नगरटुडे बुलेटिन 12-01-2021

  नगरटुडे बुलेटिन 12-01-2021

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलेंडर दरवाढीच्या विरोधात पेट्रोलच्या मशीनला चपलांचा हार

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने जीवनावश्यक वस्तूचे दरवाढीमुळे केंद्र सरकारचा निषेध                                                                                     

 वेब टीम नगर : पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस दरवाढीच्या विरोधात सर्वसामान्य जनता होरपळून निघत असल्याचे आ.संग्राम जगताप म्हणाले  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने केंद्र सरकारचा जाहीर निषेध करून इंपिरियल चौक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोर  करण्यात आली व पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोलच्या मशीनला चपलांचा हार घालून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला . 

यावेळी आ.  संग्राम जगताप,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे, महिला अध्यक्षा रेशमा आठरे, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष सुरेश बनसोडे, विद्यार्थी अध्यक्ष गजानन भांडवलकर, वैभव ढाकणे, युवती अध्यक्ष अंजली आव्हाड, साधनाताई बोरुडे, नगरसेवक समद खान, अमोल गाडे, प्रकाश भागानगरे, अजिंक्य बोरकर, विनीत पाऊलबुद्धे, सुनील त्रिंबके, आरिफ शेख, भिंगार युवक शहर संघटक मतीन सय्यद, गजेंद्र दांगट, विपुल वाखुरे, सैफअली शेख, विक्रांत दिघे, चेतन सपकाळ, किरण पंधाडे, अमित जाधव, सोमा तांबे, विशाल शिंदे, नितीन लिगडे, ऋषिकेश ताठे, रुपेश चोपडा, सुदर्शन ढवळे, आयाज सय्यद, अभिजीत खरपुडे, तनवीर मनियार, राजेश भालेराव, संभाजी पवार, रोहन शिरसाट, पंकज भंडारी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार म्हणाले की केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल व घरगुती गॅस सिलेंडर यावर दरवाढी विरोधात सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसला आहे जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती निम्म्यापेक्षा कमी झाल्या असताना पेट्रोलचे भाव निम्म्यावर येणे अपेक्षित होते परंतु केंद्र सरकारने यावर ५० टक्के पेक्षा अधिक कर लावून स्वस्त झालेल्या पेट्रोल डिझेलचा भाव देशातील जनतेला मिळवून दिला नाही आज कच्चा तेलाच्या किमतीत आंतरराष्ट्रीय बाजारात थोडीफार वाढ झालेली असताना देशात यावर लावलेल्या प्रचंड कर कमी करून पेट्रोल डिझेल व घरगुती गॅस याच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी हे शासनाचे कर्तव्य होते याशिवाय स्वयंपाक घरातील गॅस सिलिंडरच्या किमती ४००रुपये वरून ८०० रुपये पर्यंत वाढ झालेली असून सर्वसामान्य गृहिणीचे बजेट कोलमडले आहे या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे.  

यावेळी बोलताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अभिजित खोसे म्हणाले की पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅस याने उच्चांक गाठला आहे इंधन दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे त्यामुळे गोरगरीब जनतेला आर्थिक झळ बसून ते त्रस्त झाले आहेत सर्व स्तरावर महागाई वाढलेली असून सर्वसामान्य जनतेला जगणे कठीण झाले आहे व सर्वसामान्यांना चांगले दिवस दाखवण्यासाठी पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅस सिलेंडर वरील लावलेले विविध कर त्वरित मागे घेऊन त्याच्या किमती कमी करण्यात यावे असे म्हणाले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

रुग्णालयांप्रमाणे सार्वजनिक सभागृह, सरकारी कार्यालय व अपार्टमेंटचे फायर ऑडीट व्हावे

 शिवसनेनेचे उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे यांचे मुख्यमंत्री व पालकमंत्री यांना निवेदन

शहराच्या अग्निशमक दलास अद्यावत सोयी-सुविधांसह नवीन अग्नीशमनबंब असलेली वाहने उपलब्ध करुन देण्याची मागणी

वेब टीम नगर : सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने रुग्णालयांप्रमाणे सार्वजनिक सभागृह, सरकारी कार्यालय व अपार्टमेंटचे फायर ऑडीट व्हावे व शहरातील अग्निशमक दलास अद्यावत सोयी-सुविधांसह नवीन अग्नीशमनबंब असलेली वाहने उपलब्ध करुन देण्याच्या मागणीचे निवेदन शिवसनेनेचे उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना ईमेलद्वारे पाठविले.

