मूलमंत्र आरोग्याचा : योगसाधना ,आरोग्य आहार

 मूलमंत्र आरोग्याचा 

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

योगसाधना 
नौकासन 

 भूमिका -विपरीत शयनस्थितीतील  नौकासनाचा अभ्यास पूर्वी आपण केलेलाच आहे त्या प्रकारात पोटाच्या स्नायू प्रसरण आहे आता आपण शयनस्थिती नौकासनाचा अभ्यास करावयाचा आहे.  या प्रकारात पोटातील स्नायूंचे आकुंचन आहे . दोन्ही प्रकारात शरीराला परस्परविरोधी बाक दिलेला आहे म्हणून नाव एक असले तरी शरीराची उलट होत असल्याने परिणामाच्या दृष्टीने या दोन्ही प्रकारांत भिन्नता आहे. 

 क्रिया 

आसनस्थिती घेणे -पूर्वस्थिती शयनस्थिती १) ‍श्वास सोडा व श्‍वास घेत घेत दोन्ही पाय सावकाश दोन्ही पाय वर उचला जमिनीशी पंचेचाळीस अंशांचा कोन  होईल इतक्या उंचीवर स्थिर ठेवा.  २) श्वास रोखून ठेवा व तशाच अवस्थेत खांदे व पाठ वर उचला आणि हातांनी वर उचललेल्या पायाचे अंगठे पकडा श्वसन संथपणे चालू ठेवून स्थिर राहा . 

आसनस्थिती सोडणे

 १) श्वास घ्या श्वास  सोडत सोडत हातांनी पायांचे अंगठे सोडून हात पाठ व डोके जमिनीवर टेकवा.

  २) श्वास सोडण्याची क्रिया तशी चालू ठेवा दोन्ही पाय सावकाश जमिनीवर टेकवा आणि शयनस्थिती  अवस्था घ्या. 

 कालावधी- हे आसन ताण देणारे आहे तसेच तोलात्मकही आहे म्हणून सुरुवातीला काही सेकंद तरी स्थिर राहणे महत्त्वाचे आहे.  सरावानंतर सुमारे पंधरा सेकंद तरी हे आसन  स्थिर ठेवता आले पाहिजे, म्हणजे त्याचे फायदेही मिळू शकतील अर्थात वर वर्णन केलेल्या आदर्श अवस्थेनुसार हे आसन  केले व तसे जमले तर हा कालावधी पुरेल .  जर अपूर्ण अवस्थेपर्यंत या आसनाची स्थिती केली व तशा अवस्थेत स्थिर  राहिले तर पंधरा सेकंद पेक्षा कितीतरी अधिक काळ या आसनात स्थिर राहता येते . 

या आसनात पोटाच्या स्नायूंचे आकुंचन महत्त्वाचे आहे या स्नायूंवर बराच ताण येतो , शिवाय पोटाची दोन्ही बाजूने घडी  झाल्याने तसे आकारमान कमी झालेले असते परिणामतः पोटात असणाऱ्या अवयवांवरील (आतडी, यकृत, स्वादुपिंड, मूत्रपिंड, इत्यादी) वरील दाब वाढवला जातो.  त्यामुळे या सर्वांची कार्यक्षमता वाढण्यास  उपयोग होतो . म्हणून मूत्रपिंडाचे विकार किंवा हार्निया  यासारखे विकार बरे करण्यासाठी या आसनांचा अभ्यास सांगितला जातो, मात्र तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा अभ्यास करावा.  

विशेष दक्षता- पोटातील विकारांवर या सणाचा उपयोग होतो असे वर सांगितले आहे पण म्हणून अशा रुग्णांनी स्वतःहून आपल्यावर याचे प्रयोग न करता तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करावा अन्यथा फायदा न होता त्रास होईल पोटाची शस्त्रक्रिया झालेली असल्यास या सणाचा अभ्यास टाळावा हेच श्रेयस्कर. -----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आरोग्य आहार 
 दुधी हलवा


 साहित्य : एक किलो कोवळा ताजा दुधीभोपळा ,अर्धा लिटर दूध, पाव किलो खवा, एक टेस्पून डालडा किंवा साजूक तूप ,दोन वाट्या साखर, पाच-सहा वेलदोड्याची पूड, बेदाणे ,चारोळी, चिमूटभर खायचा सोडा . 

कृती : प्रथम दुधी भोपळ्याची साल पूर्णपणे काढून स्वच्छ धुऊन घेऊन स्टीलच्या किसणीवर किसून घ्यावा ,किसलेल्या दुधी भोपळा व चिमूटभर खायचा सोडा टाकून कीस दोन हातात पिळून पाणी काढून टाकावे , जाड बुडाच्या पातेल्यात एक चमचा तूप घालून त्यात दुधीचा किस टाकुन परतावे थोडे परतून अर्धा लिटर दूध घालून ढवळावे दुध्याचा कीस लवकर शिजतो पण दुध आटेपर्यंत ढवळावे , दूध आटल्यावर पाव किलो खवा टाकून ढवळावे व तवा कोरडा होईपर्यंत मिश्रण आटवावे , मिश्रण कोरडे झाल्यावर दोन वाट्या साखर घालून ढवळावे साखर विरघळल्यावर खूप आटवु नये मिश्रण ओलसर असताना गॅसवरून उतरून वेलदोडे पूड बेदाणे व चारोळी घालावी व थंड झाल्यावर हलवा थोडा अधिक घट्ट होतो , थंड झाल्यावर काचेच्या भांड्यात ठेवावा दुधी हलवा थंडच वाढावा 

टीप : दुधीच्या किसाला चिमूटभर सोडा लावल्याने दुधीचा नैसर्गिक राग टिकून राहतो व दूध घातल्यास ते फाटत नाही. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------


Post a Comment

0 Comments