असा होता बाळ बोठेचा हैद्राबाद ते नगरचा प्रवास

 असा होता बाळ बोठेचा हैद्राबाद ते नगरचा प्रवास 

  वेब टीम नगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याला अटक करण्यासाठी पोलिसांच्या ६ पथकांनी ५ दिवसांचे ऑपरेशन हैद्राबाद येथे राबवून शिताफीने बाळ बोठेला जेरबंद केले. या पाच दिवसात ३ वेळा बाळ बोठे पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरला होता. तरीही त्याला अटक करण्यात आली.या सर्व सिनेमा स्टाईल घडलेला तपशीलच पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत मांडला. 

सुरवातीला काही पथके हैद्राबादला रवाना केली त्या पथकांनी रेकी केल्यानंतर आरोपीचा सुगावा लागला. मात्र आरोपीचे बरेच मोठे नेटवर्क असल्याने आणि आरोपी बरोबर महिलाही असल्याने व त्यांना संरक्षण देणारी यंत्रणा देखील मोठी असल्याने,मग ताज्या दमाच्या पथकासोबत महिला अधिकारीही रवाना झाल्या. तिथे तपास कामात अडथळे येऊ नये म्हणून पोलिसांच्या गाड्यां ऐवजी तेथील स्थानिक वाहने वापरल्याने पोलीस बाळ बोठे पर्यंत सहजगत्या पोहोचू शकले. पहिल्यांदा बाळ बोठेला सहाय्य  करणारा वकील  व त्याचा एक साथीदार हाती लागल्या नंतर पोलिसांचे काम अधिक सोपे झाले. त्यांच्या कडून बाळ बोठेशी संपर्क होऊ शकला. एकदातर कमिश्नर ऑफ पोलीस च्या इमारतीत आत जाऊन बाळ बोठेने रजिस्टर मध्ये रीतसर नोंदणी केली आणि कोणालाही न भेटता खालच्या खालीच पसार झाला.पुढचे काही तास त्याचा कोणाशीच संपर्क नव्हता. त्यानंतर हैद्राबाद सी.आय.डी आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने विविध सी.सी.टी.व्ही फुटेजेस वरून तो हैद्राबाद मध्येच असल्याचा सुगावा लागला. त्यामुळे हे ऑपरेशन आणखीन एक दिवस पुढे ढकलले गेले. कमिश्नर कार्यालयात जाऊन नोंदणी करण्या मागचा हेतू असा होता कि आपण कायद्याला मदत करत आहोत, सुप्रीम कोर्टात जामिनासाठी अपील करत आहोत असा बनाव त्याने रचला. 

मुळात बोठे ज्या हॉटेल मध्ये राहायचा तेथे मोबाईल,टॅब, टायपिंग अश्या सगळ्या सोइ पुरवल्या जात होत्या.चौथ्या दिवशी बाळने रात्री ११ लाच फोन स्विच ऑफ केल्यामुळे चार दिवसांचे ऑपरेशन पाचव्या दिवसावर गेले. त्यानंतर पोलिसांनी ५ हॉटेलांवर छापे टाकले आणि शेवटी सहाव्या हॉटेल मध्ये बाहेरून कुलूप असलेल्या खोलीत बोठे सापडला. खोलीचा दरवाजा तोडून पोलीस जेव्हा आत शिरले यावेळी कोणत्याही प्रकारचा प्रतिकार न करता बाळ स्थब्द उभा होता . त्याला पकडल्यानंतर त्याच्याकडे एक सुसाईड नोट सापडली ज्यात माझा अपघाती मृत्यू झाल्यास खालील लोकांना संपर्क करावा त्यात त्यांनी कुटुंबियांचे नावे व नंबर लिहिलेले होते. 

पोलिसांनी हे ऑपरेशन राबवितांना ३ खासगी गाड्या वापरल्या त्यात स्कॉर्पिओ, क्रेटा आणि फॉर्च्युनर या गाड्यांचा समावेश होता. हेदराबाद ते नगर चा प्रवास करतांना सुरक्षित प्रवास व्हावा यासाठी बाळला फॉर्चुनरच्या सर्वात मागच्या सीटवर बसविण्यात आले. सुरवातीला बाळने आपल्याला हैद्राबाद मध्येच कोर्टात हजार करावं या साठी प्रयत्न केले त्यासाठी त्याने मला छातीत दुखतंय, मला घाम येतोय, असली कारणं देण्यास सुरवात केल्यानंतर पोलिसांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार त्याला महाराष्ट्राच्या सिमेत आणण्यास प्राधान्य दिलं. तरीही बाळ सातत्त्याने आरोग्याच्या तक्रारी करू लागल्याने त्याला सोलापूर हायवेवरील आकाश मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये थांबवून त्याचा इ.सी.जी वैगेरे काढून त्याच्या तपासण्या करण्यात आल्या व पुन्हा नगर  चा प्रवास सुरु झाला. मात्र २४ तासात पारनेर पर्यंत येणे शक्य नसल्याने रात्री ११:३० वाजता जामखेड मध्ये न्यायालयात हजर करून तेथून त्याचा ट्रॅझिट रिमांड घेण्यात आला. आणि मग दुसऱ्या दिवशी त्याला पारनेर पोलीस स्टेशन मध्ये हजार करण्यात आले. या संबंध प्रवासात आरोपीला तक्रार करण्याचा कुठलाही वाव देण्यात आला नाही जेणे करून पुढे न्याय प्रक्रियेत आरोपीला त्याचा फायदा मिळू नये आणि तसेच समाज मध्ये कुठलाही चुकीचा संदेश जाऊ नये याची सर्व काळजी पोलीस प्रशासनाने घेतली पारनेर मध्ये देखील त्याला एका मोकळ्या बराकीत आत्मघाती कोणतीही वस्तू मिळणार नाही याची काळजीने घेऊन तसेच तो सी.सी.टी.व्ही च्या देखरेखी खाली राहील यावर कटाक्षाने लक्ष देण्यात आले.बाळ बोठेला यापुढील काळात कुठलीही "व्ही आय पी " ट्रीटमेंट दिली जाणार नाही तसेच आरोपीही तक्रारी साठी वाव राहणार नाही.याची पोलीस प्रशासन दक्षता घेणार असल्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले. 

यावेळी या ऑपरेशन मध्ये सहभागी झालेल्या एकूण ६ टीम मधील ५ नगर जिल्ह्याच्या तर १ सोलापूरची टीम होती. पैकी जामखेडचे पोलीस निरीक्षक  संभाजी गायकवाड,कर्जतचे यादव, ए पी आय सानप,पोलीस निरीक्षक श्रीमती गडकरी,मिथुन घुगे,पीएसआय दिवटे, पीएसआय समाधान सोळंखे हेड कॉन्स्टेबल रवींद्रत पांडे ,पोना रविकिरण सोनटक्के , दीपक शिंदे , राहुल गुंडू, अभिजित तात्काळ , जयश्री फुंदे , संतोष लोंढे , गणेश धुमाळ , भूजंग बडे, आदींचा समावेश होता त्यांचा पोलीस अधीक्षकांच्या वतीने पुष्प गुच्छ व सर्टिफिकेट देऊन सत्कार करण्यात आला.                                  

Post a Comment

0 Comments