सुप्यात घरफोडी १ लाख ५६ हजाराचा ऐवज चोरी

 सुप्यात घरफोडी १ लाख ५६ हजाराचा ऐवज चोरी 

 वेब टीम नगर : बंद असलेल्या फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडून गुपचूप प्रवेश करून घरातील सामानाची उचकापाचक करून सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ५६ हजारंचा मुद्देमाल चोरल्याची घटना सुपा येथे घडली आहे. सुपा येथील सुपा हाईट्स या अपार्टमेंटमधील आदेश दीपक  बिंगले रा. आकुर्डी पुणे हल्ली रा. सुपा यांचा ४०४ क्रमांकाचा फ्लॅट आहे.दरम्यान बिंगले हे बाहेर गेल्यामुळे त्यांच्या फ्लॅटच्या दरवाजाला बाहेरून कुलूप होते. मात्र दि. १२ ते १६ जानेवारी या काळात अज्ञात चोरटयांनी या बंद दरवाजाचे कुलूप कशाने तरी तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश केला.आत घुसल्यानंतर चोरट्यांनी घरातील सर्च साहित्याची उचकापाचक करून आत ठेवलेले १५ हजार रुपयांची रोख रक्कम व १ लाख ४१ हजारांचे सोन्याचे दागिने असा एकृण १ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याबाबत आदेश दीपक बिंगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुपा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीच्या गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सहायक फौजदार पठाण करीत आहे.
Post a Comment

0 Comments