मनसेच्या आक्रमक भूमिकेमुळे रुग्णालयांकडून वसुली करण्याची हमी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली

मनसेच्या आक्रमक भूमिकेमुळे रुग्णालयांकडून वसुली करण्याची हमी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली 

वेब टीम नगर : कोरोनाबांधीत रुग्णांकडून शहरातील काही खाजगी रुग्णालयाकडून जास्त बिल घेण्यात आले होते. या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांच्या अहमदनगर जिल्हा दौऱ्याच्या दरम्यान बॅनरबाजी करण्याची आक्रमक भूमिका घेतल्याने जिल्हा प्रशासनाने याची दखल घेऊन मनसे पदाधिकाऱ्यांशी आज चर्चा करून हॉस्पिटल कडून रक्कम वसूल करण्याची जबाबदारी मनपा आयुक्त तथा जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी स्वीकारली असून त्याच बरोबर मनसेच्या शिष्ठ मंडळाची शरद पवार यांच्याशी भेट घडविण्याचे आश्वासनही मनसे पदाधिकाऱ्यांना पोलीस अधीक्षक पाटील यांनी दिले.

यावेळी मनसे चे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ नितीन भुतारे, ॲड अनिता दिघे, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ अनिल बोरगे , तसेच सुरभी रुग्णालयाचे डॉक्टर -संचालक आदी उपस्थित होते. 

शहरातील १३ खासगी रुग्णालयांनी कोरोना प्रादुर्भावाच्या काळात कोरोना रुग्णांची ठरवून दिलेल्या पेक्षा जास्त रक्कम आकारून लूटमार केल्याचे भरारी पथकाच्या अहवाला नंतर सिद्ध झाले त्यात या १३ रुग्णालयांकडून सुमारे ८३ लाख रुपयांचा परतावा रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना आकारल्याचे निष्पन्न झाल्याने या सर्व रुग्णालयांना मनपाने वारंवार नोटिसा देऊनही  या रुग्णालयांनी त्याकडे डोळे झाक केली . अखेर मनपाने या रुग्णालयांचे परवाने रद्द करण्याचीही नोट्स काढली तिचीही मुदत संपली तरीही या रुग्णालयांनी अद्याप पैसे परत केलेले नाहीत. अश्यातच सुरभी रुग्णालयाच्या एक्सटेन्शनचे उदघाटन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार येत असल्याने हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

त्यामुळे आता शरद पवार यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

         


Post a Comment

0 Comments