नुकतेच भंडारा जिल्हा रुग्णालयातील दहा नवजात शिशूंचा आगीने होरपळून मृत्यू झाला. प्रशासनाच्या चुकीमुळे दहा नवाजत शिशू मृत्यूमुखी पडले. या मन हेलावणार्‍या या दुर्घटनेमुळे संपुर्ण महाराष्ट्र हादरला असून, प्रत्येकाचे मन सुन्न झाले आहे. या घटनेने प्रत्येक जिल्ह्यातील रुग्णालये सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला असताना शासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, महाराष्ट्रातील सर्वच रुग्णालयांचे फायर ऑडीटचे आदेश देण्यात आलेले आहे. मात्र हा आगीचा प्रकार फक्त हॉस्पिटल पुरता मर्यादीत नसून, सार्वजनिक सभागृह, सरकारी कार्यालय व अपार्टमेंटचे फायर ऑडीट होणे गरजेचे आहे.

फायर ऑडीट करणे बंधनकारक असताना देखील रुग्णालय सार्वजनिक सभागृह, सरकारी कार्यालयांचे नियमीत फायर ऑडीट होत नाही. काहींनीच फायर ऑडिट केलेले आहे. तर काहींनी फक्त कागदोपत्री फायर ऑडीट झाल्याचे भासवलेले आहे. अनेक ठिकाणी अग्निशमन करणार्‍या सिलेंडरचे नुतनीकरण देखील करण्यात येत नाही. फायर सेफ्टीसाठी वापरण्यात येणार्‍या साधन सामुग्री हॉस्पिटल व कार्यालयात सुसज्ज अवस्थेत नसतात. प्रशासनाच्या अशा बेफिकरीमुळे भंडारा जिल्ह्यासारखी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. जून २०१२ मध्ये मंत्रालयाला आग लागून मोठे नुकसान झाले होते. यामध्ये अनेक महत्त्वाची कागदपत्रे जळाली होती. तर भंडारा जिल्ह्यात घडलेल्या या घटनेने पुन्हा फायर ऑडीटचा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. फायर सेफ्टीबाबत सर्वच अनभिज्ञ असून, या घटनेचा धडा घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने उपाययोजना व्हावी.

तसेच अहमदनगर शहरात महापालिकेचे अग्निशमक विभाग असून, यामध्ये जुनाट व जीर्ण झालेल्या दोनच गाड्या असतित्वात आहे. महापालिकेचे जुने सभागृह आगीत भस्मसात झाले. त्याचवेळी अग्निशमक विभाग अद्यावत करण्याची गरज होती. शहरात मोठी आग लागल्यास इतर ठिकाणाहून अग्निशमकबंब बोलविण्यात येतात. यामध्ये मोठा वेळ वाया जातो. भविष्यातील एखादी मोठी आगीची मोठी दुर्घटना टाळण्यासाठी शहरातील अग्नीशमक विभाग अद्यावत व सुसज्ज करण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. सदर प्रश्‍नाचा गांभीर्याने विचार करुन सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने रुग्णालयांप्रमाणे सार्वजनिक सभागृह, सरकारी कार्यालय व अपार्टमेंटचे फायर ऑडीट व्हावे व शहरातील अग्निशमक दलास अद्यावत सोयी-सुविधांसह नवीन अग्नीशमनबंब असलेली वाहने उपलब्ध करुन देण्याची मागणी शिवसनेनेचे उपजिल्हाप्रमुख लहामगे यांनी केली आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कोरोना लसीकरणत  राज्यातील माथाडी कामगारांचा पहिल्या टप्प्यात समावेश व्हावा : अविनाश घुले

    वेब टीम  नगर : देशात येत्या १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहिम सुरु करण्यात येणार आहे. सुरुवातीस आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवकांना ही लस मोफत दिली जाणार आहे. या बरोबरच राज्यातील सर्व माथाडी कामगार, कष्टकरी, हमाल-माथाडी यांना सुद्धा यावेळेस मोफत लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी राज्य हमाल मापाडी संघटनेचे सहचिटणीस अविनाश घुले यांनी केली आहे.

     याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, कामगार मंत्री दिलीप वळसे , जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांना पाठवून ही मागणी केली आहे. अत्यावश्यक सेवेमध्ये ज्याप्रमाणे डॉक्टर्स, सिस्टर, मनपा कर्मचारी, पोलिस यांचा सहभाग होतो, त्याचबरोबर यांच्या बरोबरीने राज्यातील माथाडी कामगार आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. हमाल-मापाडी सर्व माथाडी कामगार यांचा सुरुवातीच्या काळात अत्यावश्यक सेवेमध्ये समावेश करण्यात आला आहे. यापूर्वीही कोरोना काळात माथाडी बोर्डाच्यावतीने हमाल-माथाडी कामगारांना चार हजार रुपयांचे अनुदानही यावेळी प्राप्त झाले होते. अशा कष्टकरी वर्गाला पहिल्या टप्प्यात लसीकरण मोफत केले पाहिजे, अशी मागणी घुले यांनी केली आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कामरगावात माजी सैनिक व त्यांचे  कुटुंबिय ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात

भ्रष्टाचार मुक्ती , परिवर्तनाचा नारा देत जय जवान, जय किसान पॅनलची निर्मिती

वेब टीम नगर :  नगर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी रंगत मध्ये आली असताना, निवडणुक अटीतटीची होण्याची चिन्हे दिसत आहेत. कामरगाव (ता. नगर) मध्ये माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांनी एकत्र येत भ्रष्टाचार मुक्ती व परिवर्तनाचा नारा देत जय जवान, जय किसान पॅनलची निर्मिती केली. तर विकासाच्या मुद्दयांवर प्रस्थापितांविरोधात शड्डू ठोकला आहे.

गावातील सेवानिवृत्त सुभेदार प्रकाश ठोकळ यांनी या पॅनलची निर्मिती केली. या पॅनलमध्ये तुकाराम कातोरे, विमल सोनवणे, मंगल साठे, संदीप ढवळे, आशाबाई ठोकळ, पुजा लष्करे, अलका ठोकळ, अश्‍विनी ठोकळ, हिरामण शिंदे, अनिल आंधळे, कामिनी ठोकळ या माजी सैनिक, सैनिक कुटुंबातील सदस्य व शेतकरी यांना संधी देण्यात आली आहे. सुशिक्षित, युवा व सामाजिक कार्याची जाण असलेले उमेदवार रिंगणात उतरल्याने ही निवडणुक अटीतटीची होणार आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पर्यावरण संवर्धनासाठी एक व्यक्ती, एक झाड ही संकल्पना राबवावी

अ‍ॅड. भानुदास होले : गुलमोहर रोड येथे वृक्षरोपण

वेब टीम नगर : पर्यावरण संवर्धनासाठी एक व्यक्ती, एक झाड ही संकल्पना सर्वांनी राबवावी. प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन केले पाहिजे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षरोपण व संवर्धनाशिवाय पर्याय राहिला नसल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. भानुदास होले यांनी केले.

सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड येथे आयोजित वृक्षरोपण अभियानाच्या उद्घाटनाप्रसंगी अ‍ॅड. होले बोलत होते. यावेळी जय युवाचे अ‍ॅड. महेश शिंदे, आधारवडच्या अध्यक्षा अ‍ॅड.अनिता दिघे, अ‍ॅड.पुष्पा जेजुरकर, अ‍ॅड.गौरी सामलेटी, अ‍ॅड.सुनिल तोडकर, पोपटराव बनकर, सागर अलचेट्टी, आरती शिंदे, रजनी ताठे, आदिती उंडे, किरण सातपुते आदी उपस्थित होते.

अ‍ॅड. महेश शिंदे म्हणाले की, मानवाने निसर्गावर अतिक्रमण करुन त्याचे समतोल बिघडवले आहे. हल्ली ऋतू देखील बदलले असून, याला मनुष्य जबाबदार आहे. जंगलाची कत्तल करण्यात आल्याने जंगली प्राणी मनुष्य वस्तीत आढळत आहे. प्रत्येकाने निसर्गाचे समतोल साधण्यासाठी एक तरी झाड लावण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. अ‍ॅड. होले यांच्या संकल्पनेतून वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. यावेळी विशेषत: देशी जातीचे व नारळाच्या झाडांचे रोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन सागर अलचेट्टी यांनी केले. आभार अ‍ॅड.अनिता दिघे यांनी मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

डोंगरगणला जंगले महाराजांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन

    वेब टीम  नगर :  डोंगरगण येथील ज्ञानेश योग आश्रम संस्थेत गुरुवर्य हभप जंगले महाराज शास्त्रींजीच्या हस्ते इंजिनिअर्स अ‍ॅण्ड कॉन्ट्रॅक्टर्सच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.

     सुफला एकादशी निमित्त गीता पाठाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बी.एस.एन.एल.चे सेवानिवृत्त श्री व सौ.प्रगती सुधाकर पवार यांनी २०२१ वर्षाचे कॅलेंडर वारकरी सांप्रदायातील, दिंडीतील सेवेकरी, गीता पाठातील शिष्यवृंद आदिंसाठी स्व:खर्चाने काढले. त्याचे प्रकाशन करण्यात आले.

     याप्रसंगी इंजि.अनिल साळूंखे, सुषमा साळूंखे, राधाकिसन भुतकर, बाळासाहेब खेत्री, प्रतिक पवार, सुयोग पवार, आदिंसह भाविक उपस्थित होते. यावेळी हभप भागवत महाराज जंगले, हभप चंद्रकांत महाराज मोहिते यांनी पवार दापत्यांनी काढलेल्या दिनदर्शिकेचे कौतुक करुन सर्व सदस्यांना चांगला उपयोग होईल, असे सांगितले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

नाभिक महामंडळ राज्य सोशल मिडिया प्रमुखपदी अजय रंधवे

   वेब टीम नगर :  महाराष्ट्र नाभिक महामंडळ राज्य सोशल मिडिया प्रसिद्धीप्रमुखपदी अजय रंधवे यांची निवड करण्यात आली. औरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय कार्यकारिणीच्या मेळाव्यात महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष ओबीसी नेते कल्याणराव दळे यांनी अजय रंधवे यांच्या नावाची घोषणा केली.

     या मेळाव्याला महाराष्ट्र प्रजा लोकशाही परिषदेचे नेते व ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी आर्गोनाझेशन राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी, गोर बंजारा समाजाचे अध्यक्ष संदेश चव्हाण, कर्मचारी प्रदेशाध्यक्ष उत्तम सोलाणे, प्रदेश कार्याध्यक्ष दामोदर बिडवे, प्रदेश संपर्क प्रमुख किशोर सूर्यवंशी, प्रदेश उपाध्यक्ष माऊली गायकवाड, भगवान वाघमारे, प्रदेश सरचिटणीस पांडूरंग भवर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरेंद्र कावरे आदि उपस्थित होते.

     यापूर्वी श्री. रंधवे यांची जिल्हा नाभिक युवक अध्यक्ष निवड झाल्यावर श्रीगोंदा तालुक्यासह त्यांनी जिल्ह्यात महामंडळ वाढविण्यासाठी प्रयत्न केले. छोट्या-मोठ्या कार्यक्रमांना सोशल मिडियाद्वारे राज्यभर प्रसिद्ध देऊन चांगले काम केल्यामुळे त्यांची राज्याच्या सोशल मिडिया प्रमुखपदी निवड केली, असल्याचे दळे यांनी आपल्या भाषणातून सांगितले.

     अजय रंधवे यांचे रेणुकादास वैद्य, युवराज शिंदे, नानाभाऊ शिरसाठ, बाळासाहेब भुजबळ, विजय क्षीरसागर, अनिल निकम, संभाजी गवळी, रोहन रंधवे, गणेश शिंदे, रमेश बिडवे, सोमनाथ कदम, दिलीप शिंदे, धनशाम जाधव, वनिता बिडवे आदिंसह पदाधिकार्‍यांनी अभिनंदन केले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

प्रलंबित प्रश्‍न सोडविण्यास चारही नगरसेवक संघटीत असल्याने कामे मार्गी लागतात 

बाळासाहेब पवार : रेणुकानगरला आरसीसी गटार कामाचा शुभारंभ

    वेब टीम  नगर :  केवळ निवडणुकीत नागरिकांसमोर मतांसाठी न फिरता नित्यनियमाने प्रभागात रोज लोकांच्या संपर्कात राहून त्यांचे काय प्रश्‍न आहेत हे आम्हाला समजते. निवडणुकीपुरते जनतेसमोर येणे हे आमच्या स्वभावाला पटत नाही. प्रभाग दोन मधील अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्‍न सोडविण्यास चारही नगरसेवक संघटीत असल्याने अनेक कामे मार्गी लागतात, असे प्रतिपादन माजी नगरसेवक बाळासाहेब पवार यांनी केले.

     नगर- औरंगाबाद रोडवरील रेणुकानगरला आरसीसी गटार कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक बन्सी काळे यांचे हस्ते रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नगरसेवक सुनिल त्र्यंबके, विनित पाउलबुधे, माजी नगरसेवक निखिल वारे, योगेश पिंपळे, बबलू सूर्यवंशी, रविंद्र पटाईत, किरण अवसरकर, सागर मेट्टू, सचिन लोटके, नामदेव जगताप आदि मान्यवर उपस्थित होते.

