पक्षश्रेष्ठींपुढे दाद मागणार कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय

पक्षश्रेष्ठींपुढे दाद मागणार कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय 

शहरातील कार्यकर्त्यांकच्या संतप्त भावना 

आ.जगताप याच्या व्यक्तिद्वेषाने शिवसेनेच्या दावणीला काँग्रेसपक्ष बांधणाऱ्या काळेंमुळे भुजबळांसारख्या निष्ठावान,सक्रिय कार्यकर्त्याला पद गमवावे लागले 

वेब टीम नगर : अहमदनगर शहर ब्लॉक काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून बाळासाहेब भुजबळ यांना हटवल्याबद्दल शहर काँग्रेस कार्यकर्त्यांत संतप्त प्रतिक्रिया काल सायंकाळी झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आली. शहर उपाध्यक्ष शशिकांत पवार, चिटणीस मुकुंद लखापती, आर.आर.पाटील, रजनी ताठे , माजी नगरसेवक रुपसिंग कदम,महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा सविता मोरे,सुभाष रणदिवे,अज्जू शेख,अभिजित कांबळे,प्रदेश सदस्य शामराव वाघस्कर,पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सरचिटणीस फिरोज शफी खान, माजी नगरसेवक  फैयाज शेख , बाळासाहेब पवार, निखिल वारे, जिल्हा सरचिटणीस उबेद शेख आदींनी श्री. भुजबळ यांची पाठराखण करीत प्रदेश काँग्रेसने घेतलेल्या निर्णयाचा निषेध केला. 

नगर शहर पक्षाचे काम श्री भुजबळ आणि प्रतिक्रिया देणाऱ्या कार्यकर्त्यांना एक संघपणे , निष्ठेने व प्रामाणिकपणे केले. पक्षाचे कार्यक्रम न चुकवता शहरात राबवून पक्षाचे ध्येय धोरण व निर्णय तळागाळात पोहोचविले. गट,तट न मानता सर्वांना बरोबर घेऊन शहरात पक्ष जिवंत ठेवण्याचे काम केले. पक्षाचे काम करतांना  पक्षांतर्गत गटबाजीचा नाहक त्रास सहनही करावा लागला तरीही पक्षाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली श्री भुजबळ यांनी सन २००३ पासून पक्षातुन हटविण्यापर्यंत म्हणजेच १६ जानेवारी २०२१ पर्यंत एकनिष्ठेने काम केले. श्री विखे पक्षात होते तो पर्यंत पक्षाचे नेते म्हणून त्यांनी आयोजित केलेल्या पक्षांतर्गत उपक्रमाला श्री भुजबळ यांनी पक्षहित म्हणून सहभाग घेतला पण , त्या त्या वेळी जिल्ह्यातील शहरातील सर्वच पदाधिकारीही यावेळी असत मात्र श्री विखे व अन्य कोणी जेव्हा पक्षातून बाहेर गेले तेव्हा त्यांचे समर्थन श्री भुजबळ यांनी केले नाही उलट पक्षाचे जे विखे यांच्या प्रचारात होते त्यांच्याशी दोन हात लांब  राहण्याचा प्रयत्न केला. श्री थोरात यांच्या आदेशाचे पालन करून पक्ष निष्ठा वेळोवेळी सिद्ध केली. सन २०११ च्या दरम्यान पक्षाच्या तत्कालीन शहर जिल्हाध्यक्षांना निलंबित करण्याची घटना घडली त्यादरम्यान पक्षातील कार्यकर्त्यांना एकसंघ ठेऊन त्या काळात शहरात पक्षाचे अस्तित्व कायम राखण्याचे श्री भुजबळ यांनी केलेले काम, शहरात पक्षाचे नेतृत्व केले हि बाब कौतुकास्पद आणि गौरवास्पद आहे अशी सर्वत्र प्रतिक्रिया होती. 

श्री भुजबळ हे पक्षांतर्गत निवडणुकीतून लागोपाठ २ वेळा शहर ब्लॉक अध्यक्ष झाले आहेत.ब्लॉकच्या निवडणुकीनंतर शहर जिल्हाध्यक्ष पदाची निवड झाली. मात्र , सन २०१० पासून आज पर्यंत शहर जिल्हाध्यक्ष पदावर प्रभारी म्हणून नियुक्ती झाली आहे. 

श्री भुजबळ यांनी केलेल्या पक्ष कार्याचा प्रदेश काँग्रेसने २०१० विशेष पुरस्कार देऊन गौरव केला आहे तर त्यांच्या याच कार्याची  दखल घेऊन २०१२ ला पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटण्याची संधी देण्यात आली. 

मध्यंतरी सन २०१४ रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत संगमनेरहून आलेल्या सत्यजित तांबे ह्यांनी शहराची उमेदवारी मिळविली आणि त्या दरम्यान शहरातील पक्षाची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली तेव्हा पासून पक्षात स्वार्थीपणा , संकुचित वृत्ती आणि निष्ठावंतांना डावलून तांबे प्रेमींना महत्व प्राप्त करून देतांना पक्षहित जोपासणार्यांचा वाट्याला  वनवास आला तो आजपर्यंत सुरु आहे. मात्र श्री तांबे यांची उमेदवारी  हा पक्षादेश मानून श्री भुजबळ आणि सहकाऱ्यांनी पक्षाचे काम इमानेइतबारे केले. तत्पूर्वीही विधानसभा निवडणुकीत सहकार महर्षी सुवालालजी गुंदेचा उमेदवार होते त्यांचाही  प्रचार करण्यास श्री भुजबळ आघाडीवर होते.

