नगरटुडे बुलेटिन 17-01-2021

 नगरटुडे बुलेटिन 17-01-2021

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शहरात सिरम च्या लसीकरणाला प्रारंभ 

वेब टीम नगर : करोना व्हायरस ला प्रतिबंध करण्यासाठीच्या अहमदनगर शहरातील सिरम या लसीकरणाचा    शुभारंभ बुरूडगाव रस्त्यावरील जिजामाता उद्यानातील मनपाच्या वैधकीय केंद्रात जिल्हाधिकारी डॉ .राजेंद्र भोसले याच्या व आमदार संग्रामभैय्या जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले . अंगणवाडी सेविका  ज्योती लवांडे हिला पहिली कोविड प्रतिबंधक लास टोचण्यात आली.तर सिव्हिल हॉस्पिटल मध्ये पहिली लस स्वतः सिव्हिल सर्जन  डॉ सुनील पोखर्णा यांनी टोचून घेतली, या प्रसंगी डॉ अनिल बोरगे,आय एम ये चे शाखाद्यक्ष डॉ अनिल आठरे ,डॉ बापू कांडेकर.डॉ. देशमुख सेक्रेटरी सचिन वहाडणे .संजय चोपडा नगरसेविका सौमीनाताई   चोपडा .नगरसेवक गणेश भोसले,प्रकाश भागानगरे .विजय गव्हाणे ,सभापती मनोज कोतकर,महिला बाळ कल्याणच्या सभापती लताताई शेळके उपसभापती सुवर्णा  गेन्नाप्पा  बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते.  



-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

श्रीराम मंदिर हा प्रत्येकाचा आस्थेचा, भावनेचा प्रश्‍न असल्याने यात प्रत्येकाचे योगदान असावे: हभप भास्करगिरी महाराज

     वेब टीम नगर : अनेक वर्षांच्या संघर्षानंतर आयोध्येत श्रीराम मंदिर निर्माण कार्यास शुभारंभ झाला ही जगभरातील हिंदूंसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. प्रभु रामचंद्रांच्या मंदिर निर्माणात सर्वांचा सहभाग असावा, यासाठी मंदिर निर्माण समितीच्यावतीने मोठ-मोठ्या शहरांपासून गावपातळीवरील भाविकांचा हातभार असावा या उद्देशाने मदत निधी संकलन सुरु केले आहे. मंदिर निर्माणाचा आराखडा तयार झाल्यावर अनेक उद्योजक, संस्था, बालाजी, शिर्डी सारख्या मोठमोठ्या देवस्थानच्यावतीने देणगी देऊन मंदिर उभारण्यासाठी मोठा निधी देण्याचे जाहीर केले. परंतु आयोद्धेतील श्रीराम मंदिर हा प्रत्येकाचा आस्थेचा, भावनेचा प्रश्‍न असल्याने यात प्रत्येकाचे योगदान असावे, या कार्यात आपलाही सहभाग आहे, हा अभिमान असावा म्हणून सर्वांकडून देणगी स्वरुपातून मंदिर निर्माणाचे कार्य सुरु आहे. या कार्यात नगरमधील जास्तीत-जास्त श्रीराम भक्तांना सहभागी व्हावे, असे आवाहन महंत हभप भास्करगिरी महाराज यांनी केले.

     आयोध्या येथील श्रीराम मंदिर निर्माण कार्यासाठी नगरमधून निधी संकलन अभियानाचा शुभारंभ शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानच्यावतीने रु. १ लाख११ हजार १११ रुपयांचा धनादेश अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर यांच्या हस्ते हभप भास्करगिरी महाराज यांच्याकडे सुपूर्द करुन करण्यात आला. याप्रसंगी देवस्थानचे उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, महंत संगमनाथ महाराज, रामकृष्ण राऊत, विजय कोथिंबीरे, पांडूरंग नन्नवरे, रंगनाथ फुलसौंदर, चंद्रकांत फुलारी, गजानन ससाणे आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी अ‍ॅड.अभय आगरकर म्हणाले, आयोद्धेत श्रीराम मंदिर निर्माण होत आहे ही सर्वांसाठी गर्व वाटवा, अशी घटना आहे. गेल्या अनेक वर्षांची तपश्‍चर्या यानिमित्त फळाला आली आहे. या ठिकाणी निर्माण होणारे प्रभु रामचंद्रांचे मंदिर अवध्या विश्‍वाला शांती, प्रेम आणि एकतेचा संदेश देणारे ठरणार आहे. मंदिर निर्माण कार्यात प्रत्येकाला सहभागी होण्याची संधी मिळत आहे, त्याचा भाविकांनी लाभ घेऊन पुढील हजारो वर्षांपर्यंत प्रेरणा देणार्‍या या मंदिर निर्माणात सहभागी व्हावे, असे आवाहन करुन श्री विशाल मंदिर देवस्थानच्यावतीने १लाख ११ हजार १११ रुपये देऊन या सत्कार्यात सहभागी झालो असल्याचे सांगितले.

