नगरटुडे संक्षिप्त
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
नगरटुडे आता नव्या स्वरूपात
बातम्या आणि जाहिरातींसाठी
संपर्क : देवीप्रसाद अय्यंगार
मो: ९९६०४९०९७१
थकबाकीदारांसाठी मनपाची खास सवलत
वेब टीम नगर : जर तुम्ही नगर शहरात राहत असाल आणि तुमच्याकडे पालिकेची थकबाकी असेल तर त्या मालमत्ताधारकांसाठी मनपाने खास सवलत जाहीर केली आहे.
ती म्हणजे अहमदनगर महानगरपालिका व जिल्हा न्यायालय विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानाने सन २०२० व २०२१ अखेर थकबाकीची व शास्तीपोटी ज्याची रक्कम वीस हजार पेक्षा जास्त थकीत आहे.अशा मालमत्ताधारकांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. तरी मालमत्ता कराच्या थकबाकीवर आकारण्यात आलेल्या शास्ती रकमेवर तडजोड करण्यासाठी दि.२५ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आले आहे.
तरी जिल्हा न्यायालय अहमदनगर येथे थकित मालमत्ताधारकांनी उपस्थित राहून ७५ टक्के शास्ती माफीचा फायदा घेऊन महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनी केले.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यासाठी चिंता वाढवणारी बातमी
अहमदनगर जिल्ह्यात कोरोनामुळे दोन दिवसात २२ जणांना जीव गमवावा लागला
वेब टीम नगर : रूग्णवाढीसोबतच मृत्यूचा आकडा देखील प्रतिदिन वाढतच आहे. जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी या दोन दिवसात २२ लोकांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले.
आतापर्यंतच्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोना मुळे तब्बल ६७५२ मृत्यू झाले आहेत. आज (सोमवारी) ५८५ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने बरे झालेल्यांची एकूण संख्या ३,२६,८८४ झाली आहे.
जिल्ह्यात आज ५८५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २६ हजार ८८४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.५० टक्के इतके झाले आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
जिल्ह्यातील बहुतांश धरणात आवक वाढली
वेब टीम नगर : नगर जिल्ह्यातील काही भागांमध्ये समाधानकारक पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे.
दरम्यान यातच जिल्ह्यासाठी एक दिलासादायक माहिती समोर येत आहे. नगर जिल्ह्याला वरदान ठरलेले भंडारदरा धरण 11039 दलघफू क्षमतेचे धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे.त्या पाठोपाठ आता येत्या दोन दिवसात निळवंडे धरणही आज 100 टक्के भरण्याची शक्यता आहे. सोमवारी सायंकाळी या धरणातील पाणीसाठा 8270 दलघफू (99.31) पाणीसाठा होता.गत आठवड्यात भंडारदरा पाणलोटात धो-धो पाऊस झाला. त्यामुळे हे धरण ओव्हरफ्लो झाले. त्यानंतर निळवंडेत जोरदार आवक होत होती. हे धरण 94 टक्के भरले.पण पाऊस सुरू असल्याने या धरणातील पाणीपातळी कायम ठेऊन निळवंडेतून प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. त्यानंतर पाऊस कमी झाला. भंडारदरातून विद्युत गृह क्रमांक एक मधून 816 क्युसेक व वाकीचा ओव्हरफ्लो 98 क्युसेक पाणी निळवंडेत जमा होत आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
बाळ बोठेच्या अडचणी वाढल्या
वेब टीम नगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे याच्याविरूद्ध आणखी एक दोषारोपपत्र पारनेर येथील न्यायालयात दाखल झाले आहे.
बाळ बोठेला अटक केल्यापासून पारनेर येथील कोठडीत ठेवण्यात आले आहे. तेथे न्यायालयीन कोठडीत असताना कोठडीत मोबाइल आढळून आला होता.
पारनेरच्या कोठडीत असताना मोबाइलचा वापर केल्याचा गुन्हा त्याच्यासह पंधरा जणांविरुद्ध दाखल असून त्याचा तपास पूर्ण होऊन दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पारनेरचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी दिली.
दरम्यान, बोठे विरुद्ध नगर शहरात खंडणी आणि विनयभंगाचेही गुन्हे दाखल असून त्याचा तपास अद्याप सुरूच आहे. बोठे याने वकिलाशी संपर्क करण्यासाठी त्या मोबाइलचा वापर केल्याचे आढळून आले.त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता त्याचा तपास पूर्ण करून या सर्व आरोपींविरुद्ध पारनेरच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पेट्रोल ,डिझेल आणखीन भडकण्याची शक्यता
वेब टीम मुंबई : आज म्हणजेच, 21 सप्टेंबर 2021 रोजी सलग सोळाव्या दिवशी स्थिर आहे. तेल कंपन्यांनी इंधनाच्या किमतींमध्ये कोणताही फेरबदल केलेला नाही. देशातील सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन ऑयल कॉर्पोरेशनने (IOCL) दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या किमती 101.19 रुपये आणि डिझेलचे दर 88.62 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत. तसेच देशातील प्रमुख महानगरांपैकी सर्वाधिक दर मुंबईत आहेत. मुंबईत पेट्रोलच्या किमती 107.26 रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किमती 96.19 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत.
काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या जीएसटी काउंसिलच्या बैठकीत पेट्रोल-डिझेल GST च्या कक्षेत आणण्याबाबत चर्चा झाली. परंतु, पेट्रोल-डिझेल GST कक्षेत आणण्याबाबत कोणताही निर्णय न झाल्यानं पुन्हा एकदा सर्वसामान्यांना धक्का बसला आहे. अशातच पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये घट होण्याऐवजी आणखी वाढ होऊ शकते. दरम्यान, देशात 5 सप्टेंबरनंतर इंधनाचे दर स्थिर आहेत.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
नगरटुडे आता नव्या स्वरूपात
बातम्या आणि जाहिरातींसाठी
संपर्क : देवीप्रसाद अय्यंगार
मो: ९९६०४९०९७१
0 Comments