जिल्हाधिकारी आणि आयुक्तांचा पगार बंद करा ,नंतर लॉकडाऊन करा. मनसेची मागणी

जिल्हाधिकारी आणि आयुक्तांचा पगार बंद  करा ,नंतर लॉकडाऊन करा. मनसेची मागणी

नितीन भुतारे : लॉकडाऊन लवकर उठवला नाहीतर व्यापाऱ्यांना बरोबर घेउन मनसे रस्त्यावर आंदोलन करणार... 

मनसेच्या नितीन भुतारे यांचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन

वेब टीम नगर :  जिल्ह्यात तसेच शहरात ज्या प्रकारे लॉकडाऊन राबविला जात आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिक छोटे मोठे व्यावसायिक वैतागले असून दोन महिने होत आले फक्त लॉकडाऊन कडक पध्दतीने राबविला जात आहे. लोकांच्या बँकांचे हप्ते थांबत नाही आहे, दररोजचा खर्च थांबत नाही. त्यात संपूर्ण कडक पद्धतीने लॉकडाऊन लावून सामान्य नागरिकांचा छळ प्रशासनाकडून सूरू आहे. कुठल्याही प्रकारची मदत राज्य सरकारने सर्वसामान्य नागरिकांना केली नाही. सर्वसामान्यांना बँक खात्यात पैसे जमा केले नाही सरकार चे अपयश झाकण्यासाठी लोकांवर कोरोना आजाराची जबाबदारी टाकून लॉकडाऊन वाढविण्याच्या घोषणा करत आहेत . 

 अहमदनगर जिल्ह्यात व शहरात दररोज एक एक आदेश जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त काढत आहेत त्यातून कडक निर्बंध लादले त्यातून आधीच सर्वसामान्य नागरिकांकडे पैसे नसतांना हजारो रूपये दंड करून लोकांचे खिसे रिकामे करण्याचे काम जिल्हा व महानगरपालिका प्रशासन करत आहेत. त्यामुळे आर्थिक कंबरडे मोडलेल्या लोकांना आधार देयाचे सोडुन त्यांच्यावर घाव घालण्याचे प्रकार प्रशासन करत आहे. जिल्हाधिकारी व आयुकत यांना शासनाचा पगार चालु असल्यामुळे सर्वसामान्य जनतेचे होणारे हाल समजत नाही त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा जसा आर्थिक पुरवठा आपण लॉकडाऊन लाऊन बंध केला तसाच जिल्हाधिकारी व आयुक्त तसेच यांच्या बरोबर असणारे सर्व अधिकारी यांचे पगार लॉकडाऊन काळात बंद  करावे. अशी मागणी मनसेच नितीन भुतारे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन देऊन केली केली आहे.

 तसेच लवकरात लवकर सर्व अहमदनगर जिल्हा व शहरांतील बाजारपेठा छोटे मोठे दुकाने उघडावित खुप दिवस झालेत लॉकडाऊन मुळे बंद  असलेला व्यापार पूर्वपदावर आणून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी विनंती देखील नितीन भुतारे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन देऊन केली आहे. रूग्णांची संख्या दिवसेदिवस कमी होत चालली आहे त्यामुळे कडक निर्बंध लावणे योग्य नाही.लवकरात लवकर लॉकडाऊन उठवला नाही तर मनसेच्या वतीने संपूर्ण जिल्हाभर व्यापारी छोटे मोठे व्यावसायिक यांना बरोबर घेउन रस्त्यावर आंदोलनं करू व या आंदोलनात व्यापाऱ्यांनी छोटे मोठे व्यावसायिक लोकांनी सुध्दा सामील व्हावे असे आवाहन मनसेच्या वतीने नितीन भुतारे यांनी केले आहे. आता पर्यंत जनतेने लॉकडाऊनला साथ दिली आहे. या पुढे कोरोना आजारांवरील नियम पाळण्याला साथ देतील लॉकडाऊन च्या निर्बंधांना सर्वसामान्य जनता साथ देणार नाही दंडात्मक चाललेली वसुली सुध्दा थांबणे गरजेचं आहे असे नितीन भुतारे म्हणाले. 

Post a Comment

0 Comments