नगर बुलेटीन - 21-02-2021

 नगर बुलेटीन - 21-02-2021

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

नगर मनपा विजयासाठी आत्तापासूनच कंबर कसणार 

किरण काळे : पंजाब मनपा निवडणुकीतील घवघवीत विजयाबद्दल काँग्रेसचा  साजरा

वेब टीम नगर : नुकत्याच पंजाबमध्ये पार पडलेल्या सात मनपाच्या निवडणुकीमध्ये सहा ठिकाणी काँग्रेसला निर्विवाद सत्ता मिळाली. मोगा मनपामध्ये काँग्रेसने सर्वाधिक जागा मिळवत मोठा पक्ष म्हणून स्थान मिळवले. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन सुरू असताना पार पडलेल्या या निवडणुकांत मतदारांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपला जोरदार चपराक दिली आहे. काँग्रेसला मिळालेल्या घवघवीत विजयाबद्दल नगर शहरातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. 

शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे म्हणाले की, काँग्रेस पक्षच देशाला पुन्हा एकदा गतवैभव मिळवून देऊ शकतो. भाजपच्या जुलमी राजवटीला पूर्णतः नाकारण्याचे काम पंजाब मधील जनतेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये करत काँग्रेसला आपली पसंती दिली आहे. 

नगर शहरामध्ये देखील भाजप प्रणित अभद्र युतीची महापालिकेमध्ये सत्ता आहे. शहराची दैनावस्था झाली आहे. अशावेळी सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करत असतानाच आगामी मनपाच्या निवडणुकीसाठी जनतेला अपेक्षित असणारा शहराचा विकास घडविण्यासाठी काँग्रेसच्या विजयाची गुढी उभारण्यासाठी कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच कंबर कसून कामाला लागावे असे, आवाहन काळे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले आहे.

माळीवाडा परिसरामध्ये शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकमेकांना गुलाल लावत पेढे भरविले. तसेच यावेळी नागरिकांना देखील पेढ्यांचे वाटप करीत विजयाचा आनंद कार्यकर्त्यांनी साजरा केला. 

यावेळी काळे यांच्यासह ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, निजाम जहागीरदार, अनिस चुडीवाल, डॉ.मनोज लोंढे, प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, प्रा.डॉ.बाळासाहेब पवार, प्रवीण गीते, अन्वर सय्यद, मुबीन शेख, सुजित जगताप, निखिल गलांडे, नलिनी गायकवाड, कौसर खान, नीता बर्वे, सुनिता बागडे, उषा भगत, जरीना पठाण, ऋतिक शिरवाळे, कॅ.रिजवान शेख, गणेश आपरे, मोहनराव वाखुरे, ॲड.सुरेश सोरटे, अजय मिसाळ, शंकर आव्हाड, फहिम इनामदार ऋषिकेश चितळकर, वैभव कांबळे, शिवम करांडे, अनविश गुंड, तन्मय सांगळे, ओम जगताप, तन्मय गुंड, संकेत गवळी,अमित गुंड आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शिवाजी महाराजांनी पुन्हा जन्म घेतला तरच महिलांवरील अत्याचार थांबतील 

अंजली वल्लाकटी : भाजपा महिला आघाडीच्या वतीने उत्साहात शिवजयंती साजरी

वेब टीम  नगर : छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकरी व जनतेसाठी संघर्ष करत रयतेचे राज्य उभारले. महिलांवर अत्याचार करणाऱ्याचे राजे हात पाय तोडत चौरंग करत. त्यामुळे स्वराज्यात महिला सुरक्षित होत्या. आताच्या काळात नराधमांना कोणाचाच धाक नसल्याने महिलांवरील अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. शिवाजीराजांनी पुन्हा जन्म घेतला तरच महिलांवरील अत्याचार थांबतील. भारतीय जनता पार्टीच्या वतीने महिलांवरील अत्याचारा विरोधात सतत वाचा फोडली जात आहे. तसेच विविध उपक्रमही राबवले जात आहेत, असे प्रतिपादन शहर भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा व शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या पहिलवान अंजली वल्लाकटी यांनी केले.