     यावेळी महंत संगमनाथ महाराज यांनी ११,१११, विश्‍वस्त विजय कोथिंबीरे ११,१११, सचिव अशोकराव कानडे५,५५५ आदिंसह भाविकांनी देणगी दिली. कार्यक्रमास डॉ.रविंद्र साताळकर, राजाभाऊ मुळे, शांतीभाई चंदे, वसंत लोढा, गजेंद्र सोनवणे, अनिल रामदासी, श्रीकांत जोशी, आबा मुळे, हिराकांत रामदासी, संजय चाफे, विक्रम राठोड, सचिन पारखी, नंदकिशोर शिकरे आदि उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

विस्कळीत होणार्‍या पाणी पुरवठ्याबाबत मनपाने नियोजन करावे

शिवराष्ट्र सेनेचे संतोष नवसुपे यांची मागणी

   वेब टीम  नगर : अहमदनगर शहरला पाणी पुरवठा करण्यासाठी नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी दि.१९ते ३० जानेवारी दरम्यान शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होणार असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले आहे. परंतु या कालावधीत नागरिकांची पाण्यासाठी परवड होऊ नये यासाठी मनपाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी शिवराष्ट्र सेनेच्यावतीने निवेदनाद्वारे केली आहे. याप्रसंगी शिवराष्ट्र सेनेचे पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे, दलित आघाडी जिल्हाध्यक्ष अनिल शेकटकर, शहर जिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे, ज्येष्ठ पदाधिकारी भैरवनाथ खंडागळे, युवा प्रमुख शंभुराजे नवसुपे आदि उपस्थित होते.

     मनपा आयुक्तांच्या नावे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरास पाणी पुरवठा करण्यासाठी जलवाहिनी टाकण्याचे काम दि.१९ ते ३० जानेवारी दरम्यान करण्यात येणार आहे. या कामामुळे शहरासह उपनगरातील पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे. या विस्कळीत होणार्‍या कालावधीत पाणी पुरवठ्याबाबत मनपाने उपाययोजना करुन नागरिकांना पाणी व्यवस्था केली आहे का? अन्यथा गोंधळाची स्थिती निर्माण होईल.

     शहरातील विहिरी, पाण्याचे साठे प्रशासनाने ताब्यात घ्यावी, जेणे करुन नागरिकांना यातून पाणी पुरवठा करण्यात येईल. तसेच मनपाच्यावतीने विभागनिहाय टँकर व स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, पाणी पुरवठा अधिकारी व कामगारांचे फोन नंबर जाहीर करावे, जेणे करुन नागरिकांना पाणी उपलब्ध करुन देणे सोयीचे होईल. त्याच प्रमाणे मनपा हद्दीतील टँकर चालकांची बैठक घेऊन त्यांना याबाबत सूचना द्याव्यात, आपत्कालीन परिस्थितीत टँकर ताब्यात घ्यावेत. तसेच पाणी टँकरचे दर निश्‍चित करुन ते जाहीर करावेत. जेणे करुन नागरिकांना पाणी मिळेल व जादा दराचा फटकाही बसणार नाही. याबाबत तातडीने बैठक घेऊन उपाययोजना कराव्यात, असेही निवेदनात म्हटले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मुख्याध्यापकाला झालेल्या मारहाणीचा जिल्हा मुख्याध्यापक संघाकडून निषेध

    वेब टीम  नगर : शुक्रवारी ग्रामपंचायत निवडणुकी दरम्यान नगर तालुक्यातील डोंगरणग येथील मतदान केंद्रावर  मते पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक यशवंत भुतकर यांना झालेल्या मारहाणीचा अहमदनगर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्यापक संघाच्यावतीने  निषेध करुन जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी संघाचे अध्यक्ष सुनिल पंडित व पदाधिकारी उपस्थित होते.

     जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शुक्रवार दि.15 जानेवारी 2021 रोजी डांगरगण, ता.नगर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये डोंगरगण येथील मते पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक यशवंत काशिनाथ भुतकर हे आपल्या वयोवृद्ध अर्धांगवायू असलेल्या मातोश्रींना मतदानासाठी स्वत:च्या कारमध्ये घेऊन जात असतांना एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक मोहन बोरसे यांनी त्यांना कुठलीही चौकशी न करता अमानुषपणे बेदम मारहाण केली.भुतकर यांनी ड्युटीवर असलेल्या पोलिस कॉन्स्टेबल यांची पूर्व परवानगी घेऊन मतदान केंद्रात प्रवेश केला होता. ही सर्व घटना पाहता पो.नि.मोहन बोरसे यांनी केलेले कृत्य हे निश्तिपणे निषेधार्थ असून, या कृत्याचा अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक संघ व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने निषेध करण्यात येत असून, पोलिस निरिक्षक मोहन बोरसे यांची सखोल चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, असे निवेदात म्हटले आहे.

