ओ.बी.सी संघटनेच्या शहर जिल्हाध्यक्ष पदी बाळासाहेब भुजबळ

 ओ.बी.सी संघटनेच्या शहर जिल्हाध्यक्ष पदी बाळासाहेब भुजबळ 

काँग्रेस शहर अध्यक्ष पदावरून काढण्याचा कृतीचा बैठकीत निषेध 

वेब टीम नगर : ओ  बी सी मेळाव्यात सहभागी होणारे काँग्रेस शहर अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांना पदावरून मुक्त करण्याच्या कृतीचा यावेळी निषेध करण्यात आला. पदावरुन कोणाला काढायचा हा निर्णय ज्या त्या पक्षाचा जरी असला तरी निष्ठेने काम करणाऱ्याना दूर लोटायचे आणि संकुचित वृत्तीने कार्य करणाऱ्यांच्या पाठीशी पक्ष नेत्याने उभी राहण्याची कृती हि कोणत्याही राजकीय व सामाजिक संस्थांना शोभणारी नाही. म्हणून या घटनेचा निषेध या सभेत करत आहोत, असे श्री सानप यांच्या सह उपस्थित वक्त्यांनी आपल्या भाषणातून केला. या चळवळीचे शहरातील नेतृत्व बाळासाहेब भुजबल  यांच्याकडे सोपविण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला व तसे नियुक्तीचे पत्र सानप यांच्या हस्ते भुजबळ यांना देण्यात आले . 


ओ. बी. सी व्ही. जे. एन. टी  जन मोर्च्याच्या वतीने  अलीकडेच नामदार विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत मेळावा आयोजित करण्यात आला होता हा मेळावा यशस्वी होऊन हि चळवळ यापुढेही कार्यरत राहावी अशी अपेक्षा करून चळवळीतील सर्वांना धन्यवाद देण्याचा उपक्रम कालच्या बैठकीत करण्यात आला. जनमोर्च्याचे राज्याचे प्रमूख बाळासाहेब सानप यांच्या प्रमुख उपस्थिती हि बैठक पार पडली. यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर, बाळासाहेब बोराटे, आनंद लहामगे , चंद्रकांत  फुलारी , रमेश सानप आदींनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या . 

अशोक दहिफळे , अशोक सोनावणे, विशाल वालकर , निशांत दातीर , अनिल निकम , हरिभाऊ डोळसे , नागेश शिंदे , शशिकांत पवार , रमेश बिडवे , फिरोज खान , अनिल इवळे , संदीप क्षीरसागर,काका शेळके, प्रसाद सैंदाणे,योगेश गुंजाळ,गौरव ढोणे , राजेश भाटिया, रुपसिंग कदम,डॉ. सुदर्शन गोरे, किरण बोरुडे, अमोल भांबरकार , श्रीकांत मांढरे,सागर फुलसौंदर,राजेंद्र पडोळे , सुहास पाथरकर, राजेश सटाणकर आदींनी यावेळी चर्चेत सहभाग घेतला . 

यावेळी या मेळाव्याच्या जमाखर्चला मंजुरी देण्यात आली.  मेळावा आणि चळवळीसाठी वेळ,श्रम आणि दाता म्हणून  योगदान देणाऱ्या  सर्वांचे आभार मानण्यात आले. पत्रकार आणि अन्य सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वतः ओ बी सी - व्ही जे एन टी  नसतांना दिलेल्या सहकार्याबद्दलही त्यांचे आभार मानण्यात आले. 


Post a Comment

0 Comments