मंगळसुत्र चोरणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

मंगळसुत्र चोरणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

वेब टीम नगर : दि २३/०१/२०२१ रोजी  शोभा सुमीतलाल बाफना यांनी फिर्याद दिली की , दि २३/०१/२०२१ रोजी सकाळी ११/३० वा. च्या सुमारास  मार्केटयार्ड येथुन भाजीपाला खरेदी करुन घरी येत असतांना माझ्या पाठीमागुन एक पांढ-या रंगाच्या मोपेड मोटारसायकल वरुन एक इसम आला व त्याने माझ्या गळयातील मंगळसुत्र बळजबरीने ओढून तोडुन घेवुन गेला . या  फिर्यादीवरुन कोतवाली पोस्टे गुन्हा रजि नं.७३/२०२१ भा.दं.बि. कलम ३९२ प्रमाणे गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास  आरोपीचा शोध घेत असतांना पोलीस निरीक्षक राकेश मानगाबकर यांना गुप्तबातमीदारामार्फत बातमी मिळाली को, सदर गुन्ह्यातील आरोपी हा अहमदनगर शहरात आनंदऋषीजी हॉस्पीटल परिसरात त्याचेकडोल मोपेड वाहनासह येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने आनंदऋषीजी हॉस्पीटल व यश पॅलेस होटेल या परिसरात गुन्हे शोधपथकासह सापळा लावुन सदर संशयीत मोपेड गाडी व त्यावरील इसमास ताब्यात घेवुन त्याचेकडे विचारपुस करता त्याने प्रथम उडवा उडविची उत्तरे दिली त्यास अधिक विश्वासात घेवून चौकशी केली असता त्याने त्याचे नाव रुपेश प्रकाश यादव वय-३७ वर्षे रा. साई अपार्टमेंट वडगाव शेरी जि पुणे असे असल्याचे सांगीतले व सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली असुन गुन्ह्यातील चोरीस गेलेला सोन्याचा मुददेमाल हस्तगत केलेला आहे. तसेच त्याने तोफखाना पोलीस ठाणे हददीत अशाचप्रकारे मोपेड गाडीवरुन महिलांचे गळयातील मंगळसुत्र चोरी केल्याची देखील कबुली दिली आहे. त्याबाबत तोफखाना पोस्टे १२/२०२१ व २६/२०२१ भादंवि कलम ३९२ प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

त्याचेकडील गुन्हयात वापरलेली अँक्टीव्हा ५ जी मोपेड गाडी ही त्याने उस्मानपुरा जिल्हा औरंगाबाद येथुन चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन त्याचा गुन्हा रजि क्रं २३०/२०२० भादवि ३७९ प्रमाणे दाखल आहे. तरी सदर गुन्हयाचा पुढील तपास पोनि राकेश मानगांबकर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि हेमंत भंगाळे हे करत आहेत. सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक मनोज पाटील , अपर पोलीस अधिक्षक  सोरभ अग्रवाल , उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल शरद दुमे , यांचे मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिस निरिक्षक राकेश मानगांवकर सो, सपोनि हेमंत भंगाळे, गुन्हेशोध पथकाचे पोना योगश भिंगारदिवे, पोना गणेश धोत्रे,पोना रविंद्र टकले,पोना विष्णु भागवत, पोना नितीन शिंदे, पोना शाहीद शेख, पोकौं भारत इंगळे, पोकॉ सुमित गवळी,पोकॉं केलास शिरसाठ, पोकाँ तान्हाजी पवार, पोकाँ प्रमोद लहारे, पो्को सोमनाथ राऊत, पोकाँ सुशिल वाघेला, पोकाँ सुजय हिवाळे व पोना बापुसाहेब म्हस्के यांनी सदरची कारवाई केली आहे. 

Post a Comment

0 Comments