्याध्यापिका गाजघाट, दीपाली पंधारे, पंडित,साईनाथ वाणी, दिलीप क्षीरसागर, रावसाहेब क्षीरसागर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोरोनाच्या संकटात निधीची कमतरता असताना मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांत शिकणाऱ्या सर्वसामान्य विद्यार्थी हे स्पर्धेच्या युगात मागे राहता कामा नये, या भावनेतून हा निधी त्यांनी दिला.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
भरदिवसा महिलेच्या गळ्यातील गंठण धूमस्टाईल लांबवले
वेब टीम कोपरगाव : कोपरगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्यालयाच्या शिक्षिका संगीता गणेश देशमुख (रा. साईनगर) या सकाळीआपली दुचाकी लावत असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यानी सकाळी ९.२० वाजेच्या सुमारास ६० हजार रुपये किमतीचे सुमारे दीड तोळ्यांचे सोन्याचे गंठण पळवले.त्यामुळे शहरातील महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले. साईनगर या उपनगरातील फिर्यादी महिला संगीता देशमुख या कोपरगाव शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या कोपरगाव शहरातील डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्यालयात शिक्षिका आहेत.त्या नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकीवरून साईनगर येथील घरून निघाल्या व शाळेत पोहचल्या असताना त्यांनी आपली दुचाकी हि शाळेच्या आवारात लावण्यासाठी गाडी थांबवली असतानात्यांच्या मागावर असलेल्या दोन चोरट्यानी संधी साधत त्यांच्या गळ्यातील साठ हजार रुपये किंमतीच्या दीड तोळा सोन्याच्या गंठणावर डल्ला मारून आपल्या काळ्या रंगाच्या शाईन दुचाकीवरून पोबारा केला.त्यातील पाठीमागे बसलेल्या आरोपीने पांढऱ्या रंगाचा शर्ट, आकाशी रंगाची पॅन्ट व डोक्यावर निळ्या रंगाची टोपी घातलेली होती. त्यांनी या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
----------------------------------------------------------------------------------------------------------
जिल्ह्यात दोन ठिकाणी धाडसी दरोडा लहान मुलीच्या गळ्याला चाकू ….
वेब टीम श्रीरामपूर : तालुक्यातील बेलापूर येथे दोन ठिकाणी धाडसी दरोडा टाकून दरोडेखोरांनी रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे.श्रीरामपुर रोडवर असणाऱ्या गो शाळेलगत उदय खंडागळे यांचा बंगला आहे रात्री दिड वाजे दरम्यान चोरट्यांनी खंडागळे यांच्या बंगल्याचा मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश केला चोरट्यांनी खंडागळे यांच्या घरात असलेल्या लहान मुलीच्या गळ्याला चाकु लावला.त्यामुळे घरातील सर्व जण घाबरले त्यांनी शांत बसणे पसंत केले जवळपास दिड तास चोरट्यांनी घरात निवांतपणे उचका पाचक केली.
खंडागळे यांच्या घरातून जवळपास पंधरा ते वीस तोळे सोने व रोख रक्कमही चोरट्यांनी लांबविली. त्यांनंतर भगीरथ चिंतामणी यांच्या लोखंडी दरवाजाचे कुलुप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला त्यांच्या घरातुन ३५ हजार रुपये रोख चोरट्यांनी लांबविले भगीरथ चिंतामणी यांचा मुलगा सोमनाथ याने एका चोरट्याशी झटापट केलीत्यात चोरट्याने त्यांच्या पायावर लोखंडी राँडने मारहाण केली. सोमनाथनेही त्या चोरट्याला चांगलाच चोप दिला . अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे यांनी घटनास्थळी भेट दिली.पोलिस उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके पोलीस निरीक्षक संजय सानप ,पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायवट हवालदार अतुल लोटके उपस्थित होते.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'त्या' फाईव्ह जी मोबाईल टॉवरचे काम थांबण्यासाठी बुधवारी महापालिकेत सुनावणी
वेब टीम नगर : शहरातील धर्माधिकारी मळा येथील फाईव्ह जी मोबाईल टॉवरला स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला असताना बुधवार दि.29 सप्टेंबर रोजी महापालिकेत सहाय्यक संचालक नगर रचना यांच्या समोर सुनावणी होणार आहे.आरोग्याला घातक असलेल्या या मोबाईल टॉवरला विरोध दर्शविण्यासाठी स्थानिक नागरिकांनी महापालिकेत लेखी अर्ज करण्याचे आवाहन अॅड. कारभारी गवळी यांनी केले आहे.