   पवार पुढे म्हणाले, पाच वर्षातून एकदाच जनतेसमोर जाणे आणि सतत ५ वर्षे जनतेबरोबर राहून प्रश्‍न सोडविणे यामध्ये फरक आहे. आम्ही जनतेसोबत आहोत, त्यामुळे जनता पाठिशी आहे. खूप जुने प्रश्‍न वर्षानुवर्षे सुटत नसल्याने नागरिक नाराज होतात ते प्रश्‍न सोडवून आम्ही नागरिकांना दिलासा दिला आहे, असे सांगितले.

     नगरसेवक सुनिल त्र्यंबके, विनित पाउलबुधे आदिंनी नागरिकांचे प्रश्‍न सुटले पाहिजे, केवळ आश्‍वासने दयायला आम्हाला आवडत नाही, असे स्पष्ट केले. तर निखिल वारे यांनी प्रभाग मोठा असल्याने प्रश्‍न कितीही असले तरी ते सोडविण्यासाठीच नगरसेवकपदाच्या माध्यमातून चौघांचा प्रयत्न असतो तो प्रयत्न यशस्वी होतो, असे सांगितले.    यावेळी उषा नवले, अंजना जगताप, सपना पटाईत, अमृता तंगडपल्ली, मनिषा काळे आदिंसह नागरीक उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

व्हीआरडीई स्थलांतरण थांबवावे : कर्मचार्‍यांची आर्त हाक

   वेब टीम नगर :  व्हीआरडीईचे स्थलांतर होऊ नये यासाठी येथील कर्मचार्‍यांनी व्हीआरडीई गेटसमोर निदर्शने केली. याप्रसंगी दुर्गेश गाडेकर, ए.एम.जाधव, पी.जी.गवळी, के.बी.करोसिया आदिंसह अधिकारी, कर्मचारी व कामगार उपस्थित होते.

     वरिष्ठ पातळीवरुन व्हीआरडीई हलविण्याचे दिलेले संकेत हे येथील अधिकारी, कर्मचार्‍यांसह नगरकरांसाठी मोठे हानिकारक ठरणार आहे. देशाच्या सैन्याला लागणारे अत्याधुनिक शस्त्रास्त्र बनविण्यात महत्वाची भुमिका ही नगरच्या व्हीआरडीईची राहिलेली आहे. यामध्ये वैज्ञानिक, अधिकारी व कर्मचारी, कामगार असे जवळपास १००० हजार जण कार्यरत आहेत. त्यावर त्यांच्या कुटूंबांचा उदरनिर्वाह चालतो. त्याचप्रमाणे या १००० कुटूंबाला लागणार्‍या  जीवनावश्यक वस्तू व इतर गरजांवर अनेक व्यवसायिक अवलंबून आहेत. गेल्या २०-२५ वर्षांपासून संस्थेत काम करणारे नगरमध्येच स्थायिक झाले असल्याने कौटूंबिक वाताहात होईल. अहमदनगरचे आर्थिक, सामाजिक व मानसिक नुकसान थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत, यासाठी व्हीआरडीई बचाओ आंदोलनाच्या शिष्टमंडळाने आतापर्यंत स्थानिक लोकप्रतिनिधीसह खासदार, आमदार, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे तसेच विविध पक्षांच्या पदाधिकार्‍यांना स्थलांतर थांबविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती केली आहे. सर्वच पातळ्यांवर व्हीआरडीई बचाओ आंदोलनाचे शिष्टमंडळ प्रयत्नशील आहेत.

     व्हीआरडीईत तयार होणार्‍या शस्त्रस्त्रासाठी लागणार्‍या छोट-मोठ्या तांत्रिक कामांवर येथील एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे. हा रोजगार स्थलांतरीत होईल. त्यामुळे नगरच्या औद्योगिक विकासाला खीळ बसणारा आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करुन हे स्थलांतरण थांबविण्यासाठी लढा द्यावा, असे आवाहन शिष्टमंडळाने केले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शहरातील सर्वच फलकांचा महापालिकेने आढावा घ्यावा

भाजपचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. अभय आगरकर यांची मागणी

वेब टीम नगर : केवळ नेहरू पुतळ्याजवळीच नव्हे, तर संपूर्ण शहरात लावण्यात आलेल्या जाहिरात फलकांचा आढावा घेऊन परवानगीविना लावलेले फलक काढण्यात यावेत अथवा त्यांच्याकडून कर वसूल करावा, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. अभय आगरकर यांनी केली आहे.

