सावेडीत गुळाचा चहा फर्मचे उद्घाटन

 सावेडीत गुळाचा चहा फर्मचे उद्घाटन

श्रीनिवास बोज्जा : आमदारांच्या साक्षीने माता-पित्यांना सन्मान

वेब टीम नगर - माजी नगरसेवक श्रीनिवास बोज्जा हे चहा विक्रीच्या नव्या व्यावसयात उतरले आहेत. सावेडीत नव्या फर्मचे उद्घाटन करताना त्यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या साक्षीने माता-पित्यांना सन्मान दिला. आमदार जगताप यांनीही ‘मीपणा’ बाजुला सारत त्यांच्या सन्मानाचा आदर केला. 

सावेडी येथील प्रोफेसर चौकात आरोग्यदायी गुळाचा चहा या नव्या फर्मचे उद्घाटन बोज्जा-पासकंटी यांनी मातृ-पितृ देवोभव या उक्तीनुसार नुसार आपल्या आई-वडिलांच्या हस्ते केले. आमदार संग्राम जगताप हेही उद्घाटनाप्रसंगी उपस्थित होते. आमदार जगताप यांनीही ज्येष्ठांचा सन्मान राखताना ‘मीपणा’ बाजुला ठेवला. आमदार संग्राम जगताप यांनीही दुसरी रिबीन कापून नंतर उद्घाटन करताना आई-बाबांचा सन्मान प्रथम असा संदेश कृतीतून दिला. 


 महापौर बाबासाहेब वाकळे, पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके, लोकमत चे संपादक सुधीर लंके, नगरटाइम्सचे संपादक संदीप रोडे, पत्रकार सुदाम देशमुख,बारामतीचे राहुल खोमणे, शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, सभागृह नेता मनोज दुलम, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, तोफखाना पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, नगरसेवक कुमार वाकळे, डॉ. सागर बोरुडे, डॉ. सुमीत नलावडे, निखिल वारे, योगीराज गाडे, सुनील त्रिंबके, विनीत पाऊलबुद्धे, धनंजय जाधव, दीपाली बारस्कर,वीणा बोज्जा, सुवर्णा जाधव, दत्ता जाधव, राम नळकांडे, उदय कराळे, फटाका असोशिएशनचे सचिव संतोषशेठ  बोरा, माजी नगरसेवक किशोर डागवाले, संपत नलावडे, केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, प्रा. सिताराम काकडे, जयंत येलुलकर, सुरेश जाधव, अर्थव बोज्जा, राहुल पासकंटी, शुभम पासकंटी यावेळी उपस्थित होते.

 आमदार जगताप म्हणाले, गुळाचा चहा आरोग्यासाठी हितकारक असून गुळाचा चहा पिल्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच गोळा मुळे अनेक फायदे आपल्याला मिळतात यासाठी नागरिकांनी खोमणे आरोग्यदायी गुळाचा चहाचा स्वाद घ्यावा असे आवाहन केले. गुळाचा चहा या दालनाचे संचालक श्रीनिवास बोज्जा यांनी सावेडी उपनगर उपनगरातील नागरिकांच्या हिताचा विचार करून हे दालन चहा प्रेमी साठी सुरू केले असून याचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन केले.  बोज्जा यांचे पार्टनर तिरमलेश पासकंटी यांनी आभार मानले. नगर शहरासह सावेडी उपनगर परिसरातील डॉक्टर, वकील, इंजिनिअर याचंयासह सर्वच स्तरारील  नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments