राज्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत अनेकांनी राखले गडकोट तर अनेकांचे सुपडेसाफ

 राज्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत अनेकांनी राखले गडकोट तर अनेकांचे सुपडेसाफ 

वेब टीम नगर : राज्यातील १२,७७१ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज झाली  असून, एकूण २ लाख, १४ हजार उमेदवारांचे भवितव्य त्यात निश्चित झाले आहे. ग्रामीण भागाच्या राजकारणाचा कणा मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरासरी ८० टक्के मतदान झाले. एकूण १४,२३४ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्र म जाहीर झाला होता. १५२३ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध पार पडली. त्यात 26,178 उमेदवार या निवडणुकीत बिनविरोध निवडून आले आहेत. एकूण 46,921  प्रभागांमध्ये निवडणूक पार पडली.

या निवडणुकीत अनेक दिग्गजाचे गडकोट ढासळले तर काही ठिकाणी हे गडकोट शाबूत ठेवण्यात यशहीआलं आहे. सायंकाळी ७ :३० च्या दरम्यान प्रसिद्ध आकेवरी नुसार १४,२३४ ग्राम पंचायतींपैकी १०,४२२ पंचायतीचा निकाल हाती आला आहे त्यात भाजपने - २३६५ , शिवसेना - २१९०, राष्ट्रवादी काँग्रेस २१०१, काँग्रेस - १५४५, मनसे - ३६ तर साथीला पॅनल्सना २१८५ ठिकाणी यश मिळालं होत. 

विदर्भामध्ये विद्यमान मंत्री व आमदारांनी आपापल्या भागात असलेले गडकिल्ले सांभाळले असून या भागात फडणवीस , गृहमंत्री देशमुख , यशोमती ठाकूर आणि अन्य आमदारांना आपले बालेकिल्ले सांभाळण्यात यश आले आहे तर कोकणात शिवसेनेला घवघवीत यश मिळाले, रायगड मध्ये शेकाप पक्षाने आपला बालेकिल्ला राखला असून उत्तर महाराष्ट्रात खडसे आणि शिवसेनेला चांगले यश मिळाले. तर कोल्हापूरच्या खानापूर मधील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा सुपडासाफ झाल्याचं स्पष्ट झालं. तर नगर जिल्ह्यात नेवासे तालुक्यात  विद्यमान मंत्री शंकररावव गडाख यांनी गड राखला तर कर्जत जामखेड मध्ये आमदार रोहित पवारांनी माजी आमदार भाजपचे राम शिंदे यांना ढाका देत आपले वर्चस्व सिद्ध केले. तर संगमनेरात राधाकृष्ण विखेपाटील यांनीं बाळासाहेब थोरातांना धक्का दिला तर राधाकृष्ण विखेपाटील यांच्या लोणी बुद्रुक ग्राम पंचायती मध्ये थोरातांनी विखेंना धक्का देऊन २० वर्षानंतर सत्तांतर घडवले.   

 देवेंद्र फडणविस यांनी सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला असला तरी थोरातांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून ८० टक्के ग्राम पंचायती जिंकून मतदारांच्या विश्वासाची पावती मिळाल्याची प्रतिक्रिया दिली आहे.   

Post a Comment

0 Comments