दुपारी ३:३० पर्यंत ७०५ ग्रामपंचायतीत सरासरी ७१.४६ टक्के मतदान

 दुपारी ३:३० पर्यंत ७०५ ग्रामपंचायतीत सरासरी ७१.४६ टक्के मतदान 

वेब टीम नगर - जिल्ह्यात ७०५  ग्रामपंचायत सदस्य निवडीसाठी शुक्रवारी (दि.१५) मतदान शांततेत पार पडले. जिल्ह्यात ७१.४६ टक्के मतदान झाले असून मतपेटीत नव्याने होणाऱ्या सदस्यांचे भवितव्य पेटीबंद  झाले आहे. हे भाग्य सोमवारी (दि.१८) जानेवारीला प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी समोर येणार आहे. या सर्व ग्रामपंचायत निवडणुकीत १००८२९५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला.  

२०१९ ग्रामपंचायत पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यातील ७०५  ग्रामपंचायतीसाठी ही निवडणूक झाल्या. यात अकोले ३६, संगमनेर ९०, कोपरगाव २९, श्रीरामपूर २६ , राहता  १९, राहुरी ४४, नेवासा ५२,नगर ५६, पाथर्डी ७५, शेवगाव ४८, कर्जत ५४, जामखेड ३९, श्रीगोंदा ५८ अशा एकूण ७०५ ग्रामपंचायतीसाठी ही पंचवार्षिक निवडणूक पार पडली यामध्ये संगमनेर तालुक्यात सर्वाधिक ९० ग्रामपंचायतीसाठी ७२.८२ टक्के मतदान झाले. ठिकणी मतदान शांततेत पार पडल्याचा अहवाल आहे.  


Post a Comment

0 Comments