राजमाता जिजाऊंची शिकवण आजही मार्गदर्शक

 राजमाता जिजाऊंची शिकवण आजही मार्गदर्शक 

 देशमुख : शहर काँग्रेसच्यावतीने राजमाता जिजाऊंना अभिवादन

    वेब टीम  नगर : ‘हिंदवी स्वराज्य स्थापन करतांना छत्रपती शिवाजी महाराज यांना राजमाता जिजाऊ यांची शिकवण ही आजच्या राज्यकर्त्यांना मार्गदर्शक आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व अ.भा.काँग्रेस सदस्य विनायकराव देशमुख यांनी सांगितले.

    अहमदनगर शहर काँग्रेसच्यावतीने राजमात जिजाऊ यांची ४२३ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी श्री. देशमुख बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ होते.

    येथील ऐतिहासिक वस्तू संग्रहालयातील राजमाता जिजाऊंच्या पुतळ्याला देशमुख यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यानंतर जवळच्या एका हॉलमध्ये छोटेखानी सोहळ्यात अभिवादन सभा घेण्यात आली.

देशमुख पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदार, मुस्लिम सह सर्व घटकांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्य निर्माण केले. ही शिकवण राजमाता जिजाऊंनी दिली, ती आजही सर्व राजकीय पक्षांसह सर्वांना दिशा देणारी अशी मार्गदर्शक आहे. या मार्गदर्शनाचा काँग्रेसने प्रारंभापासून स्वीकार केला, जनमाणसात ते रुजविले आहे, असेही ते म्हणाले.

     शहराध्यक्षभुजबळ, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस उबेद शेख, यांनीही यावेळी मनोगतात राजमाता जिजाऊंच्या कार्याचा गौरव केला. सर्वश्री फिरोज शफी खान, शामराव वाघस्कर, शशिकांत पवार, अभिजित कांबळे, रुपसिंग कदम, सुभाष रणदिवे, एम.आय.शेख, सलिम रेडियमवाला,  श्रीमती मार्गारेट जाधव, रजनी ताठे आदि उपस्थित होते.(फोटो-काँग्रेस-१२)

Post a Comment

0 Comments