स्व.गुंदेचा , स्व.रईसा आपा शेख , सुभाष गुंदेचा , डी.एम कांबळे , ब्रिजलाल सारडा, विनायक देशमुख , आदी शहरातील पक्षाच्या जेष्ठ नेते कार्यकर्त्यांनी श्री भुजबळ यांची कायम पाठराखण करत त्यांना पदोन्नती (शहर - जिल्हाध्यक्ष) पद देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. परवाच्या १४ जानेवारीच्या तिळगुळ सभारंभात श्री भुजबळ यांच्या पाठीशी शहरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकमुखी पाठिंबा जाहीर केला होता. 

श्री सत्यजित तांबे विधानसभा निवडणूकित पराभूत झाल्यापासून केवळ व्यक्ती व्देषाने पछाडले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांचा ते व्देष ते करीत आहेत . ते हे करत असतांना पक्ष  सेना - भाजप च्या दावणीला बांधण्यासही ते मागे नाहीत  हि त्यांची कृती पक्षाला वेळोवेळी नुकसान करणारी ठरली आहे. मात्र श्री थोरात यांचे भाचे म्हणून त्यांच्या या पक्ष विरोधी कृत्याची कोणी दखल घेतली नाही. पण, त्यांची कृती सर्वश्रुत होती आणि आहे हे सिद्ध झाले आहे . तांबे पिता- पुत्राने स्वतः संकुचित वृत्तीने गटबाजी करायची आणि वर श्री भुजबळांवर गटबाजीचा ठपका ठेवायचा असे त्यांचे राजकारणाने शहरात ,पक्षात काम करण्यास पदाधिकारी , कार्यकर्त्यांना अडचणी निर्माण केल्या आहेत. मध्यंतरी किरण काळे यांची शहर जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली. श्री काळे हे वंचित आघाडीसह विविध पक्षात कार्यरत होते. ते शहरातील विद्यमान आमदारांचे खास विरोधक म्हणून ओळखले जातात . श्री तांबे यांच्याही राग आमदारांबरोबर आहे आणि श्री काळे यांचाही मग या समदुःखिंनी काँग्रेसच्या माध्यमातून पक्षाचे निष्ठेने काम करणाऱ्यांना अडचणी निर्माण करत आहेत. हा त्रास गेल्या ७- ८ वर्षांपासून सतत सुरु आहे. तश्या प्रकारचे लेखी पत्रही श्री.थोरातांना या देण्यात आले. प्रांतिक कमिटीला याची कलपना आहे परंतु आज प्रांतिक नेतृत्व याकडे डोळेझाक करत आहे. वास्तविक प्रांतिक अध्यक्षांनी श्री काळे यांची  नियुक्ती करतांना श्री भुजबळ यांनी शहरात पक्ष जिवंत ठेवण्याचा आवर्जून उल्लेख केला होता. एवढेच नाही तर प्रदेश च्या  कार्यकारणीत श्री भुजबळ यांना घेण्याचे  त्यांनीच सांगितले होते. विशेष म्हणजे हे त्यांनी श्री तांबे  गटाच्या कार्यक्रमात सांगितले होते. एकीकडे श्री काळे यांची नियुक्ती करून श्री काळे शिवसेनेच्या दावणीला पक्ष बांधत आहेत. त्या कृतीला श्री तांबे पिता - पुत्राच्या पाठिंब्याला संमती देत दुसरीकडे निष्ठेने पक्ष कार्य करणाऱ्यांना पदावरून हटवण्यात येते हि बाब शहरातील कार्यकर्ते अ.भा काँग्रेसचे सचिव   महाराष्ट्र राज्याचे प्रभारी एच के पाटील आणि वेळ पडले तर दिल्ली पर्यंत श्रेष्टींच्या कानावर घातल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही अशी भूमिका कालच्या बैठकीत घेण्यात आली.. श्री मनोज गुंदेचा या व्याक्तीला विरोध नाही . श्री तांबे पिता पुत्र आणि श्री काळे यांच्या कृतीला आणि त्यांच्या संकुचीत वृत्तीला विरोध आहे. तो कायम ठेऊन शहरात पक्ष कार्य एकसंघ करण्याचा निर्णयही कालच्या बैठकीत घेण्यात आला.       

गटबाजी कोण करत ?

किरण काळे यांची शहर जिल्हाध्यक्षपदावर नियुक्ती होण्यापूर्वी बाळासाहेब  भुजबळ यांची या पदावर नियुक्ती करावी अशी मागणी शहरातून एकमुखी होती . परंतु काळे यांची निवड होताच श्री भुजबळ यांनी काळे यांचे अभिनंदन करून दुसऱ्या दिवशीच्या १५ ऑगस्ट झेंडावंदन कार्यक्रमात उपस्थित राहून एकसंध पक्ष ठेवण्याचा प्रयत्न केला .परंतु ,यावेळी काळे यांनी भुजबळ व पदाधिकाऱ्याना झेंडावंदन कार्यक्रमास येण्यास मनाई केली. सत्यजित तांबे यांची परवानगी घेऊन कार्यक्रमाला या असे त्यांनी बजावले याचा  अर्थ तुम्ही कालिका प्राईडच्या कार्यालयात किंवा आमच्या कार्यक्रमात सहभाग घेऊ नका असे बजावल्याने श्री भुजबळ यांनी शहर अध्यक्ष म्हणून स्वतंत्र कार्यक्रम घेतले तर आ.तांबे यांनी भुजबळ गटबाजी करतात अश्या चोराच्या उलट्या बोंबा मारल्या मग गटबाजी कोण करतं याचा खुलासा करावा .   

Post a Comment

0 Comments