अहमदनगर जिल्ह्याचे अंतरंग : अहमदनगर जिल्ह्यातील मराठा साम्राज्याची वाताहत

अहमदनगर जिल्ह्याचे अंतरंग :
अहमदनगर जिल्ह्यातील मराठा साम्राज्याची वाताहत

अहमदनगर जिल्ह्यामध्ये ब्रिटिशांनी सन १८०३ मध्ये फर्मान काढले की शिंदे यांच्या सर्व युरोपीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या सेवेतून निवृत्त व्हावे.  त्यांना मिळणारे सर्व प्रकारचे लाभ ब्रिटिशांकडून मिळत राहतील . परंतु १ नोव्हेंबर १८०३ पर्यंत जे  निवृत्त होणार नाही त्यांना आर्थिक लाभ ब्रिटिश संरक्षण मिळणार नाही ,अशा प्रकारचे पत्र ब्रिटिशांनी प्रस्तुत केले.  त्यामुळे शिंदे यांना अडचणी होऊ लागल्या शिंदे यांच्या सैनिकांची व्दिधा  मनस्थिती झाली त्याच वेळेला नेमका ८ ऑगस्ट रोजी जनरल वेलस्लीने अहमदनगर वर हल्ला केला. 

 त्या वेळेला काही गोरे अधिकारी होते . त्यांनी दगा  दिला स्वतः ब्रिटिश अधिकाऱ्याना जाऊन मिळाले व जाताना त्यांच्या हाताखालील सैनिकही घेऊन गेले.  त्यामुळे किल्ल्यातील अरबांचा प्रतिकार कमी झाला आणि ९ ऑगस्ट रोजी म्हणजे एक दिवसात नगर शहर वेलस्लीच्या हाती गेले.  त्यांनी नंतर आपला मोर्चा भुईकोट किल्ल्या  कडे वळविला किल्ला काही सहजासहजी मिळेल असे वाटेना, त्यावेळेला फितुरीचे शस्त्र वापरून ब्रिटिशांनी काही दिवसातच किल्ला आपल्या ताब्यात घेतला त्यासाठी त्यांनी भिंगारच्या रघुबाबा देशमुख याला चार हजार रुपये दिले. 

 किल्ल्यावर कोणत्या ठिकाणी मारा केला असता आपल्याला किल्ला मिळेल ही महत्त्वाची माहिती  मिळाली.  त्याच वेळेला नेमके किल्ल्यातील तोफखाने त्यावरील अधिकारी व सैनिक शत्रूला जाऊन मिळाले दोन दिवसात अहमदनगरचा भुईकोट किल्ला ब्रिटीशांच्या ताब्यात मिळाला.  त्यामुळे त्यांचा फार विपरीत परिणाम झाला.  भुईकोट किल्ला इतक्या लवकर ब्रिटीशांच्या ताब्यात जाईल असे मराठयांना वाटले नव्हते शिंदे यांच्या दक्षिण सरदार यांच्याशी असलेला संपर्क तुटला.  ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी त्याना  शिंदेंची  कुमक मिळणार नाही. हे त्यांना कळून चुकले नानाचे अनुयायी अहमदनगर भुईकोट किल्ल्याचे किल्लेदार मल्हारराव कुलकर्णी असे लहान मोठे अधिकारी आपआपल्या क्षेत्रात ब्रिटिशांच्या संरक्षणामुळे लुटालूट करायचे व जनतेला त्रास देण्याचे काम करीत होते . अशाप्रकारे इंग्रजांच्या वर्चस्वामुळे अहमदनगर शहर व किल्ला इ  सन  १८१८ पर्यंत संपूर्ण नगर जिल्हा इंग्रजांच्या अंमलाखाली आला.

अशाप्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्व व कर्तुत्वामुळे  सतराव्या शतकातील मराठी साम्राज्य उदय पावले, आणि अठराव्या शतकात पेशवे व त्यांचे सरदार यामुळे संपूर्ण हिंदुस्थानभर चमकले आणि शेवटी एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला इंग्रजांशी लढता लढता मराठा साम्राज्य लयाला गेले 

लेखक :  नारायण आव्हाड

९२७३८५८४५७ 

संदर्भ : मराठ्यांचा इतिहास 

संग्रहालय लायब्ररी अहमदनगर 

आवृत्ती २०२०

Post a Comment

0 Comments