शेतकरी मोर्चा दिल्लीत धडकला

 शेतकरी मोर्चा दिल्लीत धडकला 

    वेब टीम नवी दिल्ली : कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या वेशींवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. जवळपास गेल्या 60 दिवसांपासून शेतकरी कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेड काढून आपलं आंदोलन सुरु ठेवलं आहे. सिंघू बॉर्डर आणि धंसा बॉर्डरहून ट्रॅक्टर परेडला सुरुवात झाली आहे. परंतु, यावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाल्याचं दिसून आलं असून काही शेतकरी आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळाल तर काही ठिकाणी अश्रू धुराची नळकांडी फोडल्याच समजतंय. 

 रॅलीला सुरुवात झाल्यानंतर दिल्लीच्या दिशेने निघालेल्या हजारो शेतकऱ्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्टस तोडले. बॅरिकेट्स तोडून शेतकरी दिल्ली हद्दीवर दाखल झाले आहेत. राजपथावरील संचलन पार पडल्यानंतर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यास शेतकऱ्यांना परवानगी देण्यात आली होती. परंतु, शेतकऱ्यांनी काही वेळ आधीच आपल्या ट्रॅक्टर परेडला सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं.

दिल्ली-हरियाणाच्या टिकरी बॉर्डरवर शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांनी सुरक्षेसाठी उभारलेले बॅरिकेट्स शेतकऱ्यांनी तोडले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे शेतकरी पंजाबमधील किसान मजदूर संघर्ष समितीचे असल्याची माहिती मिळत आहे. संयुक्त किसान मोर्चाने अद्याप मोर्चासाठी सुरुवात केलेली नाही. दरम्यान टिकरी बॉर्डरवर शेतकरी नेत्यांनी आंदोलकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. पोलिसांसोबत बैठक घेऊन आंदोलनाची वेळ ठरवली जाईल अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

दरम्यान, शेतकरी नेत्यांनी आज सकाळी 10 वाजता नऊ ठिकाणी ट्रॅक्टर परेड सुरु करण्याची घोषणा केली होती. ढांसा, चिल्ला, शाहजहांपूर , मसानी बराज, पलवल आणि सुनेढा बॉर्डरवरही ट्रॅक्टर परेड सुरु करण्याची घोषणा केली होती. सुप्रीम कोर्टाने मध्यस्थी करण्यास नकार दिल्यानंतर दिल्ली पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून दिल्लीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


                              

Post a Comment

0 Comments