नेहरू पुतळ्यासोर लावलेले होर्डिंग्ज काढण्याच्या मागणीसाठी काँग्रेसने मध्यंतरी आंदोलन केले. या आंदोलनानंतर तेथील काही होर्डिग्ज काढण्यात आले. अ‍ॅड. आगरकर यांनी या पार्श्‍वभूमीवर ही मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे, की शहरात ठिकठिकाणी जाहिरात, वाढदिवसाच्या शुभेच्छा याचे फलक लागलेले आहेत. हे फलक लावण्यासाठी महापालिकेची अधिकृत परवानगी आहे का? नसेल तर या फलकांवर कारवाई का होत नाही? जाहिराती किंवा शुभेच्छांचे फलक याबाबत न्यायालयाने मध्यंतरी आदेश दिलेले आहेत. शहराचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. विना परवानगी फलक लावलेले असल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचेही आदेश दिलेले आहेत.

न्यायालायच्या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब महापालिकेकडून होताना दिसत नाही. तसेच आतापर्यंत किती जणांवर गुन्हे दाखल केले, हे देखील महापालिकेने स्पष्ट केले पाहिजे. न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वाप्राणे फलक लावण्यात आलेले असतील तर त्याचा कर महापालिकेला मिळतो का, हे देखील पाहिले पाहिजे. असे फलक महापालिकेचे मोठे उत्पन्नाचे साधन आहेत. अगोदरच आर्थिक संकटात असल्याचे एकीकडे महापालिका सांगत असताना दुसरीकडे मात्र अशा उत्पन्नाकडे जाणवपूर्वक दुर्लक्ष करते. एरवी रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारणारी महापालिका जाहिरात व शुभेच्छांच्या फलकाबाबत मात्र मिठाची गुळणी घेत आहे. महापालिकेने आंदोलन झाले म्हणून फक्त नेहरू पुतळ्यासोरील होर्डिंग्ज काढण्यावर थांबू नये, तर शहरातील सर्वच फलकांचा आढावा घ्यावा, अशी मागणी अ‍ॅड. आगरकर यांनी केली आहे. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

संकटातून बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक उपक्रम महत्वाचे

 सुनंदा नागले : संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त आयोजित पारायणाची सांगता

   वेब टीम नगर :  श्री संत संताजी जगनाडे महाराज यांनी समाजाच्या उन्नत्तीसाठी मोठे योगदान दिले आहे. आपल्या नित्यकर्मातून देवाला प्रसन्न करुन घेतले. भगवंताचे नामस्मरणाने आपले दु:ख कमी होते, त्यासाठी नित्यनियमाने भगवंतांचे नामस्मरण केले पाहिजे. कोरोनामुळे संपूर्ण मानवजातीवर संकट आले आहे. या काळात अनेकांचे मानसिक, शारीरिक, आर्थिक स्वास्थ्य बिघडले आहे. या संकटातूनच भगवंतच आपल्या बाहेर काढू शकतो. त्यासाठी आध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळेच श्री संताजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ट्रस्टच्या माध्यमातून समाजाच्या हिताचे उपक्रम राबविण्यात येत असतात. यासाठी अनेकांचे सहकार्य मिळत असते, असे प्रतिपादन तिळवण तेली समाज ट्रस्टच्या अध्यक्षा सुनंदा नागले यांनी केले.

     संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यथितीनिमित्त तिळवण तेली समाज ट्रस्टच्यावतीने दाळमंडई येथील विठ्ठल-रुख्मीणी मंदिरात गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पारायण सोहळ्याचा समारोप संत संताजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करुन करण्यात आला. याप्रसंगी हभप रामदास महाराज क्षीरसागर, ट्रस्टच्या अध्यक्षा सुनंदा नागले, उपाध्यक्षा निता लोखंडे,  सचिन शेंदूरकर, प्रकाश सैंदर, प्रसाद शिंदे, सागर काळे, गोकूळ कोटकर, दत्तात्रय डोळसे, मनोज क्षीरसागर, शशिकांत देवकर आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी हभप रामदास महाराज क्षीरसागर यांनी काल्याच्या किर्तनातून श्री संत जगनाडे महाराज यांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगितले. संतांजी महाराजांची ज्याप्रमाणे आपले जीवन जगच्या कल्याणासाठी वेचले, त्याप्रमाणे प्रत्येकाने आपल्या मिळलेल्या मनुष्यरुपी जीवनाचा इतरांच्या भल्यासाठी उपयोग करावा. आपले सत्कर्मच आपली जीवननैय्या पार करु शकतो हे विविध दाखले देत भाविकांना समजावून सांगितले. 

