मूलमंत्र आरोग्याचा
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
योगसाधना : अर्ध बद्ध पद्मोतानासन
बद्ध म्हणजे बांधलेला, कब्जात असलेला ,पकडलेला किंवा आवळून धरलेला.पद्मा म्हणजे कमळ आणि उत्तान म्हणजे अत्यंत ताणलेला.
पद्धती :
१)ताडासनातं उभे राहा श्वास घ्या, उजवा पाय जमिनीवरून उचला, उजवा गुडघा वाकवा आणि उजव्या पायाचा चवडा डाव्या मांडीवर टेकवा.
२) डावा हात सोडा.उजवा हात पाठीच्या मागून पुढे आणून उजव्या हाताचा अंगठा व पहिली दोन बोटे यांनी उजव्या पायाचा अंगठा पकडा.
३) डावा हात सोडा.श्वास सोडा. धड पुढे वाकवा.डाव्या पावलाच्या शेजारी डावा हात जमिनीवर टेकवा आणि डोके वर उचलून धरा,पाठ जास्तीत जास्त अंतर्गोल असू द्या.काही वेळ श्वसन करा.
४) श्वास सोडा, डोके किंवा हनुवटी डाव्या गुडघ्यावर ठेकवा.
५) संपूर्ण डावा तळहात जमिनीवर टेकवता येत नसेल तर प्रथम बोटांची टोके जमिनीला लावा.मग टप्प्याटप्प्याने प्रथम बोटे व शेवटी सबंध तळहात जमिनीवर टेकवा.त्याचप्रमाणे डोक्याच्या बाजूने प्रथम कपाळ व डाव्या गुडघ्यावर ठेवा मग मान लाभू नाकाचा शेंडा तेथे ठेवा,नंतर ओठ आणि हनुवटी डाव्या गुडघ्यावर ठेवा डोक्या पासून सुरुवात करून हनुवटी पर्यंत प्रगती झाली याचा अर्थ असा की शरीर अधिकाधिक लवचिक होऊ लागले आहे.
७) या स्थितीत काही काळ दीर्घश्वसन करून श्वास घ्या आणि धड क्रमांक चार च्या स्थितीत आणा.दोनदा श्वसन करा.
८) श्वास घ्या तळहात जमिनीवरून उचला आणि क्रमांक तीनच्या स्थितीत या.
९) उजव्या हाताच्या पकडीतून डावे पाऊल सोडा आणि पुन्हा ताडासनात या.
१०) हेच आसन उलट्या बाजूने पुन्हा करा.आता उजवा पाय जमिनीवर ठेवा डावा गुडघा वाकवून डावे पाऊल उजव्या मांडीवर टेकवा.डावा हात पाठीमागून नेऊन त्याने डावा अंगठा पकडा .पुढे वाका आणि उजवा तळहात जमिनीवर टेकवा.
११) हात पाठीमागून घेऊन अंगठा पकडता येत नसेल तर दोन्ही तळहात जमिनीवर ठेवून वरील पद्धतीने आसन करा.
परिणाम :
या आसना मुळे गुडघ्या मधील ताठरपणा नाहीसा होतो. पोटातील अवयव आकुंचित होत असल्याने पचनशक्ती वाढते आणि संकोच विकासात्मक हालचालीमुळे निरुपयोगी द्रव्य निर्माण करणारे जीव विष नाहीसे होते.या आसनामुळे खांदे मागे खेचून धरणे शक्य होते.त्यामुळे छाती फुलू लागते व श्वसन अधिक मोकळेपणाने आणि दीर्घतेने करणे शक्य होते.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आरोग्य आहार : नारळाच्या वड्या
साहित्य : दोन नारळ खोवलेले, पाच-सहा वेलदोड्याची पूड केशर,१ वाटीभर साईसकट दूध, दोन छोटे चमचे पिठीसाखर,कापायला चौकोनी ट्रे,अर्धा चमचा तूप आणि प्लास्टिकचा कागद
कृती :
१) दोन नारळ खोवून घ्यावेत.नारळ शेवटपर्यंत खोवू नयेत पांढरा भाग घ्यावा.
२)नारळाचा चव साखर व एक वाटी साईसकट दूध घालून जाड बुडाच्या पातेल्यात एकत्र करून गॅसवर ठेवावे .
३) सतत ढवळावे आच मध्यम ठेवावी प्रथम मिश्रण पातळ होईल व नंतर घट्ट होऊ लागेल.
४)चौकोनी पत्र्याच्या ट्रेला तूप लावून तयार ठेवावे गॅस वरील मिश्रणात वेलदोडा पूड व केशर घालावे व सतत ढवळावे हळूहळू मिश्रण पातेल्याच्या कडेने सुटू लागेल व कोरडे होऊ लागेल सहा मिश्रण गॅसवरून उतरवावे व त्यात दोन चमचे पिठीसाखर घालून घोटावे सात तूप लावलेल्या ट्रेमध्ये याच्या सहाय्याने मिश्रण सर्वत्र सारखे व ट्रेनच्या कडेपर्यंत पसरावे.
टीप : खोबरे पांढरे घ्यावे व गॅसवर सतत ढवळावे मिश्रण बुडाला लागू देऊ नये म्हणजे वड्या पांढऱ्या शुभ्र होतात.
0 Comments