          शहर भाजप महिला आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त अभिवादन व रथसप्तमी निमित्त हळदी कुंकूवाच्या कार्यक्रमाचे आयोजन शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा अंजली वल्लाकटी यांनी केले होते. बालिकाश्रम रोड वरील कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात उपस्थित सर्व महिला पदाधिकारी भगव्या साड्या परिधान करत उत्साहात सहभागी झाल्या होत्या. आकर्षक सजावट केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास सर्वांनी विधिवत औक्षण करून अभिवादन केले. हळदी कुंकूवा निमित्त सर्व महिलांना कापडी मास्कचे वाटप करण्यात आले.

          यावेळी महिला आघाडीच्या प्रदेश सचिव सुरेखा विद्दे, जेष्ठ कार्यकर्त्या प्रिया जानवे, सविता तागडे, नगरसेविका सोनाली चितळे, समता दमाणी, कांचन डोंगरे, ज्योती दांडगे, योगिता देवकर आदींसह महिला उपस्थित होत्या.

          यावेळी सुरेखा विद्दे म्हणाल्या, भारतीय जनता पार्टीचे काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर होत आहे. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती असल्याने महिला सुरक्षित होत्या. अंजली वल्लाकटी यांनी अल्पावधीतच सर्वाना बरोबर घेत चांगले काम करत महिलांचे संघटन उभे केले आहे.

          कार्यक्रमास आशा आडकीत्ते, शिल्पा जावळे, ममता सपकाळे, अनघा काळे, वैशाली सुरोशी, वसुंधरा कुलकर्णी, सुवर्णा शिंदे, वैष्णवी औटी, मनाली दांडगे, सुनिता आडेप, सुजाता औटी, नम्रता सग्गम, सुनिता सामल, रेखा वामन, स्वाती पवळे, क्रांती जहागीरदार, संध्या बोधले, रोहिणी कुलकर्णी आदी उपस्थित होत्या.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

गुणे शास्त्री यांचे विचार,संशोधन , उपचार सर्वांना मार्गदर्शक

आ.अरुण जगताप : ७० व्या पुण्यतिथीनिमित्त गुणे शास्त्रींना अभिवादन

    वेब टीम नगर : वैद्य पंचानन गुणेशास्त्री यांनी प्रतिकुल परिस्थितीत गुणे आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय उभे करुन सर्वसामान्य रुग्णांना दर्जेदार आयुर्वेदीक उपचार सुरु केले. त्यामुळे हे रुग्णालय सर्वसामान्यांसाठी वरदानच ठरले आहे. स्व.गुणे शास्त्रींना जाऊन ७० वर्षे झाली तरी त्यांचे विचार, संशोधन, उपचार पद्धती कायम सर्वांना मार्गदर्शक ठरतील. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे काम आम्ही सर्वजण करत आहोत, असे प्रतिपादन आ.अरुण जगताप यांनी केले.

      कै.वै.पंचानन गंगाधर गुणे शास्त्री यांच्या ७० व्या पुण्यतिथीनिमित्त गुणे आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयातील त्यांच्या समाधीला संस्थेचे अध्यक्ष आ.अरुण जगताप यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच गुणे शास्त्रींनी लिहिलेल्या ‘सार्थ वाग्भट, चरकसंहिता, सुश्रुतसंहिता, भिषग्विलास, सिद्धौषधे, आयुर्वेदिय औषधी गुणधर्मशास्त्र, संयुक्त कल्प आदि आयुर्वेदिक ग्रंथांचे पुजन आ.जगताप यांनी केले. तसेच स्व.गुणे यांच्या महाविद्यालयातील पुतळ्यास आ.संग्राम जगताप यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी संस्थेचे सचिव डॉ.विजय भंडारी, संचालिका वैशाली ससे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, प्रभारी प्राचार्या डॉ.प्रमिला दिवटे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.समीर होळकर, डॉ.ए.टी.देशमुख आदिंसह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते. दरवर्षी महाविद्यालयाच्यावतीने गुणे शास्त्रींच्या पुण्यतिथीनिमित्त काढण्यात येणारी ग्रंथदिंडी यावर्षीच्या कोरोना प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली.

      आ.संग्राम जगताप म्हणाले, स्व.गुणे शास्त्री यांनी सुरु केलेले आयुर्वेदिक उपचार आजच्या आधुनिक तंत्रज्ञानयुक्त उपचार काळातही प्रभावशाली आहेत. त्यामुळे गुणे आयुर्वेद रुग्णालयातून सर्वसर्वसामान्य रुग्णांवर केले जाणारे उपचार त्यांच्यासाठी वरदान ठरत आहेत. आयुर्वेद उपचार प्रभावी असल्याने संपूर्ण जगाने आत्मसात केले आहे. गुणे आयुर्वेद महाविद्यालयाने गुणे शास्त्रींच्या स्मृती कायम जतन केल्या आहेत.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शिवरायांना धर्मापेक्षा स्वराज्य महत्वाचे होते 

डॉ.प्रा.अब्दुस सलाम : मोहंमदिया एज्युकेशन सोसायटीच्यावतीने शिवजयंती साजरी

  वेब टीम नगर : शिवाजी महाराजांनी मुस्लिमांना आपल्या सेवेत घेतले होते. कुठल्याही मुस्लिम दर्ग्याला अथवा मशिदीला त्यांनी कधीही हानी पोहचविली नाही. शिवाजी महाराजांच्या विरुद्ध मुस्लिम शासकांच्या बाजूने लढणारे अनेक मराठा सरदार होते, हेही आपणास विसरता येणार नाही. तो संघर्ष हा धार्मिक स्वरुपाचा नव्हताच तर तो राजकीय स्वरुपाचा होता. शिवरायांना धर्मापेक्षा स्वराज्य महत्वाचे होते.  सर्वांना आपआपल्या धर्माप्रमाणे सण साजरे करण्याचे स्वातंत्र्य होते, असे प्रतिपादन मोहंमदिया एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक डॉ.प्रा.अब्दुस सलाम सर यांनी केले.

     मोहंमदिया एज्युकेशन सोसायटीच्या मदर तेरेसा उर्दू ज्युनिअर कॉलेज, मासुमियाँ डि.टी.एड्. व बी.एड्. कॉलेज, मौलाना आझाद हायस्कूल व सावित्रीबाई फुले उर्दू प्राथमिक कन्या शाळेमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अब्दुस सलाम बोलत होते. याप्रसंगी मुख्याध्यापिका फरहाना सय्यद, शेख इनायतुल्ला, सईद शेख, मखदुम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी कोरोना, सॅनिटायर, सुरक्षित अंतर, मास्क या विषयी जागृतीपर संदेश देण्यात आले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य कायम स्मरणात राहील 

 डॉ.संभाजी मिस्किन : डॉ.संभाजी मिस्कीन यांच्यावतीने तानाजी मालूसरे यांच्या प्रतिमा भेट

    वेब टीम  नगर : छत्रपती शिवाजी महाराज हे लोकशाहीचे आद्य समर्थक होते. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेच्या विचाराशी सहमत असणार्या् सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेवून लढले. या सर्व मावळ्यांनी स्वराज्य निर्मितीसाठी बलिदान दिले. या मावळ्यांचे जीवन कार्य सर्वांना समजावे यासाठी दरवर्षी शिवजयंतीनिमित्त या मावळ्यांच्या प्रतिमेचे वितरण करुन स्वराज्याचा इतिहास जागृत ठेवण्याचे काम यानिमित्ताने करत आहोत. यावर्षी नरविर तानाजी मालुसरे यांची प्रतिमा देऊन त्यांच्या पराक्रमाची शौर्यगाथेचे स्मरण यानिमित्त केले आहे, असे प्रतिपादन  डॉ.संभाजी मिस्किन यांनी केले.

     छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त डॉ.संभाजी मिस्कीन यांच्यावतीने नरवीर तानाजी मालूसरे यांच्या प्रतिमा भेट देण्यात आले. याप्रसंगी केमिस्ट असोसिएशनचे सुधीर लांडगे, बाबासाहेब गिरवले, विष्णूपंत म्हस्के, दिपक पवार, हर्षल म्हस्के, अरुण कोरडे, रवी जपे, पंकज वावीकर, सखाराम घोडके, रमेश बनकर गोरख खंदारे आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी सुधीर लांडगे म्हणाले,  छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या अलौकिक गुणांमुळे व बुद्धिमत्तेमुळे आतापर्यंतच्या सर्व पिढ्यांचे आदर्श ठरलेले आहेत. त्यांचे जीवनकार्याचा सर्वांनी बारकाईने अभ्यास केला पाहिजे. डॉ.संभाजी मिस्कीन यांच्यावतीने  स्वराज्याचे रक्षक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह पराक्रमी मावळ्यांच्या प्रतिमा भेट देऊन इतिहासास उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे. अशा उपक्रमांमुळे छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे सहकारी मावळे यांचा इतिहास पुढील पिढीच्याही कायम स्मरणात राहतील, असा विश्वाास व्यक्त केला.

     याप्रसंगी उपस्थितांना मान्यवरांच्या हस्ते नरविर तानाजी मालुसरे यांच्या प्रतिमेचे वितरण करण्यात आले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शिवाजी महाराजांनी संपूर्ण आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी वाहिले : महेश तवले

     वेब टीम नगर : छत्रपती शिवाजी महाराज युगपुरुष होते. त्यांनी प्रजेवर अन्याय अत्याचार करणार्यां-चा चोख बंदोबस्त केला. नेहमी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानले, शक्ती पेक्षा युक्तीने कार्य केले. संपूर्ण आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी वाहिले. त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन आपणही समाजात काम केले पाहिजे. समाजातील दुर्लक्षित दुर्बल घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करावे. युवकांनी आपल्या शक्तीचा उपयोग समाजाच्या उन्नत्तीसाठी करावा, असे आवाहन भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष  महेश तवले यांनी केले. 

       छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भाजप युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष महेश तवले यांच्यावतीने संत नामदेव चौक येथे शिवजयंती साजरी करण्यात आली.  यावेळी उद्योजक अनिकेत चेमटे, संपतराव नलावडे, विशाल नाकाडे, रवी  गुडा, भाजपा सरचिटणीस तुषार पोटे, नगरसेवक रामदास आंधळे, उद्योजक सुजित डोके आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी बालकांनी बाल शिवाजीची वेषभुषा केली होती. चौकात सुशोभिकरण करण्यात आले होते. यावेळी रमेश माने, नंदकुमार जगताप, संदीप कर्डिले, अविनाश निक्रड, कुलदीप खेसे, संदीप तवले, गणेश उभेदळ, सुभाष वाघ, प्रमोद मचे, राजू अनमल, संजय सानप, राम कर्डिले, विवेक तवले, गणेश बांगर, शुभम पांडूळे, अजय आव्हाड, तुषार शिंदे, कैलास बाबर, अमोल सोनार, आशिष आव्हाड, मयूर वांढेकर, प्रविण टिमकरे, रोहित आजबे, राहुल पोकळे, शनी जाधव, श्याम शिंदे, विवेक तांबे, परेश राऊत, डॉ.संतोष लोखंडे, कृष्णा एडके, संकेत विधाते, महेश आंधळे, गिरीष तवले, सौरभ काळे, सुरज घुमरे, आदेश कर्डीले, अजिंक्य पालवे, आदित्य जावळे, गौरव गडाख, संदीप घोडके, नारायण काकडे, संदीप काकडे, साईनाथ शिंदे, बबलू कराळे, ऋतिक जगताप, किरण गांगर्डे, कार्तिक तवले, सोनू तवले, वैभव कजबे, नवनाथ गवळी, चेतन आजबे, तांदळे मामा, नामदेव शिंदे, विशाल कोरडे, विष्णू तवले, साहिल शेख आदी उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