     यावेळी प्रकाश सैंदर म्हणाले,  सालाबादप्रमाणे यंदाही संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त गाथा पारायणाचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान दररोज पारायण, नामजाप, हरिपाठ होत. आज काल्याचे किर्तन होऊन संताजी महाराजांच्या मूर्तीची पूजा व आरती होऊन पुष्पवृष्टी करण्यात आली. यामध्ये समाजातील बंधू-भगिनींनी उपस्थित होते.

     यावेळी ज्येष्ठ नागरिक बबनराव सैंदर, प्राची मंगेश वाचकवडे, दामोदर नाळके, आशिष नाळके आदिंचा सन्मान करण्यात आला. प्रारंभी पालखी मिरवणुक, महाप्रसादचा भाविकांनी लाभ घेतला.  हे सर्व कार्यक्रम शासकीय नियमांचे पालन करुन पार पाडले. यावेळी हभप रामदास महाराज शेंडे, रमेश साळूंके, स्वरुप नागले, विजय दळवी, कृष्णकांत साळूंके, वसंत शिंदे, किसनराव क्षीरसागर, बाबूराव लोखंडे, सुरेश देवकर, गणेश धारक, रेवनाथ नागले, दिलीप साळूंके आदिंसह ट्रस्टचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद शिंदे यांनी केले तर आभार गोकूळ कोटकर यांनी मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सदृढ व निरोगी पिढीसाठी गर्भसंस्कार काळाची गरज : नगरसेवक शीतल जगताप

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त. बोरुडे हॉस्पिटल व हुमनिटी केअर फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत गर्भसंस्कार शिबीर

वेब टीम नगर : सदृढ व निरोगी पिढीसाठी गर्भसंस्कार काळाची गरज बनली आहे. यामध्ये योग्य आहार, व्यायाम व ध्यानधारणेद्वारे बाळाचे व मातेचे आरोग्य चांगले राहण्यासाठी मार्गदर्शन केले जात असल्याचे प्रतिपादन शारदा होसिंग यांनी केले व आई व बाळाच्या शुद्धीकरणासाठी होम-हवन देखील करण्यात आले बोरुडे हॉस्पिटल व हुमनिटी केअर फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने महिलांसाठी मोफत गर्भसंस्कार वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या शुभारंभा प्रसंगी शारदा होसिंग बोलत होत्या. यावेळी नगरसेविका शीतलताई जगताप डॉ. हिरा बोरुडे, डॉ.अश्विनी बोरुडे, डॉ.सोनल बोरुडे, डॉ रत्ना बल्लाल, डॉ.सोनल बोरुडे, कांचन इंगवले, श्रुतिका दरेकर, मंजुषा ढवळे आदी उपस्थित होते.

 शारदा होशिंग यांनी गर्भधारणे पासून प्रसूती पर्यंत प्रत्येक महिन्यात घ्यावयाची काळजी, आहार आणि औषध उपचार यावर मार्गदर्शन केले. तर.डॉ रत्ना बल्लाल यांनी गर्भसंस्कार या विषयावर मार्गदर्शन करुन गर्भधारणेनंतर योगा व ध्यानधारणेचे महत्त्व सांगितले. तसेच गर्भसंस्कारद्वारे एक आदर्श पिढीचा निर्माण कसा करावा यावर सविस्तर माहिती दिली. यावेळी महिलांना प्राणायाम आणि ध्यानाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. या गर्भसंस्कार वर्गाला गरोदर महिलांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

फिनिक्स फाऊंडेशनच्या मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरास प्रतिसाद


राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त : 32 नागरिकांचा मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प

वेब टीम नगर :  राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने नागरदेवळे (ता. नगर) येथे मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. या शिबीरात 452 रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबीरास ज्येष्ठ नागरिकांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी ७४ रुग्णांची निवड करण्यात आली आहे. तर फाऊंडेशनने केलेल्या अवयवदानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत 32 नागरिकांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प केला.

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन या शिबीराचे उद्घाटन नगर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश गुंड व सचिव दत्ता इंगळे यांच्या हस्ते झाले. यावेळी फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, जितेंद्र आढाव, वैभव दानवे, बाबासाहेब धीवर, किरण कवडे, सौरभ बोरुडे, तुषार मरकड, विठ्ठल राहिंज आदी उपस्थित होते.