फाईव्ह जी मोबाईल टॉवरच्या विद्युत चुंबकीय लहरीमुळे कर्करोग होण्याचा धोका असून, लहान मुलांच्या आरोग्यावर देखील त्याचे गंभीर परिणाम होतात.
नागरिकांची झोप उडते तर पशु-पक्ष्यांना देखील याचे गंभीर परिणाम भोगावे लागत असल्याने या टॉवरला स्थानिक नागरिकांचा आहे.तरी देखील हा टॉवर उभारला जात असल्याने नागरिकांनी पिपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने महापालिकेत तक्रार करुन प्रेमदान चौकात रास्तारोको आंदोलन केले होते.
तसेच या प्रकरणी लोकायुक्तांकडे तक्रार देखील करण्यात आली आहे. या पाठपुराव्याची दखल घेऊन मनपा प्रशासनाने या मोबाईल टॉवर संदर्भात सुनावणी ठेवली आहे.महापालिकेने लोकवस्तीमध्ये असलेल्या या फाईव्ह जी मोबाईल टॉवर उभारण्यास परवानगी देताना टेलिकम्युनिकेशनचे नियम व सर्वोच्च न्यायालयाचे निकाल पाहिले नाही.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे जाणून न घेता चुकीच्या पध्दतीने परवानगी दिली. बुधवारी होणार्या सुनावणीसाठी मोबाईल टॉवर कंपनी समित डिजीटल इन्फ्रा लिमिटेडचे प्रतिनिधी, जागा मालक प्रमिला विजय कानडे व पिपल्स हेल्पलाईनचे निमंत्रक अॅड. कारभारी गवळी यांना नोटीस बजाविण्यात आली आहे.
या सुनावणीसाठी अॅड. गवळी, अशोक सब्बन, या भागातील नागरिकांचे शिष्टमंडळ मोबाईल टॉवरला विरोध दर्शविण्यासाठी व म्हणणे मांडण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.मोबाईल कंपनीला देखील या बैठकित विद्युत चंबकीय लहरीचा प्रादुर्भाव किती अंतरापर्यंत राहणार असल्याचे स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
धक्का लागल्याच्या कारणावरून तलवारी दाखवून दहशत
वेब टीम कोल्हार : एका छोट्या मुलीला एका युवकाकडून धक्का लागल्याच्या शुल्लक कारणावरून एका गटाने हातात तलवारी तसेच लाकडी दांड्यांचा वापर करीत दहशत निर्माण केली.
हा धक्कादायक प्रकार कोल्हार बुद्रुक येथील अंबिकानगर वसाहतीमध्ये घडला आहे. यासंदर्भात परस्परांविरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, स्नेहल विनायक वाकचौरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, अमोल शंकर बर्डे याचा एका छोट्या मुलीला धक्का लागल्यावरून वाद झाला होता. तो समझोत्याने मिटला. मात्र याच वादाचा राग मनात धरून काल गुरुवार दि.२३ रोजी सकाळी येथील जब्बार एजाज खान, अफरोज असलम शेख, सलमान चांद खान, आबिद जमशेद सय्यद, शाहरुख चाँद शेख यांनी हातात तलवारी व लाकडी दांडे घेऊन घरासमोर येऊन शिवीगाळ करत धमकावले.
या फिर्यादीवरून लोणी पोलीस ठाण्यात वरील पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर सुलताना अस्लम शेख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, माझी १२ वर्षीय नात घरासमोर खेळत असताना अमोल शंकर बर्डे याने दारूच्या नशेत तिला धक्का दिल्याने ती रोडवर पडली.नीट चालता येत नाही का ? असे म्हणून मी निघून गेले. त्यानंतर रात्री ११वाजता अमोल बर्डेचा भाऊ कार्तिक शंकर बर्डे हा दारू पिऊन घरासमोर हातात कुर्हाड घेऊन आला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांनतर दुसऱ्या दिवशी अमोल शंकर बर्डे, कार्तिक शंकर बर्डे,विशाल भाऊसाहेब बर्डे, मुकुंद शिवाजी गांगुर्डे व इतर एक जण असे हातात लाठ्या – काठ्या, कुर्हाडी घेऊन घरासमोर आले. व आमच्या घरावर दगडफेक करू लागले. या फिर्यादीवरून वरील पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments