योगसाधना
मकरासन
घेरण्ड संहितेच्या दुसऱ्या अध्यायातील चाळीसाव्या श्लोकात या आसनाचे पुढीलप्रमाणे वर्णन केले आहे तोंड जमिनीकडे करून झोपा छाती जमिनीला लागून असू द्या आणि पाय लांब करा हातांनी डोके पकडा हे मकरासन असून यामुळे शरीराची उष्णता वाढते शलभासनाचाच हा एक प्रकार आहे .
पद्धती :
१) जमिनीवर सरळ पालथे झोपा चेहरा जमिनीकडे असू द्या. हात पाठीमागे लांबवा.
२) श्वास सोडा आणि एकाच वेळी डोके, छाती व पाय जमिनीवऋण जास्तीत जास्त वर उचला.हात आणि बरगड्या जमिनीवर टेकलेले असता कामा नयेत शरीराचा फक्त पोटाचा भाग जमिनीला टेकले ला असेल आणि शरीराचा भार त्याच भागावर असेल.
३) कमरेचा भाग आकुंचित करा आणि मांडीच्या स्नायूंना ताण द्या दोन्ही पूर्णपणे ताणलेले आणि सरळ ठेवा मांड्या ,गुडघे आणि घोटे एकमेकांशी जुळलेले असू द्या.
४) शरीराचा भार हातावर घेऊ नका पाठीच्या वरच्या भागातील स्नायुंना व्यायाम घडावा या साठी हात मागच्या दिशेला पूर्णपणे राहू द्या.
५) नेहमीप्रमाणे श्वसन करत शक्य तितका अधिक वेळ या स्थितीत राहावे .
६) प्रारंभी छाती आणि पाय जमिनीवरून उचलून धरणे कठीण जाते . परंतु पोटाचे स्नायू सशक्त होत जातील तसतसे ते सोपे बनते.
0 Comments