नगर टुडे बुलेटीन 28-01-2021

नगर टुडे  बुलेटीन 28-01-2021

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कन्याकुमारी ते काश्मीर पायी निघालेल्या पंडलुवल्डू भरत यांचे रोटरी क्लबच्या वतीने नगरमध्ये स्वागत

 वेब टीम नगर : गेल्यावर्षी करोना व लॉकडाऊन काळात डॉक्टर, पोलीस व सामाजिक संस्थांनी संपर्ण भारतात मानवतेच्या भावनेने सर्वसामान्य गरजूंना आधार देत मदत कार्य केले. या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत धन्यवाद देण्यासाठी कर्नाटक मधील मैसूर येथील रोटरी क्लबचे सदस्य पंडलुवल्डू भरत हे ‘ वॉक फॉर ह्युमिनीटी ’ चा संकल्प करत कन्याकुमारी ते काश्मीर असे चार हजार किलोमीटरच्या पायी प्रवासास गेल्या ११ डिसेंबर पासून निघाले आहेत. भरत नगरमध्ये आले असता त्यांचे नगरच्या सर्व रोटरी क्लबच्या वतीने प्रेमदान चौकात उत्साहात स्वागत करणायत आले. जेष्ठ रोटरीयन धनेश बोगावत यांच्या हस्ते पंडलुवल्डू भरत यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी रोटरी मेन क्लबचे अध्यक्ष अॅड. अमित बोरकर, रोटरी मिडटाऊन क्लबचे अध्यक्ष क्षितिज झावरे, रोटरी सेन्ट्रल क्लबचे अध्यक्ष प्रसन्न खाजगीवाले, सतीश शिंगटे, चेतन अमरापूरकर आदी उपस्थित होते.

क्षितिज झावरे म्हणाले, रोटरी क्लब संपूर्ण जगात मोठे सामाजिक व मदत कार्य अविरतपणे करत असतांना रोटरीचे सदस्य देशभर राष्ट्रीय एकात्मतेसाठी भरीव योगदान देत आहे. मानवतेच्या भावनेने प्रेरित होवून संपूर्ण भारतभर पायी प्रवासास निघालेले पंडलुवल्डू भरत हे नगर मार्गे पुढे जाणार आहेत हे कळल्यावर नगरच्या सर्व रोटरी क्लबच्या वतीने त्यांचे उत्साहात स्वागत केले आहे. त्यांच्या या महान कार्यास सलाम.

ॲड. अमित बोरकर म्हणाले, रोटरीयन पंडलुवल्डू भरत हे मोठ्या प्रेरणादायी उद्देशाने पायी भारत भ्रमणास निघाले आहेत. त्यांच्या या कार्याचा अभिमान आम्हा सर्वांना वाटत आहे.यावेळी प्रसन्न खाजगीवाले यांनी नगरमध्ये रोटरी क्लबच्या माध्यमातून करोना काळात झालेल्या मदत कार्याची माहिती दिली.

यावेळी पंडलुवल्डू भरत यांची रोटरी क्लब सेन्ट्रलच्या वतीने नगरमध्ये मुक्कामची व्यवस्था करण्यात आली. तसेच पायी प्रवासाने त्यांचे बूट झीजल्याचे लक्षात येताच त्यांना उच्चदर्जाचे नवे बूट देण्यात आले. शिर्डी मार्गे पुढील प्रवासास निघतांना पंडलुवल्डू भरत यांनी नगरच्या रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आदरतिथ्या बद्दल आनंद व्यक्त करत आभार मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

करोना काळात सर्व भारतीयांनी केलेल्या स्फुरणीय कार्याचा हिंदसेवा मंडळाला अभिमान 

 सुमतिलाल कोठारी :  पाच शाळांनी केले एकत्रित झेंडावंदन         

वेब टीम नगर : करोनाच्या संकटाला भारताने मोठ्या धैर्याने तोंड देत करोनाचे सावट दूर केले आहे. अनेक मोठे देश अजूनही करोनावर मात करण्यात अपयशी ठरले असतांना भारत संकटावर मात करत प्रगतीपथावर जात आहे. देशाचा ७२ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात व करोनामुक्त वातावरणात साजरा करतांना सर्व भारतीयांनी केलेल्या स्फुरणीय कार्याचा हिंदसेवा मंडळाला अभिमान आहे, असे प्रतिपादन दादाचौधरी मराठी शाळाचे अध्यक्ष  सुमतिलाल कोठारी यांनी केले.

