योगसाधना
गरुडासन
गरुड हे विष्णूचे वाहन मानले जाते शुभ्र चेहरा, बाकदार चोच लाल, पंख आणि सोनेरी शरीर असे त्याचे वर्णन केले जाते शिवाय गरुड म्हणजे पक्ष्यांचा राजा.
पद्धती :
१) ताडासनात उभे राहा ,उजवा गुडघा वाकवा.
२) डावा पाय उजव्या गुडघ्याच्या वर उजव्या मांडीपर्यंत आणा आणि डाव्या मांडीच्या मागची बाजू उजव्या बाजूच्या पुढच्या मांडीवर टेकवा.
३) नंतर डावे पाउल उजव्या पोटरीच्या मागे अशा तऱ्हेने न्या की ज्यामुळे ही उजव्या पोटरीला स्पर्श करील आणि डाव्या पायाचा अंगठा उजव्या घोट्याच्या आतल्या बाजूच्या जरा वर अडकवला जाईल आता डाव्या पायाभोवती उजवा पाय लपेटला जाईल.
४) येथे सर्व तोल उजव्या पायावर सावरायचा असतो हे शिकण्यासाठी काही वेळ लागेल .
५)कोपरा वाकवा आणि छातीच्या पातळीशी आणा. उजवे कोपर डाव्या दंडाच्या पुढच्या भागावर कोपराच्या सांध्या पाशी टेकवा मग उजवा हात पुढून उजवीकडे न्या आणि डावा हात मागून डावीकडे नेऊन तळहात जुळवा आता उजव्या हाताने डावा हात लपेटला जाईल.
६) या स्थितीमध्ये सुमारे १५ते २० सेकंद दीर्घश्वसन करत राहा नंतर हात आणि पाय मोकळे करा आणि पुन्हा ताडासनात या.
७) डाव्या पायावर उभे राहून आणि उजवा पाय डाव्या पायाभोवती व उजवा हात डाव्या हाता भोवती लपेटून हे आसन पुन्हा करा दोन्ही आसना मध्ये सारखाच वेळ रहा.
परिणाम : या आसनामुळे गोट्यांना शक्ती येते आणि खांद्यामधील ताठरपणा नाहीसा होतो. यांच्या स्नायूंमध्ये येणाऱ्या पेटक्क्यांवर हे आसन उपयोगी पडते पायांमध्ये येणारे पेटके आणि वेदना नाहीशा करण्यासाठी गरुडासन व पुढे केलेली व पुढे वर्णन केलेली वीरासन आणि बेकासन म्हणजेच मंडूकासन ही असणे उपयुक्त ठरतात.
0 Comments