योगेश गुंड म्हणाले की, मुलांमध्ये शिवाजी महाराजांसारखे संस्कार घडविण्यासाठी राजमाता जिजाऊंच्या विचारांची गरज आहे. तर स्वामी विवेकानंदांच्या विचाराने सक्षम युवा पिढी निर्माण होणार आहे. विवेकानंदांनी मनुष्यरुपी ईश्‍वराची सेवा करण्याचा संदेश दिला. तर जिजाऊंनी रयतेला मुलांप्रमाणे जपण्याचे संस्कार शिवरायांमध्ये घडविले. आज कोरोना व महागाईच्या संकटामुळेअनेक गरजू आरोग्य सुविधेपासून वंचित आहे. मनुष्यरुपी सेवेतूनच ईश्‍वरसेवा करण्यासाठी फिनिक्स फाऊंडेशनेने सुरु केलेले सामाजिक कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. दत्ता इंगळे यांनी देखील फिनिक्स फाऊंडेशनने गरजू रुग्णांसाठी आरोग्य शिबीर घेऊन त्यांना आधार देण्याचे काम केले असल्याचे सांगितले.  

जालिंदर बोरुडे म्हणाले की, समाजातील महापुरुषांनी वंचितांना नेहमीच आधार देण्याचे कार्य केले. त्यांचे कार्य आजही सर्व समाजाला दिशादर्शक व प्रेरणादायी आहे. त्यांचे आदर्श समोर ठेऊन समाजातील अनेक गरजू घटकांना आरोग्य सुविधा मिळण्यासाठी फिनिक्स फाऊंडेशन विविध मोफत आरोग्य शिबीर घेत आहे. तर काळाची गरज ओळखून अवयवदानाप्रती जनजागृती करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गावातील संत सावता महाराज मंदिर येथे घेण्यात आलेल्या या शिबीरात रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच गरजूंना अल्पदरात नंबरचे चष्मे देखील उपलब्ध करुन देण्यात आले होते. नगर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी योगेश गुंड व सचिवपदी दत्ता इंगळे यांची निवड झाल्याबद्दल फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. शिबीर यशस्वी करण्यासाठी फाऊंडेशनचे सदस्य व नागरदेवळे ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

महागाई भत्त्याची थकबाकी मिळण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करावे 

बाबासाहेब बोडखे : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मागणी

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वित्त विभागाचे प्रधान सचिव व शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना निवेदन

वेब टीम नगर : पाच महिन्यांच्या कालावधीत महागाई भत्त्याची थकबाकी रोखीने मिळण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, वित्त विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांना देण्यात आली असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

१ जुलै २०१९पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याची दर बारा टक्के वरून सतरा टक्के करण्यात आला. सदर महागाई भत्तावाढ दि.१डिसेंबर २०१९ पासून रोखीने देण्यात आली. तसेच दि.१ जुलै २०१९ते ३० नोव्हेंबर२०१९या पाच महिन्यांच्या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी बाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येतील असे शासनाने मागील शासन आदेशाद्वारे घोषित केले होते. परंतु घोषित केल्याप्रमाणे शासनादेश अद्यापि निर्गमित करण्यात आलेला नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे. दि.१जुलै २०१९ ते ३० नोव्हेंबर२०१९या पाच महिन्यांच्या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी रोखीने देण्यासाठी शासन निर्णय त्वरीत निर्गमित करण्याच्या मागणीसाठी शिक्षक परिषद आग्रही असल्याचे शिक्षक परिषदचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी म्हंटले आहे. हा शासन निर्णय निर्गमीत होण्यासाठी बोडखे, प्रा.सुनिल पंडित, शरद दळवी, शशिकांत थोरात, विनायक कचरे, तुकाराम चिक्षे, सखाराम गारूडकर, अशोक झिने, रावसाहेब चौधरी, प्रा. सुनिल सुसरे, सुभाष ढेपे, विठ्ठल ढगे, अनिता सरोदे, सुलभा कुलकर्णी, बबन शिंदे, विनायक साळवे, प्रा.श्रीकृष्ण पवार, प्रा. बाबासाहेब शिंदे, सर्जेराव चव्हाण, इकबाल, निलेश बांगर, नितीन म्हस्के, देवकर , अरूण राशिनकर, वसंत गायकवाड, उकीर्डे, अरविंद आचारी, अनिल आचार्य, शिवाजी धाडगे, सुरेश विधाते, अविनाश आपटे, थोरे, प्रदीप बोरूडे, युनूस शेख, ईकबाल काकर आदि प्रयत्नशील आहेत.



Post a Comment

0 Comments