संधी रोजगाराची

 संधी रोजगाराची 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सेंट्रल रेल्वे रिक्रुटमेंट- 2021 द्वारे मेगाभरती 

मुंबई पुणे भुसावळ नागपूर आणि सोलापूर मध्ये रेल्वे अप्रेंटिस पदासाठी ही भरती आयोजित केली आहे अर्ज करण्याची मुदत ५ मार्च २०२१ असणार आहे.  मध्य रेल्वेच्या या पाच ठिकाणी एकूण दोन हजार 532 जागा भरण्यात येणार असून याशिवाय परळच्या वर्कशॉप मध्ये कल्याण आणि मनमाडच्या वर्कशॉप मध्ये विविध जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.  मध्य रेल्वेच्या मुंबई पुणे भुसावळ नागपूर आणि सोलापूर मध्ये जवळपास २५००जागांवर भरती होणार आहे.  यासाठी जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली आहे . यासाठी अर्ज मागविण्यात आले आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख, शिक्षणाची अट, लिंक आदी  माहिती पुढे देण्यात आली आहे. .

मध्य रेल्वेने अप्रेंटिस पदासाठी भरती आयोजित केली आहे अर्ज करण्याची शेवटची मुदत ही 5 मार्च २०२१असणार आहे मध्य रेल्वेच्या पाच ठिकाणी एकूण पाच हजार ५३२ जागा भरण्यात येणार आहेत . 

कुठे किती जागा

 मुंबई कॅरेज अँड ड्रॅगन कोचींग वाडीबंदर- २८८ जागा, मुंबई कल्याण डिझेल शेड- ५३ जागा ,कुर्ला  डिझेल शेड साठी  एस आर डी टी आर एस कल्याण- १७९ जागा, एस आर डी- १९२ जागा , वर्कशॉप -४१८ जागा, माटुंगा वर्कशॉप ५४७ जागा,एसटी  वर्कशॉप  भायखळा -६० जागा, भुसावळ डेपो -१२२ जागा, इलेक्ट्रिक लोको शेड भुसावल -८०  जागा, इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह कार्यशाळा -११८जागा ,मनमाड कार्यशाळा -५१ जागा, पी एम डब्ल्यू नाशिक रोड- ४९ जागा, पुणे कॅरेज डेपो -३१ जागा, डिझेल लोको शेड -१२१ जागा ,नागपूर इलेक्ट्रिक लोको शेड -४८ जागा ,अजनी कॅरेज वजन डेपो -६६ जागा, सोलापूर डेपो -५८ जागा कुर्डूवाडी कार्यशाळा -२१ जागा . 

शिक्षणाची अट - या पदासाठी शिक्षणाची अट ही दहावी पास किंवा बारावी पास अशी ठेवण्यात आली आहे त्यासाठी ५०% कमीत कमी गुण लागणार आहेत . वोकेशनल आयटीआय किंवा समकक्ष कोर्स केल्याचे प्रमाणपत्र देखील लागणार आहे.  वयाची अट १८ ते २४ वर्षे शुल्क उमेदवारासाठी अर्ज शुल्क १०० रुपये ठेवण्यात आले आहे. 

 निवड कशी केली जाईल- दहावी किंवा बारावीचे मार्क आयटीआय मधील मार्क पकडून मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे . यानंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी www .rrccr .com यासंकेतस्थळावर पहा . --------------------------------------------------------------------------------------------------------------------------                                                                                                                   

भारतीय टपाल खात्यात ड्रॉयव्हर भरती 

भारतीय टपाल खात्यात दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.  याबाबत टपाल खात्याने एक  नोटिफिकेशन जारी करत माहिती दिली आहे की दहावी उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येणार असून  ड्रायव्हर पदासाठी ही भरती  आहे. 

भारतीय टपाल खात्याच्या नोटिफिकेशन नुसार  ड्रायव्हर पदासाठी भरती केली जाणार आहे.  यापैकी ४जागा ओबीसी आणि प्रत्येकी १ पद आणि एसटी उमेदवारांसाठी राखीव आहे . या पदासाठी शैक्षणिक पात्रता १० वी ठेवण्यात आली आहे तसेच संबंधित उमेदवाराकडे वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक आहे. उमेदवारांची वाहन चालविण्याची चाचणी घेण्यात येईल .  या पदासाठी किमान वयोमर्यादा १८ वर्षे आणि कमाल वयोमर्यादा २७ वर्षे निश्चित करण्यात आली आहे उमेदवारांना ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे अर्ज करण्याची करता येणार आहे.  तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख १० मार्च२०२१ निश्चित करण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी indiapost.gov.in या संकेत स्थळावर जाऊन अर्ज करता येईल .  


Post a Comment

0 Comments