मूलमंत्र आरोग्याचा : योगसाधना,आरोग्य आहार

 मूलमंत्र आरोग्याचा 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

योगसाधना 
परीवृत्त पार्श्वकोणासन

परीवृत्त म्हणजे फिरविलेला किंवा मागे वळवलेला पार्श्व म्हणजे कूस  किंवा बाजू

पद्धती :

 १) ताडासनात उभे रहा दीर्घ श्वास घ्या आणि एक उडी मारून पावला मध्ये चार ते साडेचार फूट अंतर ठेवून उभे रहा दोन्ही बाजूंनी हात खांद्याच्या रेषेत आणा  तळहात जमिनीकडे वळवा.  

२) उजवे पाऊल नव्वद अंशांनी उजवीकडे वळवा आणि डावे पाऊल ६०अंशानी उजवीकडे ,डावा पाय ताणलेला आणि गुडघ्याशी  घट्ट आवळलेला असू द्या मांडी आणि पोटरी एकमेकांशी काटकोन करतील अशी उजवी मांडी जमिनीशी समांतर राहील अशा बेताने वाकवा.  

३) श्वास सोडा  धड डाव्या  पाया सहित असे वाकवा की डावा हात उजव्या गुडघ्यावर येईल डावी खाक उजव्या गुडघ्याच्या बाहेरील भागावर टेकवा आणि डावा हात उजव्या पावलांच्या बाहेर कडेशी  जमिनीवर ठेवा. 

४) पाठीच्या कण्याला(उजवीकडे ) कसून वळवा अडवा आणि दाखवल्याप्रमाणे उजवा हात उजव्या कानावर येउ द्या लांब ताणलेल्या उजव्या हाताच्या दिशेने दृष्टी लावा, डावा गुडघा सगळा वेळ घट्ट आवळलेला असू द्या. 

५) समतोल व दीर्घ श्वसन करत अर्धा ते  एक मिनिट उभे रहा श्वास घ्या आणि डावा तळहात जमिनीवरून उचला धड वर उचला उजवा पाय ताठ करून आणि हात वर करून स्थितीत या. श्वास सोडून या स्थिती उलट म्हणजे डाव्या बाजूने करा . 

६) जेव्हा-जेव्हा आसनाच्या कृती प्रथम एका बाजूने आणि नंतर दुसऱ्या बाजूने करायचे असतात तेव्हा प्रत्येक बाजूकडील कृतीत समान वेळ द्या हा नियम येथेही लागू आहे . 

परिणाम : हे आसन  परिवृत्त त्रिकोणासन यापेक्षा अधिक अवघड व अधिक परिणामकारक  असून या आसनात  गुडघ्या मागील शिरा परीवृत्त  त्रिकोणासना  इतक्या ताणला जात नाहीत . पोटावरील अवयव अधिक आकुंचन पावतात  त्यामुळे पचनाला मदत होते पोटावरील अवयवांत भोवती आणि पाठीच्या कण्या भोवती रक्‍ताभिसरण अधिक चांगल्या रीतीने होऊ लागते या विभागांना नवजीवन लागते मोठ्याआतड्यातून मळ  निघून जाण्यात या आसना मुळे मदत होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आरोग्य आहार 
पिन व्हील सॅन्डविच 

साहित्य : स्लाइस न केलेला ब्रेडचा लोफ,सॅन्डविच चटणी,५०ग्राम बटर ,टोमॅटो सॉस, एक पातळ मलमलचे कापड 

कृती : ब्रेडचा लोफच्या लांब लांब कापून ४ पट्या कापून घ्याव्या व चारही बाजूंनी थोड्या कडा कापून घ्याव्यात. 

एक एक लांब स्लाइस घ्यावी व त्याला बटर व चटणी सर्वत्र एकसारखी लावून त्यावर २ चमचे टोमॅटो सॉस लावावे व मलमलच्या ओल्या कापडावर स्लाइस ठेवावी. कापडाच्या सहाय्याने स्लाईसच्या रुंदीच्या बाजूने ब्रेड गोल घट्ट गुंडाळावा व कापड तसाच बांधून फ्रिज मध्ये १ तासासाठी ठेवावा. चारही स्लाइसच्या गुंडाळ्या करून करून फ्रिज मध्ये ठेवाव्यात. 

१ तासानंतर फ्रिज मधून काढून अर्धा इंचाचे गोल तुकडे करून सॉस , चटणी किंवा जॅम सोबत सर्व्ह करावेत. 

टीप : स्लाईसचे रोल घट्ट करावेत , नाहीतर कापताना रोल उलगडतो.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments