गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकानेच मागितली लाच
वेब टीम नगर : तक्रार दार याच्या भावास जामखेड गु.र.न ६९८/२०२० या गुन्ह्यात अटक करून पोलीस कस्टडी घेतल्यावर गुन्ह्याचे तपासात मदत करण्यासाठी तसेच तक्रारदाराच्या भावास १६९ प्रमाणे गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी म्हणून सज्जन किसन नऱ्हेडा (वय ३६) पोलीस उपनिरीक्षक जामखेड पोलीस स्टेशन जिल्हा अहमदनगर वर्ग दोन रा.मोरे वस्ती थोरवे यांच्या घरात भाड्याने , जामखेड मूळचा राहणार निहालसिंह वाडी ता. अंबड जिल्हा जालना. आणि तुकाराम रामराव ढोले (वय ३८) राहणार मोरेवस्ती जामखेत जी. अहमदनगर या खासगी इसम यांनी १ लक्ष रुपये लाच मागितली. तक्रारदाराच्या तक्रारीवरून दि. ५-१-२०२१ रोजी केलेल्या पडताळणीत आरोपी लोकसेवक क्र.१ याने आरोपी क्र. २ याच्या उपस्थिती तक्रारदारा कडे ५०,००० रुपयांची लाच मागून पंचासमक्ष तडजोडी अंती ३०,००० रूपयांची लाच आरोपी क्र २ याच्या कडे हॉटेल कृष्ण येथे देण्यास सांगितली त्याप्रमाणे दि. ५ जानेवारी २०२१ रोजी लाचेच्या सापळ्यात आरोपी क्र.२ याला लॉसेवक क्र. १ याच्यासाठी हॉटेल कृष्णा समोर पंचासमक्ष स्वीकारली असता आरोपी क्र. २ ला रंगेहात पकडण्यात आले. तसेच आरोपी लोकसेवक क्र. १ याला सुद्धा ताब्यात घेण्यात आले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक शाम पवरे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने तसेच अप्पर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे दिनकर पिंगळे वाचक पोलीस उपाधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली .
0 Comments