मला बदनाम करण्याचे माजी आ. कर्डिलेंचे षडयंत्र : ना. तनपुरे

मला बदनाम करण्याचे माजी आ. कर्डिलेंचे षडयंत्र : ना. तनपुरे 

वेब टीम राहुरी : शहरातील पत्रकार रोहिदास दातीर यांची हत्या दुर्दैवी ही घटना आहे. माजी आ.  शिवाजी कर्डिले हे  या घटनेचा राजकारणासाठी वापर करीत असून . त्यांच्याकडे असलेले पुरावे पोलिसांना द्यावेत, आणि तपासात   सहकार्य करावे . पुरावे लपवू नयेत . तो गुन्हा आहे, असे  आव्हान नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिले. 

राहुरी येथे पत्रकारांशी बोलताना मंत्री तनपुरे म्हणाले, "कर्डिले यांनी दातीर हत्या प्रकरणात माझ्यावर बेताल आरोप केले आहेत. मला बदनाम करण्याचे त्यांचे राजकीय षडयंत्र आहे. याप्रकरणी माझा दुरान्वयाने संबंध नाही.  माझे राजकारण विकासाच्या मुद्द्यावर असते. त्यांचे नाहक अडकविण्याचे असते. त्यांनी त्यांची मानसिकता बदलावी. त्यामुळेच त्यांचा पराभव झाला. ."

"दातीर यांच्याशी माझे चांगले संबंध होते. त्यांचा सोहम प्रॉपर्टीशी कोणताही वाद नव्हता. अठरा एकराचे पूर्वीचे मालक पठारे यांच्याशी त्यांचा वाद होता. तोही मिटला होता. दातीर यांनी तशी नोटरी केली आहे. तनपुरे शिक्षण संस्थेच्या जमीन खरेदीचा व्यवहार १९९२ साली झाला आहे. माझे मेव्हुणे सुशीलकुमार देशमुख सोहम प्रॉपर्टीत भागीदार आहेत. त्यांनी रितसर व्यवहार करून, त्यांचा भाचा व माझा मुलगा 'सोहम' याचे नाव प्रॉपर्टीला दिले. एवढाच आमचा या प्रॉपर्टीशी संबंध आहे."

राहुरी पालिकेचे अठरा एकरवरील आरक्षण कायम आहे. मागील वर्षी पालिकेने आरक्षण विकसित करावेत असा ठराव केला आहे. आरक्षण टाकून जमिनी घ्यायच्या. नंतर आरक्षण उठवायचे. हा कर्डिलेंचा आरोप बिनबुडाचा आहे. त्यांनी विकास कामांवर राजकारण करावे.असे तनपुरे यांनी सांगितले.

पोलीस त्यांचा तपास करतील. मुख्य आरोपी कान्हू मोरे लवकरच सापडेल. अशी खात्री आहे. त्याचे दातीर यांच्याशी काय वाद होते. याविषयी तपासात सर्व उलगडा होईल. आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, असेही मंत्री तनपुरे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments