मूलमंत्र आरोग्याचा : योगसाधना,आरोग्य आहार

 मूलमंत्र आरोग्याचा 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

योगसाधना -वक्रासन (प्रकार -२)

वक्रासनाच्या पहिल्या प्रकारापेक्षा या प्रकारात अधिक प्रगत अवस्था आहे या प्रकारात खांद्या बरोबरच एका पायाच्या गुडघ्याचे ही सहाय्य घेऊन कण्यातील ताण अधिक वाढवला जातो. 

 क्रिया :

 आसनस्थिती घेणे 

पूर्वस्थिती बैठक स्थिती 

१) डावा पाय गुडघ्यात वाकून पूर्वीप्रमाणे  उजव्या मांडी जवळ उभा करा 

२) उजवा हात डाव्या गुडघ्याच्या पलीकडून डाव्या हाताची स्थिती न बदलतात त्याच्या समोर जमिनीवर टेकवा दोन्ही हातांची बोटे एकमेकासमोर न ठेवतात विरुद्ध दिशेला करा व केवळ दोन्ही मनगटे एकमेकांसमोर येऊ द्या दोन्ही हातात साधारणपणे फूटभर तरी अंतर ठेवा

३)उजव्या दंडाच्या आधाराने डाव्या पायाला गुडघ्याजवळ मागे रेटून खांद्याच्या आधाराने मान डावीकडे वळवा दृष्टी पण त्याच दिशेने वळवून स्थिर ठेवा श्वसन संथपणे चालू ठेवा. 

 आसनस्थिती सोडणे

१) मान व दृष्टीसमोर आणा

 २)उजवा  हात जागेवर न्या डाव्या हाताचा पंजा सरळ करा 

३) डावा पाय सरळ करून बैठक स्थितीत  या 

टीप -याचप्रमाणे उजवा पाय उभा करून हे आसन  योग्य ते बदल करुन करा 

आसनस्थिती पहिल्या प्रकारात केवळ खांद्याच्या आधारानेच कणा  पिळला  जात होता ,या प्रकारात खांद्याच्या बरोबर एका हाताने उभा केलेल्या पायाला मागे रेटून  कण्यातील ताण  अधिक वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे.  बाकी सर्व स्थिती पहिल्या प्रकारात वर्णन केल्याप्रमाणेच आहे. 

 कालावधी :

या आसनाचा फायदा मिळण्याकरता याचाही कमीत कमी कालावधी दोन मिनिटांचा आहे अभ्यासाने हा कालावधी सहा मिनिटे पर्यंत वाढवता येतो शरीरांतर्गत परिणाम पहिल्या प्रकारात अनुभवाला येणारे सर्वच परिणाम या प्रकारात अधिक प्रकर्षाने अनुभवायला मिळतात विशेष दक्षता पहिल्या प्रकारात वर्णन केल्याप्रमाणे या आसनाच्या बाबतीत ही काळजी घ्यावी.आपल्याला झेपेल एव्हढाच ताण घेऊन तो सहनशक्तीच्या मर्यादेपर्यंतच सहन केल्यानंतर सावकाश सांगितलेल्या पद्धतीनुसारच आसन सोडावे.  

सूचना :

 पोट आणि कमरेचा आजार असलेल्यांनी योग च‍िकित्सकाचा सल्ला घ्यावा.

पाठीचे दुखणे किंवा हार्नियाचा त्रास असणाऱ्यांनी हे आसन करू नये.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आरोग्य आहार (पौष्टीक लाडू ) 

अळिवाचे लाडू 


साहित्य -

१) नारळ खोवलेले -२

२)५० ग्रॅम अळीव 

३)अर्धे जायफळ किसून 

४) २  वाट्या गूळ चिरून ,अर्धी वाटी साखर 

५)  ५,६ वेलदोड्याची पूड 

कृती : 

अळीव स्वछ करून नारळामध्ये मिसळून जादा बुडाच्या कल्हईच्या पातेल्यात ३-४ तास झाकून ठेवावे. अळीव नारळाच्या ओलसरपणाने फुलून आल्यावर त्यात चिरलेला गूळ व साखर घालावी व  मंद आचेवर शिजायला ठेवावे मधून मधून ढवळावे ,लाडू होत आले की कडेने मिश्रण सुटू लागते. मिश्रण कोमट असतांना तुपाच्या हाताने लाडू वळावेत 



-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------


Post a Comment

0 Comments