बन्सीभाऊ एडके यांना पत्रकार रत्न पुरस्कार प्रदान

 बन्सीभाऊ एडके यांना पत्रकार रत्न पुरस्कार प्रदान  

 वेबटीम नेवासा : येथे साईशिवार प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकार रत्न, समाज रत्न, साई रत्न पुरस्कार नुकतेच प्रदान करण्यात आले. यामध्ये बालाजी देडगाव येथील दैनिक सार्वमतचे प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पत्रकार रत्न पुरस्कार प्रदान करुन गौरविण्यात आले.  

यावेळी नेवासा नगरपंचायतचे मार्गदर्शक व माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, जयकुमार गुगळे, अभयकुमार गुगळे, प्रगतिशील शेतकरी संभाजीराव कार्ले, संत ज्ञानेश्वर महाराज मंदीर देवस्थानचे विश्वस्त रामभाऊ जगताप, देविदास साळुंके, संभाजी माळवदे, ज्येष्ठ व्यापारी विनायकराव पोतदार, कृषीतज्ञ डॉ. अशोकराव ढगे, दिलीप चंगेडीया, सतीश चुत्तर, सुरेश चुत्तर, आण्णाभाऊ पेचे, सूर्यकांत गांधी, साई शिवारचे मार्गदर्शक दिलीपराव चुत्तर, सचिन कडू, शरद पंडुरे, नितीन कुंढारे, संभाजी पवार, शिवाजी काकडे, दत्तात्रय जायगुडे, उमेश पंडुरे, ज्ञानेश्वर पंडुरे, रामेश्वर जाधव, महेश पंडुरे, संजयकुमार लाड, पत्रकार सोपानराव दरंदले, शिवाजीराव पालवे, युसुफ सय्यद आदी उपस्थित होते.

नेवासा येथील जुन्या पेठेतील श्रीराम मंदिराच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमप्रसंगी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत डहाळे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. प्रतिष्ठानचे सल्लागार पत्रकार सुधीर चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. यावेळी गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी व्हिडिओ कॉलद्वारे कार्यक्रमस्थळी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments