नगरटुडे बुलेटीन 22-01-2021

 नगरटुडे बुलेटीन 22-01-2021

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 शिक्षणाचा आरोग्य सेवेत निश्‍चित फायदा होईल

 डॉ.संदिप सांगळे : जि.प.तील आरोग्य अधिकार्‍यांची पदव्युत्तर पदवीसाठी निवड

    वेब टीम  नगर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील डॉक्टर्स आपआपल्या भागात नागरिकांना चांगली सेवा देत आहेत. ही सेवा देत असतांना ते आपले पुढील शिक्षण घेत असल्याने याचा फायदा आपल्या आरोग्य सेवेत निश्‍चित होईल, असे सांगून पुढील शिक्षणासाठी कार्यमुक्त केलेल्या डॉक्टरांना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदिप सांगळे यांनी शुभेच्छा दिल्या.

          पदव्युत्तर पदवी/पदविका अभ्यासक्रमाकरीता नीट पीजी-२०२० साठी अहमदनगर जिल्हा परिषद आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकार्‍यांची  पदव्युत्तर पदवीसाठी निवड झाली आहे. यामध्ये नगर तालुक्यातील जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.धनंजय खंडागळे यांनी एम.डी.(भुलतज्ञ) ही पदवी व खातगांव टाकळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.निलेश कोल्हे यांनी डी.ए.(भुलतज्ञ) ही पदविका तर पाथर्डी तालुक्यातील तिसगांव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.भास्कर लाखुळे यांनी न्यूक्लेअर मेडिसिन या पदवीसाठी प्रवेशिका मिळविली आहे.

          या यशस्वी डॉक्टरांचा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदिप सांगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राहाता तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रमोद म्हस्के, वरिष्ठ सहाय्यक महेश येनगंदुल, कैलास डावरे, संख्याकि अधिकारी गलधर, आरोग्य सेवक निलेश राजापुरे  आदि उपस्थित होते.

     सत्काराला उत्तर देतांना  डॉ.धनंजय खंडागळे म्हणाले, अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात सेवा देत असतांना अनेक अनुभव येत असतात. शासनाच्या निर्देशानुसार सेवा देत असतांना ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकांना आरोग्य सेवा मिळाली पाहिजे यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य सेवक काम करत आहेत. ही सेवा देत असतांना जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदिप सांगळे यांच्या मार्गदर्शनाचा मोठा फायदा होत आहे. आता त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्हा डॉक्टरांना पुढील शिक्षण घेण्याचीही संधी मिळाली आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अहमदनगर शुटींग क्लबच्या ११ खेळाडूंची राष्ट्रीय पातळीवर निवड

    वेब टीम  नगर : नुकत्याच औरंगाबाद येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय महाराष्ट्र एअर गन स्पर्धेत अहमदनगर शुटींग क्लबच्या ११ खेळाडूंनी आपल्या खेळाचे शानदान प्रदर्शन करत यश संपादन केले. या खेळाडूंची राष्ट्रीय स्तरावर होणार्‍या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

     औरंगाबादसह सहा ठिकाणी झालेल्या या स्पर्धेत अहमदनगर शुटींग क्लबच्या १७ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यातील ११ खेळाडूंची निवड सब राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे. यामध्ये गौरव खेडकर, यश गव्हाणे, केदार साठे, देवेश चतुर, ओम सानप, सुमित वैरागर, राजश्री फटांगडे, रोहिणी कातुरे, प्राची शिंदे, सुनिता काळे, विना पाटील आदिंनी उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय स्पर्धेत आपले स्थान मिळविले. तर राज फटांगडे, जयदिप आगरकर, यश कदम, पार्थ छाजेड, ओम गोसावी, मंजू खाडे आदिंनीही चांगले गुण मिळविले. सर्व खेळाडूंना क्लबचे प्रशिक्षक अलिम शेख, ऋषीकेश दरंदले यांचे मार्गदर्शन लाभले.

     अहमदनगर शुटींग क्लबच्या खेळाडूंनी मिळविलेल्या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील, क्रीडा अधिकारी दिपाली बोडके, कबड्डी प्रशिक्षक ज्ञानेश्‍वर खुरंगे, विशाल गर्जे, अध्यापिका विद्यालयाच्या प्राचार्या भिंगारदिवे, प्रा.संजय साठे, घन:श्याम सानप, पालकवर्ग आदिंनी अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत. 

