अखेर अमोल कर्डीले जेरबंद

 अखेर अमोल कर्डीले जेरबंद 

वेब टीम नगर: ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून तलवारीने वार करून पसार झालेला गुंड अमोल कर्डीले याला पारनेर पोलिसांनी शिरूर तालुक्यात पाठलाग करून पकडले. शिरूर तालुक्यातील निमोणे गावात आरोपी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.तेथील एका डाळिंबाच्या बागेत आरोपींची मटण पार्टी सुरू होती. पोलिसांना पाहून आरोपी उसाच्या शेताकडे पळू लागले. पोलिसांनी पाठलाग करून उसाच्या शेतात आरोपीला पकडले.

पारनेरचे पोलीस निरीक्षक घन:श्याम बळप यांच्या पथकाने ही कारवाई केली. विरोधात निवडणूक लढविल्याच्या रागातून पराभूत उमेदवार जयवंत नरवडे (वय ५५) यांच्यावर तलवार, काठ्यांनी हल्ला झाला होता. यामध्ये अमोल कर्डीले हा प्रमुख आरोपी होता. त्याच्याविरूद्ध पारनेर आणि शिरूर तालुक्यात विविध प्रकरणांत गुन्हे दाखल आहेत.

अमोल कर्डीले शिरूर तालुक्यातील निमोणे भागात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.  बुधवारी सायंकाळी अमोल कर्डीले चव्हाणवाडी फाटा (निमोणे ता. शिरूर) शिवारात एका शेतात दारू व मटण पार्टी करीत असल्याची माहिती मिळाली. पोलीस पथकाने तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली.पोलिसांना पाहून आरोपी कर्डीले याने पार्टी सोडून धूम ठोकली. तो उसाच्या शेताच्या दिशेने पळाला. पोलिसही त्याच्या मागे धावले. पाठलाग सुरू असतानाही तो तेथून सटकण्याचा प्रयत्न करीत होता. अखेर पोलीस निरीक्षक बळप यांनी गोळ्या घालण्याचा इशारा दिल्यानंतर कर्डीले पोलिसांना शरण आला. त्याला पकडून पारनेरला आणण्यात आले. पारनेरसह शिरूर पोलीस ठाण्यातही त्याच्याविरूद्ध गुन्हे दाखल आहेत.

Post a Comment

0 Comments