     या निवेदनावर संघाचे अध्यक्ष सुनिल पंडित, भा.अं.रोहकले, भा.दं.सांगळे, चंद्रकांत चौगुले, के.एल.हापसे, दिपक रामदिन, सुनिल गाडगे, सखाराम गारुडकर, दत्तात्रय गुंड, आशा मगर, डी.एम.रोकडे, व्ही.एल. गरड, यशवंत भुतकर, बापूसाहेब जगताप, पी.एस.भुतकर, एन.के.कदम, जालिंदर शेळके, एस.के. केदार, महेंद्र हिंगे, बाबासाहेब बोडखे आदिंच्या सह्या आहेत.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बहुजन समाज पार्टीच्या वतीने  सामाजिक उपक्रमांनी जनकल्याणकारी व सहयोग दिन साजरा

राजकारणापेक्षा समाजसेवा हे ध्येय ठेऊन बसपाची वाटचाल -प्रदेश सचिव बाळासाहेब आवारे

वेब टीम नगर : बहुजन समाज पार्टी अहमदनगर शहर व जिल्ह्याच्या वतीने राष्ट्रीय नेत्या बहन मायावतीजी यांचा वाढदिवस जनकल्याणकारी व सहयोग दिन म्हणून साजरा करण्यात आला. बहुजन समाज पार्टीच्या वतीने शहरात व जिल्ह्याच्या विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

जनकल्याणकारी दिवसाचा सांगता सोहळा शहरातील सिध्दार्थनगर येथे बसपाचे प्रदेश सचिव बाळासाहेब आवारे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी प्रदेश सचिव बाळासाहेब आवारे, जिल्हा प्रभारी संजय डहाणे, जिल्हाध्यक्ष राजू शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र साठे, मच्छिंद्र ढोकणे, मिनाताई घोडके, प्रतिभा मगर, बाळासाहेब मधे, तात्या आल्हाट, शहराध्यक्ष संतोष जाधव, सिध्दार्थ पाटोळे, प्रतिक जाधव, विजय गायकवाड, डॉ.राजू बोर्डे, बौध्दाचार्य दिपक पाटोळे, गणेश बांगल, सचिन खुडे, सुमेध डहाणे, मयुर शिंदे, अरुण त्रिभूवन, प्रविण कदम, बाबासाहेब कदम, दत्तात्रय सोनवणे, अमोल शेटे, आनंद कांबळे, सलिम अत्तार, संदिप चव्हाण, नामदेव जाधव, नितीन भालेराव, सुनिल मगर, वृषाली जगताप, कैवल्य साठे, भारत त्रिभूवन आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

प्रास्ताविकात राजू शिंदे यांनी पक्षाचे ध्येय धोरण स्पष्ट करुन, सर्व कार्यकर्त्यांनी पुढील निवडणुकीला सामोरे जाताना सामाजिक योगदान देण्याचे आवाहन केले. जिल्हा प्रभारी संजय डहाणे यांनी जिल्ह्यात बसपाचे संघटन मजबूत होत असून, येत्या निवडणुकीत आपले असतित्व दाखवून देणार आहे. प्रत्येक कार्यकर्ता पक्षाच्या विचारधारेने व बहुजन समाजातील प्रश्‍न सोडविण्यासाठी कार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शिर्डी विधानसभा प्रभारीपदी तात्या अल्हाट, संगमनेर विधानसभा सचिवपदी बाबासाहेब कदम, अकोले विधानसभा प्रभारीपदी नामदेव जाधव, उत्तर जिल्हा उपाध्यक्षपदी सुनिल मगर यांची नियुक्ती करण्यात आली.

 प्रदेश सचिव बाळासाहेब आवारे म्हणाले की, बहुजन समाज पार्टी ही जनकल्याणकारी पक्ष आहे. पक्षात सर्व सामान्य बहुजन समाजाला केंद्रबिंदू मानून पक्षाची वाटचाल सुरु आहे. पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या बहन मायावतीजीच्या नेतृत्वाखाली पक्ष वाटचाल करीत असताना सर्वसामान्यांना आधार देण्याचे कार्य केले जात आहे. पक्षाशी बहुजन समाजातील युवक मोठ्या संख्येने जोडले जात असून, राजकारणापेक्षा समाजसेवा हे ध्येय ठेऊन कार्य केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन भालेराव यांनी केले. आभार सुनिल मगर यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी सिध्दार्थनगर येथील मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments