जामखेड तालुक्यात १ लाख १० हजार रुपयांची जप्त

 जामखेड तालुक्यात १ लाख १० हजार रुपयांची जप्त 

वेब टीम नगर : जामखेड तालुक्यातील नान्नज व जवळा परिसरातील अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत एक लाख नऊ हजार ५२६ रूपयांचा मुद्देमाल जप्त करून नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर   एवढी मोठी कारवाई केल्याने अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

    विभागीय आयुक्त पुणे विभाग प्रसाद सुर्वे, अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क नगर गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क नगर निरीक्षक डी. आर ठोकळ, दुय्यम निरीक्षक एम. एस. धोका, जामखेडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर  नान्नज व जवळा परिसरात  नऊ जणांविरोधात धडक कारवाई करत देशी विदेशी दारू, गावठी दारू, रसायन, बीअर असा एकुण १ लाख ९ हजार ५२६ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एवढी मोठी कारवाई झाल्याचे अवैध दारू विक्री करणाऱ्यांच्या पाचावर धारण बसली आहे.  

जामखेडचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी अवैध धंद्यांविरोधात मोहिम उघडली आहे यातच आता राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली आहे.  

   सदरची कारवाई निरीक्षक ए. बी. बनकर, एम. एस. धोका, डी. आर. ठोकळ, दुय्यम निरीक्षक सचिन वामने, साहाय्यक फौजदार बी पी. तांबट, नंदकिशोर ठोकळ, श्रीमती एस. आर. आहेर यांच्या पथकाने केली.  घटनेचा तपास ए. बी. बनकर व एम एस. धोका हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments