नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई

 नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई 

वेब टीम नगर : मकर संक्रांतीच्या पार्शवभूमीवर नायलॉन मांजाविक्री करणारे विक्रेते यांच्यावर कारवाई करण्यात आली. तोफखान पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अजय पतंग सेंटर येथे चोरून नायलॉन मांजाची विक्री करतांना अजय बाबासाहेब राऊत याला ताब्यात घेण्यात आले असून पंचासमक्ष मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे त्यात १५ हजार किमतीचा नायलॉन मांज्याच्या ५० चकऱ्या, ९ हजार रुपये किमतीचा मांजा गुंडाळण्याचा ३ मशीन आणि २६,५८० रोख रक्कम जप्त करण्यात आले. त्याच प्रमाणे तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीद विविध ठिकाणी ३ कारवायांमध्ये ३१०० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून अश्या प्रकारच्या विविध गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी भा.द.वि कलाम १८८/३३६ पर्यावरण संरक्षण अधिनियम ५ व १५ अन्वये तोफखाना पोलीस ठाण्यात ४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

हि कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढोमे यांच्यासह पोना- फसले, पोना-खंडागळे,पोना- ओव्हळ , पोना-साळवे ,पो.शिपाई - सागर द्वारके, पोना - सलीम शेख आदींनी पेट्रोलिंग दरम्यान हि कारवाई केली.      


  

Post a Comment

0 Comments