जांभेकर यांच्या पत्रकारितेचे अनुकरण होण्याची गरज 

दिलीप वाघमारे : मराठी पत्रकार परिषदच्या वतीने मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी

वेब टीम नगर :  मराठी पत्रकार परिषदच्या वतीने दर्पणकार तथा मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली. बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ पत्रकार दिलीप वाघमारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख,  विजयसिंह होलम, अनिल हिवाळे, विठ्ठल शिंदे, विजय मुळे, अन्सार सय्यद, बाबा ढाकणे, राजेंद्र येंडे, आफताब शेख, उदय जोशी, अनिकेत गवळी, निलेश आगरकर, सचिन शिंदे, विक्रम बनकर, सागर दुस्सल, सचिन कलमदाने, प्रदिप पेंढारे, समीर मन्यार आदी उपस्थित होते.

प्रास्ताविकात विजयसिंह होलम यांनी मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती मराठी पत्रकार परिषदच्या वतीने दरवर्षी विविध उपक्रमाने साजरी केली जाते. मात्र सध्या कोरोनाचे सावट असल्याने ही जयंती गर्दी न करता छोट्या स्वरुपात पत्रकारांच्या उपस्थितीमध्ये साजरी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दिलीप वाघमारे म्हणाले की, बाळशास्त्री जांभेकर यांचे वारसदार म्हणार्याल पत्रकारांनी त्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे. त्यांचे नांव घेऊन पत्रकारिता केली जाते, मात्र त्यांचे विचार अंगीकारले जात नाही. जांभेकरांच्या पत्रकारितेचे अनुकरण केल्यास पत्रकारितेला व पत्रकारांना चांगले दिवस येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पाहुण्यांचे स्वागत आफताब शेख यांनी केले. आभार राजेंद्र येंडे यांनी मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सेवांतर्गत आश्वा-सित प्रगती योजना लाभ व निवृत्तीवेतन प्रस्तावास मंजूरी देण्याची मागणी 

संतोष कानडे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांना निवेदन

वेब टीम नगर : सेवांतर्गत आश्वा्सित प्रगती योजना लाभ व निवृत्तीवेतन प्रस्तावास मंजूरी देण्याच्या मागणीचे निवेदन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री  उदय सामंत यांना देण्यात आल्याची माहिती कर्मचारी महासंघाचे जिल्हा सचिव संतोष कानडे यांनी दिली.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय पुणे या उपक्रमांतर्गत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. सामंत यांनी संस्था प्रतिनिधी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांच्याशी पुणे विद्यापीठात संवाद साधला. यावेळी कानडे यांनी सदर प्रश्ना्चे निवेदन दिले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.धनराज माने, कुलगुरू डॉ.नितिन करमळकर, कुलसचिव डॉ.प्रफ्फुल पवार, पुणे विभागीय सहसंचालक डॉ. मोहन खताळ, प्रशासन अधिकारी अर्चना बोर्हााडे आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सेवानिवृत्ती वेतन प्रस्तावाला त्वरित मंजुरी मिळावी, आश्वाासितप्रगती योजना पुर्वलक्षी प्रभावाने लागू करुन सातवा वेतन आयोगाचा लाभ मिळावा, मेडिकल बीलाना मंजुरी, कॅशलेस मेडिकल सुविधा, अनुकंपा भरती, शिक्षकेतर पदभरती सुरू करावी, वेतन त्रुटी प्रस्ताव त्वरित मंजुर करणे आदी विविध मागण्या पुर्ण करण्याचे निवेदनात म्हंटले आहे. याप्रसंगी विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश म्हसे, अंकुश आनंद, अनिल माळवदे, दिपक अल्हाट, डॅनियल पाटोळे उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