भारताच्या प्रजासत्ताकदिना निमित्त हिंदसेवा मंडळाच्या दादाचौधरी माध्यमिक शाळा, भाईसथ्था नाईट स्कूल, पार्वतीबाई डहाणूकर कन्या विद्यालय, दादाचौधरी मराठी शाळा व मेहेर इंग्लिश स्कूल या पाच शाळांचे एकत्रित झेंडावंदन करण्यात आले. जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष के.डी. खानदेशे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यावर राजश्री शाहूमहाराज शिष्यवृत्ती योजने अंतर्गत शाळेतील विद्यार्थांना ५ हजार रुपयाच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी हिंदसेवा मंडळाचे कार्याध्यक्ष अजित बोरा, उद्दोजक कांतिलाल कोठारी, जी.प.चे सेवानिवृत्त लेखापाल अशोक आगरकर, जनशिक्षण संस्थेचे बाळासाहेब पवार, दादाचौधरी मराठी शाळाचे अध्यक्ष  सुमतिलाल कोठारी, दादाचौधरी माध्यमिक शाळेचे अध्यक्ष ॲड. सुधीर झरकर, भाईसथ्था नाईट स्कूलचे अध्यक्ष डॉ.पारस कोठारी व मेहेर इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष जगदीश झालाणी, बी.यू.कुलकर्णी, लांडगे आदींसह सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी ॲड.. सुधीर झरकर यांनी अयोध्येत होणाऱ्या प्रभुरामाच्या भव्य मंदिराच्या उभारणीसाठी सर्वांचा हात लागण्याच्या दृष्टीने घरा घरातून निधीसंकल केले जात आहे. सर्व नागरिकांनी आपापल्यापरीने या राष्ट्रमंदिराच्या उभारणीच्या कार्यात आर्थिक योगदान द्यावे असे आवाहन केले. यावेळी कार्यक्रमस उपस्थित असलेले कर्याध्यक्ष अजित बोरा व इतरांनी त्यांच्या आवाहनास प्रतिसाद देत राम मंदिरासाठी रोख योगदान दिले.

 कार्याक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक म.द.साबळे यांनी केले, सुत्रसंचलन विठ्ठल ढगे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक सुनील सुसरे यांनी मानले. यावेळी मुख्याध्यापिका रोहिणी फळे, वर्षा कुलकर्णी, मुख्याध्यापक सुभाष येवले आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.के.डी. खानदेशे म्हणाले, ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा करतांना मागे वळून पाहीलेतर भारताने सर्व क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे,असे सांगून हिंदसेवा मंडळाच्या शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानाचे कौतुक केले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अहमदनगर हायस्कूल व झकेरीया आघाडी प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात

    वेब टीम  नगर : येथील अहमदनगर हायस्कूल व झकेरीया आघाडी प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीराम पुष्प भंडारचे मालक व सामाजिक कार्यकर्ते अभय अर्जुन दातरंगे यांच्या शुभहस्ते धवजरोहण करण्यात आले. यावेळी प्राचार्य चंद्रकांत चौगुले, शेख अन्सार, मेघा कुलकर्णी, सय्यद शहिदा, सुनंदा झरेकर, शेख समीना, शेख इर्शाद व मान्यवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

     यावेळी अभय दातरंगे यांनी आपल्या मनोगतात २६ जानेवारी१९५०पासून  भारतात लोकशाही पर्व खर्‍या अर्थाने सुरू झालं.  भारत या दिवशी लोकशाही सार्वभौम गणराज्य बनला. म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.  अनाथ मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा संस्थेचा उपक्रम खरोखर कौतुकास्पद असाच आहे. या उपक्रमांना सर्वांनी सहकार्य केले पाहिजे. असे सांगून  विद्यार्थ्यांसाठी३०० मास्क व बिस्कीट उपलब्ध करून दिले. तसेच यापुढे दरवर्षी त्यांचीं बहीण  कै. वैशाली अर्जुन दातरंगे हिच्या स्मरणार्थ दरवर्षी जून मध्ये १०००वह्या या विद्यालयाला दिले जातील असे जाहीर केले. व  प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

     यावेळी प्राचार्य चंद्रकांत चौगुले यांनी भारतीय प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय दिन हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिवस आहे. या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली होती. २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आण्यासाठी निवडण्यात आला त्याचा इतिहास उपस्थितांना सांगितला.

