शारिरीक संबंधाचे चित्रीकरण करून समाजमाध्यमात पाठविल्या प्रकरणी गुन्हा दाखल
वेब टीम औंढा नागनाथ : तालुक्यातील जडगाव येथील ३४ वर्षीय विवाहित महिलेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून त्याचे व्हिडिओ शूटिंग करून सोशल मीडियाच्या माध्यमातून इतरांना पाठविल्या प्रकरणी औंढा पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जडगाव येथील राजरतन बगाटे याने विवाहित महिलेच्या मुलाला जिवे मारण्याची धमकी देत, तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. एवढेच नव्हे, तर तिला १२ मे रोजी अंजनवाडा शिवारातील जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्याचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियाच्या माध्यमातून इतरांना पाठविला. यामुळे महिलेने औंढा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने रात्री उशिरा आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी फरार असून, त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात सुद्धा अनैतिक संबंधास अडथळा ठरणाऱ्या व्यक्तीचा खून केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीस जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. आरोपीचे नाव विशाल प्रदीप तोरणे असे आहे. त्याचे पढेगाव (ता. श्रीरामपूर) येथील एका महिलेशी अनैतिक संबंध होते. या महिलेचा पती संबंधास अडथळा ठरत होता. त्यातूनच तोरणे याने त्याची हत्या केली . याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात सरकारी पक्षाच्या वतीने एप्रिल २०१८ मध्ये मयताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी तोरणे यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
0 Comments