परदेशातही निनादला जय शिवाजी, जय भवानीचा गजर

कॅलिफोर्नियात शिवजयंती साजरी

वेब टीम नगर : रयतेसाठी स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी संपुर्ण देश दुमदुमत असताना अमेरिकेतील कॅलिफोर्नियात देखील जय शिवाजी, जय भवानीचा गजर दुमदुमला. कॅलिफोर्नियात वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांनी एकत्र येत हॅरिटेज रोझ गार्डन सॅन होजे येथे शिवजयंती साजरी केली. सॅन होजे येथील रोझ गार्डनमधील शिवाजी महाराजांच्या अश्वािरुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सीए अभिजीत विधाते, प्रा. माणिक विधाते, राहुल शिंदे, सुधाकर महाजन, काळे, खेडकर, खादाट आदी उपस्थित होते.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

निंबळकला घरोघरी शिवाजी महाराजांचे शिल्प भेट देऊन जयंती साजरी

वेब टीम नगर : निंबळक (ता. नगर) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती घरोघरी शिवाजी महाराजांचे शिल्प भेट देऊन साजरी करण्यात आली. प्रारंभी गावातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारक येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महारांकडून प्रेरणा घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते दत्तू उर्फ राजू रोकडे यांनी स्व. भिमा गोविंद रोकडे यांच्या स्मरणार्थ शिल्प वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी सरपंच प्रियंका लामखडे, उपसरपंच बाळासाहेब कोतकर, सामाजिक कार्यकर्ते दत्तू उर्फ राजू रोकडे, माजी सरपंच विलास लामखडे, ग्रामपंचायत सदस्या मालन रोकडे, नामदेव चांदणे, सचिन रोकडे, मच्छिंद्र म्हसे, चांद पटेल, भैय्या पटेल, उद्योजक अविनाश आळंदीकर, ग्रामविकास अधिकारी अनिल भाकरे, लेखक रामदास कोतकर, भगवान निमोणकर, ज्ञानेश्वडर रोकडे, भाऊराव गायकवाड, मारुती गारुडकर, प्रमोद वाघमारे आदी उपस्थित होते.

सरपंच प्रियंका लामखडे यांनी शिवाजी महाराजांचे शिल्प भेट देऊन आगळ्या-वेगळ्या पध्दतीने शिवजयंती साजरी करण्यात आली असल्याचे सांगून उपक्रमाचे कौतुक केले. दत्तू उर्फ राजू रोकडे म्हणाले की, शिवाजी महाराजांनी रयतेसाठी स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली. सर्व जाती, धर्माच्या प्रजेला त्यांनी समान न्याय देण्याचे कार्य केले. शुन्यातून विश्वा निर्माण करणारे, परस्त्रीला मातेसमान मानणारे व अन्यायाविरोधात लढणार्या  शिवाजी महाराजांच्या कार्यातून सतत प्रेरणा मिळण्यासाठी त्यांच्या शिल्पांची भेट देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यावेळी नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 कॉ.गोविंद पानसरे हे आपल्या समाज व्यवस्थेचे अविभाज्य घटक होते : उत्तम कांबळे

वेब टीम नगर :  इतिहास समजावून कसा घ्यायचा, वर्तमानाशी तो कसा जुळवायचा आणि भविष्यात इतिहासाचा कंदील घेऊन कसे चालायचे हे कॉ. पानसरे सांगायचे. कॉ. पानसरे म्हणजे आपल्या समाज व्यवस्थेचा एक अविभाज्य भाग होता,असे प्रतिपादन जेष्ठ विचारवंत, पत्रकार उत्तम कांबळे यांनी केले.

        शब्दगंध साहित्यिक परिषद आयोजित कॉ.गोविंद पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार  वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

जुन्या पिढीतील कम्युनिस्ट चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते कॉ.का.वा.शिरसाठ यांना शब्दगंध च्या वतीने यावर्षीचा कॉ.गोविंद पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार कांबळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे अध्यक्ष अरुण कडू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास विचारपीठावर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव ऍड कॉ.सुभाष लांडे,भारतीय महिला फेडरेशन च्या राज्य अध्यक्ष प्रा.स्मिता पानसरे,कॉ.बाबा आरगडे, शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे,संस्थापक सुनील गोसावी,खजिनदार भगवान राऊत यादी उपस्थित होते.

