धूमस्टाईलने मंगळसूत्र ओरबाडून दोन युवक फरार ! पोलिसांच्या कार्यक्षमातेवर प्रश्न

 धूमस्टाईलने मंगळसूत्र ओरबाडून दोन युवक फरार ! पोलिसांच्या कार्यक्षमातेवर प्रश्न 

वेब टीम नगर : हरातल्या नगर कल्याण रस्त्यालगतच्या जाधव पेट्रोल पंपामागे असलेल्या साई रुग्णालयाजवळीत विद्या कॉलनीत ॲङ. गटणे  यांची पत्नी दुचाकीवरुन  जात असता धूमस्टाईल आलेल्या दोघा दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यातले मंगळसूत्र ओरबाडून नेलं.

काळ्या रंगाच्या नवीन दुचाकीवरुन आलेल्या एका चोरट्याने आकाशी रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पँट, दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या चोरट्याने भगव्या रंगाचा शर्ट आणि पांढरी पँट असा पोषाख परिधान केलेला आहे.

दोघांच्या तोंडाला मास्क बांधलेले असून कल्याण रोड ब्रिजच्या दिशेने ते पसार  झाले. अवघ्या अर्ध्या तासात ॲङ.गटणे यांच्या पत्नीच्या गळ्यातले मंगळसूत्र धूमस्टाईल ओढून नेल्याने परिसरात खळबळ उडाली असून कोतवाली पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.

Post a Comment

0 Comments