नगर शहरास पावसाने झोडपले

 नगर शहरास पावसाने झोडपले

वेब टीम नगर : आज दुपारी एक वाजेच्या दरम्यान सुरू झालेल्या पावसाने नगर शहरास चांगलेच झोडपून काढले .या पावसाने नगरकरांची त्रेधा उडाली . सुमारे अर्धा ते पाऊणतास झालेल्या पावसाने शहरातील सखलभागात या पावसाने पाणी साठले त्यामुळे चितळे रस्ता ,तेलीखुंट ,लक्ष्मीकारंजा ,पटवर्धन चौक भागात पाणी साठले,शहरातील नाल्या ,गटारी साफसफाईचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याने  पाणी रस्त्या वरूनच वाहते झाल्याने चितळे रस्त्यावर बसलेल्या भाजी विक्रेत्यांची आवरा आवर करताना एकाच त्रेधा उडाली.

महानगर पालिकेच्या वतीने खोदाईचीही कामे पूर्ण झाली असून रस्ते नुसतेच बुजविण्यात आले आहेत .झालेल्या पावसाने माती वाहून गेल्याने या ठिकाणी खड्डे खोल होऊन त्यामध्ये पाणी साठले असल्याने अनेक वाहन चालकांची त्यातून वाट काढताना गोंधळ उडत होता .त्यामुळे मनपाच्या वतीने रस्त्यांची डागडुजी तातडीने करण्यात आली पाहिजे.अन्यथा पावसाळ्यात  दलदलीतूनच ये -जा करावी लागेल.आजच्या पावसाने नगर शहरातील  जन- जीवन काहीसे विस्कळीत झाले होते .रस्त्यावरील पाणी ओसरल्यावर ते पूर्ववत झाले.

Post a Comment

0 Comments