यावेळी बोलताना उत्तम कांबळे म्हणाले कि, शब्दगंध ने या पुरस्कार वितरण कार्यक्रमात सातत्य ठेवले ही अभिमानास्पद बाब आहे,कॉ.गोविंद पानसरे यांचे विचार आजही आम्हाला लढण्याची प्रेरणा देतात,देह संपतात मात्र विचार कायम राहातात,कॉ.पानसरे,डॉ. दाभोलकर व प्रा.कलबुर्गी यांच्या हत्या म्हणजे येथल्या व्यवस्थेने जाणीवपूर्वक रचलेला पूर्वनियोजित कट होता.हे आता लपून राहिलेलं नाही.इथली व्यवस्था विचारांना आणि विचार करणाऱ्या माणसांना खुप घाबरते,ज्यांना ही माणसे आपल्या वाटेतील अडसर वाटतात ती व्यवस्था अश्या विचारी माणसांना संपवते.मात्र विचार कधीच संपू शकत नाहीत,माणसाची स्वप्ने संपवू शकणारी कोणतीही यंत्रणा या जगात अस्तित्वात नाही.

        अध्यक्षपदावरून बोलताना अरुण कडू म्हणाले कि,कॉ.गोविंद पानसरे यांच्या नावाने शब्दगंध च्या वतीने दिला जाणारा पुरस्कार पाथर्डी तालुक्यातील जेष्ठ कार्यकर्ते कॉ.का.वा. शिरसाठ याना मिळाला,ही माझ्या दृष्टीने अत्यंत आनंददायी अशी बाब आहे,शिरसाठ यांच्या भावी वाटचालीस मी मनःपूर्वक शुभेच्छा देतो,यावेळी प्रा.स्मिता पानसरे,ॲड सुभाष लांडे पाटील यांची भाषणे झाली.सुनील गोसावी यांनी प्रास्ताविक केले,शर्मिला गोसावी यांनी सूत्रसंचालन केले तर भारत गाडेकर यांनी आभार मानले.कॉ गोविंद पानसरे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला.या कार्यक्रमास निवासी जिल्हाधिकारी संदीप निश्चित, प्राचार्य शिवाजीराव देवढे,इंजि.अर्षद शेख,चंद्रकांत पालवे,प्रा.डॉ.मेहबुब सय्यद,युंनुस तांबटकर,श्रीधर अंभोरे,पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती, ॲड.  बन्सी सातपुते, दशरथ खोसे,भारती न्यायपल्ली,संध्या मेढे आदी मान्यवर उपस्थित होते,कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शब्दगंध चे अजयकुमार पवार,सुभाष सोनवणे,वसंत डबाळे,तुकाराम गोंदकर,डॉ.अनिल गर्जे यांनी विशेष परिश्रम घेतले.

    कोविड प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन करून अवघ्या चाळीस निमंत्रितांच्या उपस्थित हा कार्यक्रम घेण्यात आला.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शिवाजी महाराजांनी सामर्थ्यशाली , प्रागतिक राज्य निर्माण केले 

संग्राम जगताप : शिवजयंतीला कोरोना योध्दांचा सन्मान , टॅलेंट ऑफ अहमदनगर पुरस्कारांचे वितरण