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

स्वच्छता हा निरोगी आरोग्यचा मंत्र 

 प्रा.डॉ.जीवन सोळंके : नगर महविद्यालयातील एनएसएसचे ऑनलाईन ’स्वच्छ व स्वस्थ भारत अभियान व युवक’ व्याख्यान

    वेब टीम  नगर : युवकांनी स्वतः समाजकार्यात समर्पण, सेवा, त्याग भावनेने स्वच्छ व सशक्त भारत निर्मितीसाठी योगदान दिले पाहिजे. आपल्या अनुभवातून सामाजिक कार्यात उतरण्यासाठी युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे.  याद्वारे सक्षम भारत निर्माण होण्यास मदत होणार आहे. अहमदनगर कॉलेजचे एन.एस.एस.मधील योगदान संपूर्ण युवकांना प्रेरणादायी आहे. त्याचबरोबर प्रत्येक महिन्याला आपले घर स्वच्छ ठेवण्याबरोबर परिसर व सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करण्याची जबाबदारी स्वीकारावी. या स्वच्छतेमुळे आजारांची संख्या कमी होते. परिणामी परिवारातील हॉस्पिटलचा खर्च कमी होतो. निरोगी आरोग्य ही आपल्या देशाची खरी संपत्ती आहे. स्वच्छता हा निरोगी आरोग्यचा मंत्र आहे,  असे प्रतिपादन नाशिक येथील बी.आर.देशमुख महिला महाविद्यालयातील प्रा.डॉ.जीवन सोळंके यांनी मांडले.

     अहमदनगर महविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी कल्याण मंडळ व अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त युवा सप्ताहानिमित्त गुगल मीट एप्सद्वारे ऑनलाईन ’स्वच्छ व स्वस्थ भारत अभियान व युवक’ या विषयावर आयोजित व्याख्यानात प्रा.डॉ.जीवन सोळंके बोलत होते.

       अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अहमदगनर उपकेंद्र संचालक प्रा.डॉ.एन.आर.सोमवंशी, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.वी.नागवडे, उपप्राचार्य प्रा.डॉ.बी.एम.गायकर, उपप्राचार्य डॉ.सय्यद रज्जाक, रजिस्टार ए.वाय.बळीद यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास ईटीआय प्रमुख डॉ.शरद बोरूडे, डॉ.माधव शिंदे, डॉ.साताप्पा चव्हाण, प्रा.गजानन घुमरे आदि सहभागी झाले होते.

     पाहुण्यांचा परिचय अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.पराग कदम यांनी करुन दिला. प्रास्ताविक विद्यार्थी कल्याण मंडळ अधिकारी डॉ.भागवत परकाळ यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे  सुत्रसंचालन विद्यार्थीनी संस्कृती पारखे  हीने केले. आभार एन.एस.एस.कार्यक्रम अधिकारी प्रा.अशोक घोरपडे यांनी केले. ऑनलाईन कार्यक्रमात महाविद्यालयातील शेख सादिया, अपूर्वा लहांडे, चव्हाण अक्षय, श्‍वेता यादव, वैभव अनारसे, शीतल दहीफळे, निलेश फसले, विशाखा पोखरकर, तेजस्वीनी परभणे इ. विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मनपाच्या ब्लॅड बँक खाजगीकरणाची मंजुरी रद्द करावी

शिवराष्ट्र सेनेची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

    वेब टीम  नगर : अहमदनगर महानगरपालिकेचे मावळते आयुक्त यांनी ब्लड बँक खाजगीकरण करण्याची प्रक्रियावर दि.३१तारखेलास दिलेली मंजुरी रद्द करण्यात यावी, या मागणीचे निवेदन शिवराष्ट्र सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी तथा आयुक्त यांना देण्यात आले. याप्रसंगी पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे, दलित आघाडी जिल्हाध्यक्ष अनिल शेकटकर, बाबा करपे, शंभु नवसुपे, गणेश शेकटकर, समीर खडके, अक्षय कांबळे आदि उपस्थित होते.

     जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महानगर पालिका क्षेत्रात बर्‍याच वर्षांपासून सेवा देणार्‍या महानगरपालिकेच्या बाळासाहेब देशपांडे ब्लॅड बँक खाजगी तत्वावर देण्याचा घाट मावळते आयुक्त व काही सहकारी यांनी केले आहे. ही प्रक्रिया दि. ३१ डिसेंबर२०२० रिटायर्ड होण्याची शेवटची तारखेस बहुतांशी फाईलीवर सह्या करताना ब्लड बँकेच्या खाजगी करणाच्या मंजुरीसही सही केली आहे. विशेष म्हणजे इतर पुणे, नाशिक, मुंबई या मनपात स्वत: प्रशासन ब्लड बँक चालवते हे विशेष आहे. नगर शहरातील ६ ते ७ लाख नागरिक विविध मनपाचा कर भरतात त्या बदल्यात महानगरपालिकेकडून त्यांना माफक दरात रक्ताची बाटली मिळणे जरुरीचे आहे.

     यापुढे खाजगीकरणात ब्लड बँक चालविण्यास दिल्यास जी ३५० रु. रक्ताची बाटली मनपा देत होती, तीच रक्ताची बाटली खाजगी ब्लड बँक १४५० रुपयांना दिली जाईल. हा मोठा नागरिकांवर अन्य होईल. याचे कारण म्हणजे शासनाने मनपास २२ कामगारांचेग्रॅण्ट दिलेली आहे. व शासनाकडून मोफत औषधे सुद्धा मिळतात. तसेच मोठ-मोठी मशनरी सुद्धा शासनाने स्वत:च्या खर्चातून दिलेली आहे. तसेच जी ब्लॅड बँक आज वास्तूत उभी आहे ती वास्तू कै.बाळासाहेब देशपांडे यांनी मोफत दान केलेली आहे. यात त्यांचा जो उद्देश होता, तो धुळीस मिळणार आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजयेपी यांनी या ब्लड बँकेचे उद्घाटन केले आहे.

     तरीही नागरिकांच्या फायद्याची ब्लड बँक काही सहकारी, खाजगी तत्ववार देत आहे. मग मनपाचा विविध पदाचा स्टाफ इतर ठिकाणी देऊन नुसता बसून ठेवायचा का? त्यामुळे मावळते आयुक्त साहेबांनी घाई-घाईने घेतलेली मंजुरी रद्द करुन मनपाने त्या जागी स्वत: ब्लड बँक चालू करावी, अन्यथा शिव राष्ट्र सेनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, याची सर्व जबाबदारी मनपा प्रशासनाची राहील, असेही निवेदनात म्हटले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शेतकरींप्रती बांधिलकी दर्शवित सरकारी कर्मचार्‍यांनी पाळला एकजुट दिवस

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना अहमदनगर जिल्हा शाखेच्या वतीने निवेदन

वेब टीम नगर : दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकरी बांधवांप्रती बांधिलकी दर्शवित देशात सरकारी कर्मचार्‍यांच्या वतीने गुरुवारी (दि.२१ जानेवारी) एकजुट दिवस पाळण्यात आला. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना अहमदनगर जिल्हा शाखेच्या वतीने एकजुट दिनानिमित्त शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवित आंदोलक शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य करण्याचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर, सरचिटणीस रावसाहेब निमसे, भाऊसाहेब डमाळे, कैलास साळूंके, पुरुषोत्तम आडेप आदी उपस्थित होते.    

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीच्या सीमेवर मागील दोन महिन्यापासून अन्नदाता शेतकर्‍यांचे नवीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी आंदोलन सुरु आहे. केंद्र शासनाच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे यावर तोडगा निघण्यास तयार नाही. केंद्र सरकारसोबत शेतकरी नेत्यांचा आतापर्यंत नऊ अनिर्णीत चर्चांच्या फेर्‍या पार पडल्या. सर्व आंदोलक देशातील शेतकरी असल्याचे सरकारने मान्य केले असले तरी सरकार फक्त आंदोलकांना चर्चेसाठी बोलावत असून, यावर मार्ग काढला जात नाही. शेतकर्‍यांच्या समस्या सोडवण्यासाठी समाधानकारक ठोस भूमिका अद्याप घेण्यात आलेली नाही. थंडी, ऊन, वारा व पाऊसात जीवाची पर्वा न करता शेतकर्‍यांनी हे आंदोलन सुरु ठेवले आहे. यामध्ये शेतकरी पुरुष महिला व त्यांचे कुटुंबीय देखील उतरले आहेत. देशात हे विदारक चित्र असून, शेतकर्‍यांप्रती सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन सरकारी कर्मचारी त्यांना एकजुटीने पाठिंबा दर्शवीत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.  

अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या आदेशानुसार संपुर्ण देशात शेतकरी बांधवांप्रती बांधिलकी जपण्यासाठी एकजुट दिवस पाळण्यात आला आहे. यामध्ये राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना अहमदनगर जिल्हा शाखा सहभागी होऊन दिल्ली येथील आंदोलक शेतकर्‍यांच्या मागण्या पुर्ण करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाच्या

विश्‍वस्तपदी राजेंद्र म्याना , जितेंद्र वल्लाकटी यांची नियुक्ती

वेब टीम नगर : येथील पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकारणीची बैठक नुकतीच पार पडली. यामध्ये दोन रिक्त असलेल्या संस्थेच्या विश्‍वस्तपदी राजेंद्र दत्तात्रय म्याना व जितेंद्र अशोक वल्लाकटी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

या दोन्ही विश्‍वस्तांचे ज्येष्ठ विश्‍वस्त शरद क्यादर, प्रा. बाळकृष्ण सिद्दम, विलास पेद्राम, डॉ. रत्ना बल्लाळ, जयंत रंगा, सविता कोटा या विश्‍वस्तांनी तसेच श्री मार्कंडेय विद्यालयाचे मुख्याध्यापक दिपक रामदीन, विद्या दगडे, शशिकांत गोरे, श्रीनिवास मुत्याल, उपमुख्याध्यापक पांडुरंग गोने, पर्यवेक्षिका सरोजि नी रच्चा आदींनी अभिनंदन केले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

संभाजी विडीचे साबळे विडीत नामांतर

 विडीच्या नवीन नावाच्या पॅकिंगचे अनावरण

वेब टीम नगर : विडी उत्पादन करीत असलेल्या साबळे वाघीरे आणि कंपनीने संभाजी विडीचे नामांतर साबळे विडी केले असून, या विडीच्या नवीन नावाच्या पॅकिंगचे अनावरण नुकतेच केडगाव रोड, रेल्वे स्टेशन येथील कंपनीच्या आवारात करण्यात आले. यावेळी कंपनीचे व्यवस्थापक बाबू शांतय्या स्वामी, लाल बावटा विडी कामगार युनियनचे जनरल सेक्रेटरी अ‍ॅड.कॉ. सुधीर टोकेकर, उपाध्यक्ष भारती न्यालपेल्ली, इंटकचे शंकरराव मंगलारप, विनायक मच्चा आदींसह कामगार उपस्थित होते.

१९३२ पासून साबळे वाघीरे आणि कंपनी विडी उत्पादन क्षेत्रात कार्यरत आहे. १९५८पासून कंपनीने संभाजी विडी नावाने उत्पादन सुरु केले होते. मात्र काही कारणास्तव २४ डिसेंबर २०२० पासून संभाजी विडीचे नांवात बदल करण्यात आला आहे. अहमदनगर शहरात मागील ७० वर्षापासून कंपनी विडीचे उत्पादन करीत असून, कंपनीच्या १२ शाखा शहरात कार्यरत आहे. तर तीन ते चार हजार विडी कामगारांना रोजगार कंपनी देत आहे. विडी कंपनीने संभाजी विडीचे नांव बदलून साबळे विडी हे स्वत:चे नांव दिले आहे. विडीचा दर्जा, पान व तंबाखू तीच राहणार असून, फक्त नांव बदलण्यात आले असल्याची माहिती नगरच्या कंपनीचे व्यवस्थापक बाबू शांतय्या स्वामी यांनी दिली.  