     याप्रसंगी मेघा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले तर आभार शेख अन्सार यांनी मानले. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शिक्षणाने समाजाची प्रगती साधली जाणार 

मल्लेश नल्ला  : लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने श्रमिकनगरच्या मार्कंडेय विद्यालयास २५ बेंचेस भेट

वेब टीम नगर : कोरोनाच्या संकटानंतर सर्वच क्षेत्रात आर्थिक परिस्थिती बिकट झाली असताना, सर्वसामान्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्‍न गंभीर होत आहे. आजची लहान मुले उद्याचे भविष्य असून, शिक्षणाने त्यांची व समाजाची प्रगती साधली जाणार आहे. ही भावना लक्षात घेऊन लायन्स क्लब वंचितांना आधार देण्याचे कार्य करीत आहे. श्रमिक कामगारांची मुले शिक्षण घेत असलेल्या मार्कंडेय शाळेस बेंच भेट देण्यात आले असल्याची भावना लायन्स क्लब ऑफ अहमदनगरचे अध्यक्ष मल्लेश नल्ला यांनी व्यक्त केली.  

 श्रमिकनगर येथील श्री मार्कंडेय विद्यालयास प्रजासत्ताक दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने 25 बेंचेसची भेट देण्यात आली. प्रारंभी लायन्स क्लबचे अध्यक्ष मल्लेश नल्ला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी  पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण सिद्दम, उपाध्यक्ष विलास पेद्राम, सचिव डॉ.रत्ना बल्लाळ, ज्येष्ठ विश्‍वस्त शरद क्यादर, खजिनदार जयंत रंगा, विश्‍वस्त सविता कोटा, राजेंद्र म्याना, जितेंद्र वल्लाकटी, महापालिकेचे सभागृह नेते मनोज दुलम, माजी नगरसेविका वीणाताई बोज्जा, श्रमिक जनता हाउसिंग सोसायटीचे चेअरमन विलास सग्गम, व्हाईस चेअरमन दत्तात्रय भीमनाथ, सचिव शंकर येमुल, लायन्स क्लबचे सचिव हेमंत नरसाळे, राजकुमार गुरुणानी, महेश पाटील, हरीश हरवानी, डॉ. सुदर्शन गोरे, संजय आडेप, मीना नरसाळे, सोनी रंगलाणी, मीना हरवानी, डॉ.हेमा सुराणा, संगीता नल्ला आदी उपस्थित होते.

विजय माळी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन या दिवसाचे महत्त्व सांगितले. पाहुण्यांचे स्वागत प्राथमिक मुख्याध्यापिका विद्या दगडे व माध्यमिक मुख्याध्यापक शशिकांत गोरे यांनी केले. जयश्री चिंतल यांनी सूत्रसंचालन केले. शाळेस बेंचस उपलब्ध करुन दिल्याबद्दल शाळेच्या वतीने लायन्स क्लबचे आभार मानण्यात आले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

टाळेबंदीतील वीज बिल प्रकरणी आश्‍वासन देऊन घुमजाव करणार्‍या  


ऊर्जामंत्री, उर्जा सचिव व महावितरणचे अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची मनसेची मागणी

पोलीस अधिक्षक कार्यालयासह शहरातील सर्व पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज

वेब टीम नगर : महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह उर्जा सचिव व महावितरणचे कार्यकारी संचालक यांच्या विरोधात संगनमत करुन मानसिक क्लेश, आर्थिक फसवणुक केल्याचा कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन व तक्रार अर्ज पोलीस अधिक्षक कार्यालयासह तोफखाना, एमआयडीसी, कोतवाली, भिंगार व नगर तालुका पोलीस स्टेशनला देण्यात आले. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर, दिपक दांगट, नितीन भुतारे, नगर तालुका पोलिस स्टेशन अ‍ॅड.अनिता दिघे, परेश पुरोहित, संकेत होशिंग, संकेत व्यवहारे, गणेश शिंदे यांनी दिले.