वेब टीम नगर : छत्रपती शिवरायांनी शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. शिवाजी महाराज अतिशय धैर्यशील आणि उत्कृष्ट नेतृत्व गुण संपन्न होते. सर्वसामान्य रयतेवर अन्याय होऊ नये, त्यांचे हक्क अबाधित रहावे, म्हणून त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. त्यांच्या कार्यातून व विचारातून आजच्या युवकांनी प्रेरणा घेण्याचे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ (नवी दिल्ली), जय असोसिएशन ऑफ एनजीओ, आधारवड बहुद्देशीय संस्था, रयत प्रतिष्ठान, जय युवा अॅघकॅडमी, द युनिव्हर्सल फाउंडेशन, उडान फाउंडेशन, उत्कर्ष बहुउद्देशीय संस्था, माहेर फाउंडेशनच्या वतीने आयोजित शिवजयंतीच्या कार्यक्रमात आमदार जगताप बोलत होते. यावेळी जिल्हा क्रीडा कार्यालयाचे क्रीडा अधिकारी नंदकिशोर रासने, राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाचे राज्य अध्यक्ष संदीप लोंढे, लीगल सेलचे महाराष्ट्र अध्यक्ष अॅदड. प्रशांत साळुंके, नगरसेवक प्रकाश भागानगरे, ज्येष्ठ विधिज्ञ अॅिड. भानुदास होले, जिल्हाध्यक्ष अॅेड. महेश शिंदे, अॅाड. अनिता दिघे, शिवाजी नवले, पोपट बनकर, शामू लोंढे, श्रीकांत यादव, सागर आलचेट्टी, रजनी ताठे, नयना बनकर, आरती शिंदे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार जगताप यांनी मानवी हक्क, अधिकार व कर्तव्याबाबत जागृक राहण्याचे सांगत राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाच्या कार्याचे कौतुक केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते डॉ. अमोल बागुल, रजनी ताठे, अशोक भालके, जगन्नाथ बोडखे, प्रा.सुनिल मतकर, शरद वाघमारे, ज्योत्स्ना शिंदे, संगीता घोडके, डॉ.धीरज ससाणे, डॉ.चंद्रकांत वाल्हेकर, सुहासराव सोनवणे, मेधा कानिटकर, ईसाभाई शेख, ऋषिकेश कावरे, विद्या तन्वर, शोभा निसळ, सचिन वायाळ यांना कोरोना योध्दा सन्मानाने गौरविण्यात आले. तसेच सुनील सकट, प्रा. सुनील मतकर, प्राचार्य मिनीनाथ गोरे, मुख्याध्यापक लहानु कोरडे, परमेश्वतर जवणे, विठ्ठल क्षीरसागर, प्राचार्य डॉ. रामदास बिटे, ग्रामसेवक अनिल केसकर, तेजल परमार, रमाकांत माटे यांना टॅलेंट ऑफ आमदनगर पुरस्कार देण्यात आले. तर सर्व उपस्थितांना शिवचरित्राचे पुस्तक भेट देण्यात आल्या

संदीप लोंढे म्हणाले की, जीवन आनंदाने व निर्भयपणे जगण्यासाठी मानवाधिकारांची माहिती असणे आवश्यक आहे. सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मानवाधिकारांच्या मुल्यांचा आदर राखला गेला पाहिजे. मनुष्य मनुष्याच्या मदतीला येण्यासाठी संघटना प्रयत्नशील राहून मानवी मुल्यांच्या जागृती व मानवाधिकारांचे उल्लंघटन टाळण्यासाठी कार्य करीत असल्याचे सांगितले.

अॅरड. प्रशांत साळुंके यांनी कोरोना महामारी मनुष्यावर ओढवलेली सर्वात मोठी आपत्ती होती. सर्वांनी माणुसकीची भावना जागृक ठेऊन एकजुटीने कार्य केल्याने अनेकांचे जीव वाचले. अनेकांनी या संकटकाळात आपल्या परीने कार्य करुन एका योध्दाची भूमिका पार पाडली. या पुरस्कार व सन्मानाने सामाजिक कार्य करणार्यांपना आनखी बळ मिळणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅाड. अनिता दिघे यांनी केले. आभार अॅभड. भानुदास होले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेजर नारायाण चिपडे, शाहिर कान्हू सुंबे, अॅ्ड. सुनिल तोडकर, दिनेश शिंदे, संतोष गिर्हेक, दर्शन बनकर, साक्षी बनकर यांनी परिश्रम घेतले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments