आरोग्याचा मूलमंत्र : योगसाधना , आरोग्य आहार

 आरोग्याचा मूलमंत्र 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

योगसाधना पश्चिमोत्तानासन (अर्ध)

 अर्ध पश्चिमोत्तानाहे खरे स्वतंत्र आसन नाही पश्चिमोत्तानासन (पूर्ण )हे खरे आसन आहे.  पण ते जमण्यास अवघड आहे .व ते जमण्याकरता त्याच्या सारख्या वळणा ची  सवय व्हावी म्हणून हे अर्ध पश्चिमोत्तानासन शिकविले जाते. याचा उल्लेख कोणत्याही योगाच्या संदर्भ ग्रंथात नाही.

 क्रिया : 
आसनस्थिती 

पूर्वस्थिती -बैठक स्थिती :

१)डाव्या पायाची गुडघ्यात घडी घालून त्याची टाच उजव्या जांघे शेजारी येईल अशी ठेवा 

२) फक्त श्वास घ्या 

३)श्वास सोडत -सोडत डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडा उजवा हात मागून कमरेभोवती लपेटून घ्या 

४) श्वास पूर्णासोडलेल्या स्थितीत खाली वाका व कपाळ गुडघ्याला लावा. गुडघा उचलू देऊ नका श्वसन संथपणे चालू ठेवा. 

आसन स्थिती सोडणे 

१)श्वास सोडा  व श्वास घेत-घेत डोके वर उचला 

२)दोन्ही हात जागेवर घ्या 

३) डावापाय सरळ करून बैठक स्थितीत या 

टीप -उजवा पाय गुडघ्यात वाकवून अशाच पद्धतीने हे आसन पूर्ण करा . त्यावेळी डाव्या-उजव्या बाजूचे आवश्यक ते बदल करून घ्या . 

आसनस्थिती  या आसनात खाली वाकण्याची प्रक्रिया पूर्ण पश्चिमोत्तानासन प्रमाणे आहे. याचे वर्णन पुढे येणार आहे. या आसनात एका पाय घडी घातलेल्या अवस्थेत राहतो . त्यावेळी मांडी व पोटरी  जमिनीवर पूर्णतः टेकलेली ठेवा . 

कालावधी - याआसनाचा कालावधी सुमारे ३० सेकंद ठेवला तर त्याचे फायदे अनुभवायला मिळतात . अभ्यासाने हा कालावधी चार ते  पाच मिनिटांपर्यंत वाढवता आला पाहिजे. 

दक्षता -खाली वाकताना गुडघे व मांडी जमिनीपासून वर उचलण्याकडे प्रवृत्ती असते त्यावेळी प्रयत्न पूर्वक तेथे लक्ष देऊन गुडघा व मांडी जमिनीवर पूर्णपणे टेकलेली राहिल असे पाहिले पाहिजे . 

हे आसन पाठीच्या  कण्याच्या काही विकारांवर हे आसन  चांगले आहे असे सांगितले असले तरीही अशा रुग्णानी  तज्ञाच्या सल्ल्याशिवाय हे आसन करू नये.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आरोग्य आहार 

राघवदास लाडू 

साहित्य : २ वाट्या भरून रवा , २ वाट्या डाळीचा रवा, २ वाट्या तूप , ५-६ वेलदोड्याची पूड, बदामाचे काप, बेदाणे , ४ वाट्या साखर, पाव किलो खवा, अर्धी वाटी दुध व चिमूटभर केशरी रंग. 

कृती : एका जाड भांड्यात पाऊण वाटी तूप घालून  मंद आचेवर रवा खमंग भाजावा.दुसऱ्या पातेल्यात उरलेले तूप घालून मंद आचेवर डाळीचा रवा खमंग भाजावा.भाजून झाल्यावर खाली उतरवून दुधाचा हबका मारून ढवळून, भाजलेल्या रव्यात घालावा.  

कढईमध्ये खवा हाताने मोकळा  करून गुलाबी रंगावर भाजावा. ताटात काढून कोमट असतांना हाताने मळून रवा व डाळीच्या भाजलेल्या रव्यात मिसळावा. त्यातच वेलदोडा पूड,बदाम काप व बेदाणे घालावेत. 

४ वाट्या साखरेत दिड वाटी पाणी घालून एकतारी पाक करावा. थोडा केशरी रंग घालावा. गॅस बंद करून रवा- खव्याचे मिश्रण घालून एकजीव होईपर्यंत ढवळावे. 

मिश्रण घट्ट व्हायला वेळ लागतो. ६-७ तासांनी लाडू वाळण्यायोग्य होतात. मध्यम आकाराचे लाडू वळून वर बेदाणा व बदामाचा काप लावाव. 

टीप :

*  हे लाडू शक्यतो साजूक तुपात करावेत.खवा व साजूक तुपाने लाडूला छान चव येते.खव्याने लाड़ू मऊसर होतात.                    

* नुसत्या डाळीच्या रव्याचे वरील पद्धतीने केलेले लाडू उत्तम होतात.  

Post a Comment

0 Comments