करोना महामारीमुळे संपुर्ण देशासह महाराष्ट्रात दि. २२ मार्च २०२० ते ८ जून २०२०दरम्यान अतिकठोर टाळेबंदी होती. या काळात महावितरण कडून वीज मिटरची रिडिंग घेण्यासाठी प्रतिनिधी पाठविण्यात आले नाही. तर वीज देयके वितरित करण्यात आले नव्हते. घरातच बंदिस्त झालेल्या जनतेला या कालावधीतल्या वीज वापरासाठी महावितरण कंपनीकडून वापरपेक्षा अधिक तिप्पट-चौपट रकमेची अवाजवी व भरमसाठ वीजबिले देण्यात आली. या वीजबिलांचे आकडेच इतके मोठे होते की ग्रामिण भागातील गोरगरीब जनतेसह शहरातील मध्यमवर्गीयांनाही भोवळच आली. कोरोना टाळेबंदीच्या दिवसांमध्ये व्यापार-उद्योग बंद होऊन असंख्य लोक बेरोजगार झालेले असताना आणि अनेकांच्या पगारात २५ ते ५०टक्के कपात झाल्यामुळे उत्पन्नाचे स्त्रोत बंद झाले असताना वीजबिलांची भरमसाठ रक्कम भरणे बहुसंख्य नागरिकांना शक्यच नव्हतं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह इतरही राजकीय पक्षांनी नागरिकांमधील संतापाची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे वीजबिलांबाबतच्या तक्रारी मांडल्या. त्यानंतर ऊर्जामंत्री, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि वीज कंपन्यांचे प्रमुख अधिकारी यांच्यात अनेकदा बैठकाही झाल्या. प्रत्येक बैठकीनंतर वीजबिलात कपात करण्याबाबतचा निर्णय लवकरच घेऊ आणि नागरिकांना दिलासा देऊ असं आश्‍वासन उर्जामंत्र्यांनी दिलं. तशा बातम्या देखील प्रसिध्द झाल्या. ऊर्जामंत्री यांनी दिलेले आश्‍वासन पाळतील आणि वीजबिलांत कपात होऊन करोना संकटकाळात थोडासा आर्थिक दिलासा मिळेल, या आशेवर राज्यातील नागरिक विसंबून होते. मात्र ऊर्जामंत्र्यांनी अचानक घुमजाव केलं आणि प्रत्येक वीजग्राहकाला वीजबिल भरावेच लागेल असं फर्मान काढल्याने सर्वसामान्य जनतेचा हा विश्‍वासघात असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

गेल्या सहा महिन्यांतील आश्‍वासनं आणि विश्‍वासघाताचा हा घटनाक्रम लक्षात घेतला तर राज्यातील जनतेची आर्थिक फसवणूक कशी करण्यात आली, हे लक्षात येते. राज्यातील नागरिकांना-ग्राहकांना अवास्तव अशी भरमसाठ वाढीव वीजबिलं पाठवणे, वीजबिलांमध्ये दिलासा देण्याचं खोटं आश्‍वासन देऊन सर्वसामान्य जनतेला महिनोनमहिने झुलवत ठेवणं आणि शेवटी राज्यातील सर्वसामान्य जनतेला वीज खंडित करण्याच्या धमक्या देऊन बेहिशोबी वीजबिलांची रक्कम वसूल करणे ही केवळ राजकीय आश्‍वासनाची फसवणूक नाही, तर वीज कंपन्यांशी संगनमत करुन करण्यात आलेली जनतेची आर्थिक लूट असल्याचा आरोप मनसेच्या वतीने करण्यात आला आहे. या दुटप्पी धोरणामुळे राज्यातील गोरगरीब जनता भयभित झाली असुन, प्रचंड मानसिक तणावात आहे. लुबाडणुकीचा कट रचणारे राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह महावितरण कंपनीचे प्रमुख अधिकारी यांच्याविरोधात फसवणुक व मानसिक त्रास पोहोचविण्याचा फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेच्या पदाधिकार्‍यांनी केली आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

केंद्रीय कृषी कायद्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे किसान बाग आंदोलन

वेब टीम नगर : वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशावरून नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मुस्लिम समाजाच्या वतीने शाहीन बागच्या धर्तीवर किसान बाग आंदोलन करण्यात आले.  

केंद्राच्या शेतकरी विरोधी ३ कायद्याच्या विरोधात गेल्या २ महिन्यांपासून देशातील शेतकरी दिल्लीत आंदोलन करीत आहेत. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर बेछूट गोळीबार करणाऱ्या केंद्र सरकारचा यावेळी तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव प्रा. किसन चव्हाण, प्रदेश प्रवक्त्या दिशा ताई शेख, ॲड. डॉ. अरुण जाधव, जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे, जिल्हा महासचिव योगेश साठे, अरविंद सोनटक्के, प्रकाश बापू भोसले, अहमदनगर दक्षिण चे जिल्हा संघटक फिरोज भाई पठाण, उपाध्यक्ष बंन्नो भाई शेख, शेवगाव तालुकाध्यक्ष प्यारेलाल भाई शेख, जामखेड तालुकाध्यक्ष अतिष पारवे यांच्यासह नगर, शेवगाव व जामखेड तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच मुस्लिम समाजातील बंधू-भगिनी यावेळी उपस्थित होत्या.

दिल्ली येथे  केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सलीम भाई जिलानी, अफसर पठाण, राजुभाई शेख, फकीर भाई शेख, छबु भाई शेख, हुसेन भाई शेख, मिठू भाई शेख, मुफ्ती साहेब शेख, मन्सूर भाई शेख, अनिस सय्यद, फकीर शेख, शाहजहान शेख, तबससुम खान आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

काँग्रेस शहरात यापुढे सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करणार 

किरण काळे : नवनियुक्त पदाधिकार्‍यांचा पदग्रहण सोहळा  

वेब टीम नगर  : नगर शहरामध्ये नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. मनपा नागरिकांच्या प्रश्नांबाबत पूर्णतः असंवेदनशील आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अशावेळी नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम करावे. नगरकरांच्या हितासाठी सर्वसामान्य जनतेचा आवाज बनत शहरात यापुढे काँग्रेस सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करेल, असे प्रतिपादन शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे. 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या मान्यतेने तसेच आ. डॉ. सुधीर तांबे, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच शहर जिल्हा कॉंग्रेस कार्यकारिणी, ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष, विविध सेल अध्यक्ष यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली होती. या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांचा काळे यांच्या हस्ते सत्कार करीत पदग्रहण समारंभ नुकताच काँग्रेस कार्यालयात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

 काळे म्हणाले की, मनपात जिरवा जिरविच्या राजकारणात सत्ता स्थापन करताना तत्वांचे जोडे बाहेर काढून ठेवण्यात आले आहेत. केवळ मूठभर लोकांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी शहरातील सर्वसामान्य नागरिकांची मात्र दैनंदिन नागरी सुविधांसाठी ससेहोलपट होत आहे. नागरिकांच्या दुरावस्थेला वाचा फोडण्यासाठी शहरात विरोधी आवाज उरलेला नाही. त्यामुळे जनतेचा आवाज बनण्याचे काम काँग्रेस पक्ष शहरात इथून पुढे करेल, असे काळे म्हणाले.

यावेळी जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, ब्लॉक अध्यक्ष मनोज गुंदेचा, काँग्रेसचे नेते फारुक शेख, खलील सय्यद, निजाम जागीरदार, चिरंजीव गाढवे, नीता बर्वे, प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, मुबीन शेख, प्रा.डॉ. बाळासाहेब पवार, कौसर खान, दानिश शेख आदींनी मनोगत व्यक्त केले. 

यावेळी पदाधिकाऱ्यांनी पक्षाने जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांना कार्यकारणीमध्ये संधी दिल्याबद्दल नेत्यांचे आभार मानले. किरण काळे यांच्या रूपाने पक्षाला अनेक वर्षानंतर नगर शहरामध्ये दूरदृष्टी असणारे, निर्भीड आणि धडाडीचे नेतृत्व मिळाले आहे, अशी भावना यावेळी सर्वच वक्त्यांनी व्यक्त केली.

शहर जिल्हा सचिव अन्वर सय्यद यांनी सूत्रसंचालन केले. आभार अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख यांनी मानले. 

यावेळी अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख, क्रीडा शहर जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील, अनंतराव गारदे, रियाज शेख, आय.जी. शहा, मोहनराव वाखुरे, अनिसभाई चुडीवाल, सुजित जगताप, साहिल शेख, नलिनीताई गायकवाड, नीता बर्वे, सुनिता बागडे, जरीना पठाण, उषा भगत, शबाना सय्यद, शिक्षक काँग्रेसचे प्रसाद शिंदे, ॲड.चेतन रोहकले, ॲड.अजित वाडेकर, अन्वर शेख, मुबीन शेख, गणेश आपरे, प्रशांत वाघ, शंकर आव्हाड, सिद्धेश्वर झेंडे, ॲड. सुरेश सोरटे, डॉ.साहिल सादिक, नासिर बागवान, अजय मिसाळ आदींसह नवनियुक्त पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------


Post a Comment

0 Comments