फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन

 फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन

वेब टीम नगर :  प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणारा लोकशाही दिन सोमवार, दि. १फेब्रुवारी, २०२१ रोजी दुपारी १ ते ३ या वेळेत जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. सर्व विभागप्रमुखांनी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी केले आहे.

 दि. २६ सप्टेंबर २०१२ अन्वये प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी स्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन आयोजित जातो. कोविड-१९ चे परिस्थितीमुळे लोकशाही दिन आयोजित करण्यात आला नव्हता. मात्र, यापुढे फेब्रुवारी महिन्यापासून प्रत्येक महिन्याचे पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी स्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येईल. तालुका स्तरावरील लोकशाही दिनांक तक्रारीचे निवारण न झाल्यास जिल्हा स्तरावरील लोकशाही दिनात अर्ज दाखल करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.Post a Comment

0 Comments