स्वारगेट पुणे येथे कंपनीचे मुख्य कार्यालय असून, महाराष्ट्र व आंध्रप्रदेशात या विडीचे उत्पादन केले जाते. तर संपुर्ण देशात या विडीची विक्री केली जात आहे. २४ जानेवारीपासून संभाजी विडी साबळे विडी म्हणून ग्राहकांना मिळणार असल्याचे यावेळी स्वामी यांनी स्पष्ट केले. अ‍ॅड. सुधीर टोकेकर यांनी काही कारणांनी कंपनीने फक्त नांव बदलले आहे. या कंपनीने मागील ७० वर्षापासून अनेक विडी कामगारांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. कंपनीच्या या नवीन नावाला विडी संघटनेच्या वतीने शुभेच्छा त्यांनी व्यक्त केल्या.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

राष्ट्रसंत गाडगे बाबांचा वसा युवकांनी अंगी कारावा

नंदकिशोर रासने :स्वच्छता अभियानाने राष्ट्रीय युवा सप्ताहाचा समारोप

आदिवासी युवक युवतींचा सहभाग

वेब टीम नगर  :  सदृढ, निरोगी आरोग्यासाठी वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. सर्व समाजाला स्वच्छतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत गाडगे बाबांचा वसा युवकांनी अंगी कारावा. स्वच्छता ही निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे. कोरोनाच्या संकटानंतर स्वच्छतेचे महत्त्व सर्वांना कळले असून, त्यादृष्टीने कृती होण्याची गरज असल्याची भावना जिल्हा क्रीडा कार्यालयाचे क्रीडा अधिकारी नंदकिशोर रासने यांनी व्यक्त केली. तर स्वच्छता अभियानात पुढाकार घेऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचे युवक-युवतींना त्यांनी आवाहन केले.

जिल्हा क्रीडा कार्यालय, नेहरू युवा केंद्र, सप्तशृंगी आदिवासी महिला विकास प्रतिष्ठान, जय असोसिएशन ऑफ एनजीओ (महाराष्ट्र राज्य) आयोजित राष्ट्रीय युवा सप्ताहाचा समारोप राजूर (ता. अकोले) येथे स्वच्छता अभियानाने करण्यात आला. यावेळी क्रीडा अधिकारी रासने बोलत होते.

प्रारंभी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जय असोसिएशन ऑफ एनजीओचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश शिंदे, आधारवडच्या अध्यक्षा अ‍ॅड. अनिता दिघे, सप्तशृंगी आदिवासी प्रतिष्ठानच्या मीनाताई म्हसे, नंदाताई म्हसे, अ‍ॅड. भानुदास होले, अ‍ॅड. सुनिल तोडकर, उडाण फाउंडेशनच्या अध्यक्षा आरती शिंदे, अ‍ॅड.पुष्पा जेजुरकर, पोपट बनकर, नयना बनकर, किरण सातपुते, रजनी ताठे, भीमाशंकर देशमुख, नेहरु युवा केंद्राचे तालुका समन्वयक दर्शन पंडित आदी उपस्थित होते.

मीनाताई म्हसे म्हणाल्या की, घराबरोबर सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. राष्ट्रपुरुषांची जयंती, पुण्यतिथी कृतिशीलपणे सामाजिक उपक्रमाने साजरी झाल्यास खर्‍या अर्थाने त्यांना अभिवादन ठरणार आहे. आदिवासी समाजाला प्रवाहात आनण्यासाठी सप्तशृंगी प्रतिष्ठान विविध प्रकल्प राबवित असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थितांनी स्वच्छता अभियान राबवून सार्वजनिक परिसर स्वच्छ केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती शिंदे यांनी केले. आभार राहुल मैड यांनी मानले. सप्ताह यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील, राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्‍वर खुरांगे, विशाल गर्जे, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात, लेखापाल सिद्धार्थ चव्हाण, रमेश गाडगे आदींचे मार्गदर्शन लाभले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

प्रभू श्रीरामाचे मंदिर हे स्वाभिमानाचे प्रतीक-अमोल भांबरकर                                                  

श्रीराम मंदिरासाठी युवकांचा निधी संकलनाचा संकल्प                                                                            

वेब टीम  विसापूर- श्रीराम मंदिर निर्माणासाठी सरकारी पैसे घेतले जाणार नाहीत.तसेच कोणत्याही एका परिवाराकडून बांधले जाणार नाही.संतांच्या प्रेरणेने सर्व भारतीयांचा खारीचा वाटा असावा.या हेतूने ''श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र'' न्यास तर्फे नगर जिल्ह्यात श्री राम मंदिर निर्माण निधी संकलन अभियान १  जानेवारी ते३१ जानेवारी या कालावधीत संपन्न होत आहे.सर्वांचा हातभार असावा या हेतूने गावोगावी घरोघरी जाऊन रामभक्त निधी संकलनाचे कार्य करीत आहे या कार्यात सर्व रामभक्तांनी योगदान द्यावे.प्रभू श्रीरामाचे मंदिर हे राष्ट्र मंदिर असून भारतीयांच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे.असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मीडिया प्रमुख अमोल भाबरकर यांनी केले.                                          

श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे अयोध्या येथील राम मंदिराच्या उभारणीसाठी मदत व्हावी व सतत कार्य घडावे.यासाठी विसापूर गावातील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात बैठक पार पडली.यावेळी गावात घरोघरी जाऊन भाविकांच्या इच्छा शक्तीप्रमाणे लोकवर्गणी जमा करण्याचा संकल्प युवकांनी केला.प्रारंभी काळ भैरवनाथ मंदिरात महाआरती व निधी संकलन पुस्तकांच पूजन करून निधी संकलन कार्याचा  शुभारंभ करण्यात आला.याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मीडिया प्रमुख प्रमुख अमोल भांबरकर बोलत होते.याप्रसंगी रा.स्व.संघाचे श्रीगोंदा तालुका प्रमुख संदीप चौधरी,संदेश दहिवले,सावता लबडे,अनुप शेठ घोडेकर,काका जठार,नवनाथ शिंदे,अमोल जगताप,अमोल जठार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

संदीप चौधरी म्हणाले कि,४९२ वर्षाच्या संघर्षानंतर अयोध्येत प्रभू श्रीरामाचे मंदिर होत आहे.हि सर्व भारतीयांसाठी आनंदाची बाब आहे.९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने श्रीराम मंदिराची जन्मभूमी हि रामलल्लाची आहे.हा अभूतपूर्व निकाल दिल्याने ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन होऊन श्रीराम मंदिर निर्माण कार्य सुरु झाले आहे.हा सर्वांसाठी भाग्याचा सुवर्णक्षण आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 पेंशनधारकांना ईपीएफओचे आवाहन

वेब टीम नगर : कर्मचारी भविष्य निधि संगठन भारत सरकारच्या कामगार व रोजगार मंत्रालया कडून ई.पी.एस. निवृत्ती वेतन प्राप्त करणारे सर्व निवृत्तीवेतन धारक यांना कोविड – १९च्या साथीमुळे हयातीचा दाखला जमा करण्याची अंतिम तारीख २८ फेब्रुवारी २०२१ करण्यात आलेली आहे.  ह्या वर्षापासून हयातीचा दाखल्याची वैधता पुढील एक वर्षाकारिता वैध राहील. जानेवारी २०२० नंतर पेंशन  नंबर जारी केलेले किंवा डिसेंबर २०१९  रोजी किंवा नंतरचे हयातीचा दाखला मिळालेले पेंशनधारक  यांना पूढील वर्षी त्या महिन्यात हयातीचा दाखला जमा करणे आवश्यक असल्याचे सहायक भविष्य निधि आयुक्त, जिल्हा कार्यालय, अहमदनगरचे सहायक आयुक्त अभिषेक कुमार मिश्र यांनी कळविले आहे.

ज्या पेंशन धारकानी हयातीचा दाखला मार्च 2020 ला बनविले होते त्या पेंशन धारकांना हयातीचा दाखला मार्च२०२१ला बनवावे लागेल. ज्यांचे हयातीचा दाखले बनवायचे  आहेत त्यांनी त्यांच्या बँक शाखेत किंवा जवळच्या सार्वजनिक सुविधा केंद्र(सी.एस.सी) अथवा पोस्ट ऑफिस भेटून आवश्यक कार्यवाही करावी, असे कळविण्यात आले आहे.

हयातीचा  दाखला बनविण्यासाठी पेंशन धारकांचे आधारकार्ड, मोबाईल, पी.पी.ओ. नंबर आणि पेंशन बँक  पासबुक आदी आवश्यक आहे. डीजिटल जीवन प्रमाण यशस्वी झाल्यास कोणत्याही प्रकारचे दस्तावेज पी.एफ़ कार्यालयात पाठवने बंधनकारक नाही. कोविड-१९ साथीच्या आजारापासून बचाव करण्यासाठी सुरक्षित अंतर तोंडावर मास्क वापर आणि शासनाने वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे  आवश्यक आहे. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------


Post a Comment

0 Comments