सरकारी वकिलाचा बंगला फोडून ५० तोेळे सोन्याचे दागिनेे लांबवीले

सरकारी वकिलाचा बंगला फोडून ५० तोेळे सोन्याचे दागिनेे लांबवीले 

कायनेटीक चौकातील रविश कॉलनीतील घटना

वेब टीम नगर : राहत्या बंगल्याच्या मेनगेटचे बंटअर लॉक व लाकडीे चौकटीचे हॅचलॉक तोडुन अज्ञात चोरानी आत प्रवेेश केला. बेडरुममधील ड्राव्हरमध्ये असलेलेे ५० तोळे ७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने चोरुन नेले. हि घटना नगर पुणे रोड वरील कायनेटीक चौकातील रविश कॉलनी येथे रविवारी (दि.७) रोेजी दुपारी साडेतीन ते सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान घडली.

या बाबतची अधिक मााहिती अशी की, सरकारी वकील गोरक्षनाथ काशिनाथ मुसळे (वय ५३, रा.ध्रुव  बंंगला,रविश कॉलनी, कायनेटीक चौक, नगर) यांच्या पत्नीची मैत्रीण मयत झाल्याने तिच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी अ‍ॅड. मुसळे कुटुुंबासह दुपारी एक वाजता गेले होते. जाताना त्यांनी त्यांचा बंगल्याची चावी कामवाली बाईकडे दिली.

त्यानंतर कामवालीबाई नेहमीप्रमाणे दोन वाजता मुसळे यांच्या घरी गेली व घरातील काम आटोपुन बंगल्याला चावी लावुन साडेतीन वाजता तिच्या घरी गेली. सायंकाळी ५ वाजुन ५० मिनिटांनी मुसळेे सहकुटुंब घरी आले.

त्यावेळेेस बंगल्याच्या कम्पाउंडचे कुलूप लाावलेले होते. कुलूप उघडुन मुसळे आत गेले आणी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप उघडण्याचा प्रयत्न केला असता कुलूप उघडले गेेलेे नाही. म्हणून मुुसळे यांनी बंगल्याच्या मागीलं बाजुस जाऊन पाहीले असता किचनच्या बाहेरील सेेफ्टी डोअर आणी आतील दरवाजाचा इइंटरलॉक व लाकडी चौकटीचे हॅचलॉक तुटलेले दिसलेे..

त्यावरुन घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनात आलेे. त्यांनी बेडरुममध्ये जाऊन पाहिले असता बेडरुममधील ड्राव्हरमध्ये ठेवलेेले  दागीने नसल्याचे दिसले. बंंगल्यातील रुममधील सामान अस्ताव्यस्त  फेेकलेले आढळून आले. ड्राव्हर मधील सोन्याच्या साडेचार तोळे वजानाच्या तीन बांगड्या, पाच तोळे वजनाची चेन, दोन तोळे वजनाची पिळ्याची चेन, दीड तोळे वजनाची सोन्याची चेन,

पाच तोळे वजनाचे सोन्याचे ब्रासलेट, सहा तोळे वजनाची मोेहनमाळ, तीन तोळे वजनाच्या चार छोट्या चेन,दोन तोळेे वजननाचे सोन्याचे कानातील झुुबे, आणि वेल, २ तोळे वजनाची सोन्याची नथ, पाच ग्रॅम वजनाचे छोेटे मंगळसुत्र, दोने तोेळे वजनाचा सोन्याचा नेकलेस,  तीन तोळे वजनाचा सोन्याचा राणीहार, पाचतोळे वजनाच्या चार सोन्याच्या बांगड्या, पाच तोळे वजनाचा सोेन्याचा मोठा हार, कानातील सोन्याची जोडी,  असा एकूण ५० तोळे ७ ग्रॅम वजनाचे दागीने चोरानी चोरुन नेले.

या घटनेची माहिती मिळताच  कोतवाली पोलिस ठाण्याचे सपोनी रणदिवेे व सपोनी विवेक पवार यांंनी पपोेलिस पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी करुन चौकशी केली. स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे पीआय पोलिस पथकासह घटनास्थळी तात्काळ पोेहचले. आजुबाजुची पाहणी करुन, मिळालेेल्या  माहितीवरुन चौेकशी केली.  कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक राकेश मानगावकर पोलिस पथकासह घटनास्थळी जाऊन पथकांना मार्गदर्शन केले.

या प्रकरणी गोरक्ष मुसळे यांच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलीसांनी भा द वि कलम ४५४,३८० प्रमाणे घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली असुुन अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक विवेक पवार हे करीत आहेे.

Post a Comment

0 Comments