कार्यकर्त्यांच्या भावना पक्ष श्रेष्ठींपर्यंत जश्याच्या तश्या पोहोचविणार

कार्यकर्त्यांच्या भावना पक्ष श्रेष्ठींपर्यंत  जश्याच्या तश्या पोहोचविणार 

 विनायक देशमुख : शहर काँग्रेसच्या वतीने  तिळगुळ वाटप मेळाव्याचे आयोजन 

वेब टीम नगर : काँग्रेस पक्ष हा नुसता पक्ष नसून ती एक स्वतंत्र विचारधारा आहे.ज्यामध्ये बारा बलुतेदार, बहुजन समाज एकत्रितपणे काम करतात.त्यातल्या त्यात नगर शहरात ख्रिश्चन,मुस्लिम,पद्मशाली,साळी,माळी,जैन अशा सर्व समाजांना बरोबर घेऊन काम करणारा पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष टिकून आहे.जो काम करील त्याचा काँग्रेस पक्ष आहे.आज या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी ज्या व्यथा मांडल्या त्या जशाच्या तशा पक्ष श्रेष्ठींपर्यंत पोहोचविण्याचे काम मी पक्षाचा पदाधिकारी या नात्यांना करणार आहे.असे प्रतिपादन पक्षाचे सरचिटणीस व अखिल भारतीय काँग्रेसचे सदस्य विनायक देशमुख यांनी केले.मकर संक्रांतीनिमित्त तिळगुळ वाटपाचा मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. 

पक्षाचे ज्येष्ठ नेते सुभाष गुंदेचा,भिंगार काँग्रेस अध्यक्ष ॲड.आर आर पिल्ले, शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, महिला काँग्रेस च्या शहर जिल्हाध्यक्ष सविता मोरे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस उबेद शेख, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश सरचिटणीस फिरोज शफी खान,आदी उपस्थित होते. 

नेत्यांचे कार्यकर्ते बनण्यापेक्षा पक्षाचे कार्यकर्ते बना असा सल्ला देतानाच विनायक देशमुख यांनी आगामी महानगरपालिका निवडणुका आपल्याला प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली जिंकायच्या आहेत,त्यासाठी काँग्रेसची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचविणे महत्त्वाचे असल्याने त्यासाठी कार्यकर्त्यांनी झटावे.तसेच १६ तारखेला नागपूर येथील राजभवनात कृषि विधेयक मागे घ्यावे आणि इंधन दरवाढीच्या विरोधात बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांना घेराव घालणार असल्याने त्याही आंदोलनाच्या वेळी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन विनायक देशमुख यांनी केले. 

पक्षाच्या या मेळाव्यात श्याम वागस्कर यांनी बाळासाहेब भुजबळ यांना शहर जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्त करावे असा ठराव मांडला त्याला अभिजीत कांबळे यांनी अनुमोदन देताच सभागृहात उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. 

सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाण्याचे धोरण असल्याने आम्ही काँग्रेस पक्षाबरोबर आहोत. इंदिरा गांधींवरील निष्ठा असल्याने त्यांनी राबवलेल्या धोरणांचा आम्ही पुरस्कार केला, मात्र इंदिराजी आणि राजीवजींच्या निधनानंतर पक्षात वेगळे राजकारण सुरू झाल,आज पक्षाची अवस्था बिकट आहे.साध्या कार्यक्रमाचे निमंत्रणही मिळत नाही,वास्तविक पाहता एक तीळ सात जणांनी वाटून खाण्याची परंपरा असताना तिथे पाय ओढण्याचे काम आज सुरू आहे.  मात्र आगामी काळात एकजूट दाखवावी लागणार आहे.  तेव्हा ताकदीने बाहेर एकजूट दाखवा ,बाकी व्यथा पक्षश्रेष्ठी पर्यंत पोहचवण्याचे काम विनायक देशमुख करतीलच असे पक्षाचे ज्येष्ठ नेते सुभाष गुंदेचा म्हणाले. 

नगर शहर,भिंगार काँग्रेस एका विचाराने काम करतात मी भाषण करणारा नव्हे  तर काम करणारा माणूस आहे. अनेकदा शहर जिल्हाध्यक्षपदाचा विषय येतो मात्र व्यक्तिशः नेत्यांपेक्षा काँग्रेसचे नेतृत्व चालविल्याने भक्कम फळी उभी राहिली आहे. अनेकदा भूलथापा देऊन कार्यकर्त्यांत चलबिचल निर्माण केली जाते. अनेकदा पक्ष अस्थिर केल्याचा आरोप केला जातो.काँग्रेस पक्ष हा १३५ वर्षाचा पक्ष आहे.मात्र वंचित मधून आलेले आम्हाला काँग्रेस पक्ष समजावून सांगतात,  काँग्रेस पक्ष ऐऱ्यागैऱ्याचा नाही असे म्हणतात, मात्र तेच पक्षात ऐरेगैरे आहेत म्हणून पक्षावर ही वेळ आली आहे. असा टोलाही बाळासाहेब भुजबळ यांनी आपल्या भाषणातून मारला. 

या मेळाव्यात ॲड.आर आर पिल्ले, महिला आघाडी शहर जिल्हाध्यक्ष सविता मोरे, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश सरचिटणीस फिरोज शफी खान,ए.सी विभागाचे ढोबळे ,रूपसिंग, दादा कदम, नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्या किरण अळकुटे,बाळासाहेब भंडारी, निखिल वारे,शशिकांत पवार आदींची भाषणे झाली. 

या मेळाव्याचे प्रास्ताविक जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस उबेद शेख यांनी केले.यावेळी सलीमभाई रेडियमवाले, निजाम पठाण, सागर जाधव, शारदा वाघमारे, मार्गारेट जाधव, सुमन काळापहाड, रजनी ताठे, डॉक्टर जाहिदा शेख, मीना घाडगे,ज्योती पाटोळे, प्रियंका गायकवाड, एमआय शेख, अज्जू शेख, अजय अवसरकर, मुकुंद लखापती, रवि सूर्यवंशी, परवेज अहमद, सुभाष रणदिवे, अनिल वराडे, संजय झोडगे, रजनी भोसले, ॲड भिंगारदिवे, विवेक येवले, विजय आहेर आदी उपस्थित होते. Post a Comment

0 Comments