मूलमंत्र आरोग्याचा : योगसाधना ,आरोग्य आहार

 मूलमंत्र आरोग्याचा 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 योगसाधना 
उत्थित पार्श्व कोनासन

पार्श्व म्हणजे ऊस किंवा बाजू

 पद्धती : 

१.ताडासनात उभे रहा दिर्घ श्वास घ्या आणि उडी मारून पाय बाजूला फाकवून पावलांमध्ये चार ते साडेचार फूट अंतर ठेवून उभे रहा. दोन्ही बाजूंनी हात उंचावून होऊन खांद्याच्या रेषेत आणा.  तळहात जमिनीकडे वळलेले असू द्या. 

२.श्वास  संथपणे बाहेर टाकत उजवे पाउल ९० अंशांनी उजवीकडे वाळवा व डावे पाउल थोडसे उजवीकडे वळवा. डावा पाय लांब ताणलेला आणि गुडघे अशी घट्ट आवडलेला असू द्या मांडी आणि पोटरी एकमेकींशी काटकोन करतील आणि उजवी मांडी जमिनीशी समांतर राहील अशा बेताने उजवा पाय गुडघ्यात वाकवा. 

 ३.  उजव्या पायाच्या कडेशी उजवा तळ हात जमिनीवर टेकवा म्हणजे उजवी खाक उजव्या गुडघ्याच्या बाहेरील बाजू झाकेल आणि त्यालगत राहील. डावा हात डाव्या कानाच्या वर लांबवा डोके उंचावुन ठेवा. 

४.गुडघ्या मागची धोंड शिर ताणा छाती आणि पाय एका रेषेत असू द्या त्यासाठी छाती पुढे काढून वरून मागे वळवा शरीराच्या प्रत्येक अवयवाला ताण द्या सबंध शरीराची मागची बाजू विशेषतः पाठीचा कणा ताणला जाऊ द्या कण्याला इतका ताण द्या की सर्व मणके आणि बरगड्या हलल्या पाहिजेत आणि काकडी घेतली जात आहे असे वाटले पाहिजे 

५.या स्थितीत अर्धे ते एक मिनिट उभे राहा समतोल व दीर्घ श्वसन करीत राहा श्वास घेऊन उजवा तळहात जमिनीवरुन उचला. 

 ६.श्वास घ्या उजवा पाय ताठ करा आणि क्रमांक १ मधील स्थितीप्रमाणे हात उचला श्वास सोडून हीच कृती डाव्या बाजूने करा. 

७. श्वास सोडा आणि उडी मारून ताडासनाची स्थिती घ्या . 

परिणाम : 

या आसनामुळे घोटे गुडघे व मांड्या सुदृढ बनतात पोटऱ्या आणि मांड्या यामधील विकृती नाहीशी होते छाती मजबूत होते आणि कंबरेचा मेद कमी होतो तसेच सायटिका आणि संधिवात याच्या वेदना कमी होतात.आतड्याचे कार्य या आसनामुळे सुधारते आणि मलोत्सर्ग सहजसुलभतेने होऊ लागतो.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आरोग्य आहार 
क्लब सॅन्डविच 

साहित्य : सॅन्डविच ब्रेड ,ब्राऊन ब्रेड ,  हिरव्या रंगाची चटणी , ५० ग्राम बटर  , पाव किलो टोमॅटोच्या चकत्या ,१०० ग्राम चीज 

कृती :   ब्रेडच्या स्लाइस ला बटर व चटणी लावून लावून त्यावर ब्राऊन ब्रेडचा १ स्लाइस लावावा. 

ब्राऊन  ब्रेड वर टोमॅटोच्या चकत्या व किसलेले चीज घालवे व वरती ब्रेडचा स्लाइस ठेवावा. असे सर्व सॅन्डविच करावेत व ब्रेडच्या कडा कापून मधोमध तिरका कापून घ्यावा. 

टीप ; ब्राऊन ब्रेड वापरल्याने सॅन्डविच पौष्टिक तर होतेच पण रंगाच्या आकर्षणाने मुले आवडीने खातात.     


Post a Comment

0 Comments