नगर जिल्ह्यात कोरोनाचा कहर

 नगर जिल्ह्यात  कोरोनाचा कहर

आज ३०९७ बाधितांची नोंद, आवाज पर्यंतचा विक्रमी आकडा 

वेब टीम नगर : जिल्ह्यात कोरोनाचा कहर झाला असून कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच नगर शहरात बेड साठी रुग्णांच्या नातेवाइकांची वणवण सुरु असून भरीस भर म्हणून रेमडेसिवीर चा तुटवडा यानं रुग्णांच्या नातेवाईकांची पुसरेशी दमछाक होत असून कोरोना रुग्णांचा आकडाही खाली येत नाही. अशीच परिस्थिती राहिली तर परिस्थिती आणखीन गंभीर होणार आहे. 

आज जिल्ह्यात ३०९७ रुग्णांची भर पडली असून त्यात नगर शहरातील-६७५ ,राहता-३५२ ,संगमनेर-२६७,श्रीरामपूर-१६५,नगर ग्रामीण-१६९, नेवासे १३४. पाथर्डी १९५, अकोले-१४७, कोपरगाव-१७७, कर्जत- १९०, पारनेर-१३३, राहुरी-१०७,भिंगार शहर-४६,शेवगाव-११४,जामखेड-७९,श्रीगोंदे-१०७, मिलिट्री हॉस्पिटल-१०,जिल्ह्या बाहेरील रुग्ण संख्या- २७ व इतर राज्यातून आलेल्या बाधितांची संख्या-०३ इतकी आहे. 

जिल्हा प्रशासनाचे कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरु असून लवकरच हि संख्या आटोक्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.                 

Post a Comment

0 Comments