बोठेच्या स्टँडिंग वॉरंट वर बुधवारी निकाल

 बोठेच्या स्टँडिंग वॉरंट वर बुधवारी निकाल 

वेब टीम नगर : जरे हत्या कांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्या विरोधात पोलिसांनी दाखल केलेल्या स्टँडिंग वॉरंट अर्जावर बुधवारी निर्णय येण्याची शक्यता पोलीस सुत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे. नववर्षाच्या प्रारंभीच बोठेच्या विरोधात स्टँडिंग वॉरंट साठी पोलिसांकडून अर्ज दाखल करण्यात आला होता त्याच्यावर आज निर्णय आज अपेक्षित होता मात्र आता या अर्जावर बुधवारी निर्णय होणार असल्याचे तपासी पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या कडून समजते .  

३० नोव्हेंबर  सायंकाळी ७ ते ८ च्या दरम्यान रेखा जरे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर ६ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यातील ५ आरोपींकडून मिळालेल्या माहिती नुसार बाळ बोठे हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले आहे.त्यानंतर १ डिसेंबर रोजी बाळ बोथे नजरेआड झाला असून त्याला शोधण्यासाठी पोलिसांची ५ पथके कार्यरत आहेत.मात्र आत्ता पर्यंत पोलिसांनी ४५ ठिकाणी त्याचा शोध घेतला असून बाळ बोठे न सापडल्याने अखेर त्याच्या अटकेसाठी स्टँडिंग वॉरंट करिता  पोलिसांनी पारनेर न्यायालयात हा अर्ज दाखल केला होता.  

या स्टँडिंग वॉरंट नुसार आता देश भरातील कोणताही पोलीस अधिकारी बाळ बोठे च्या नावचे वॉरंट लिहू शकणार आहे तसेच या स्टँडिंग वॉरंटच्या  नियमानुसार बाळ  बोठे याला फरार घोषित करून त्याची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरु होईल. फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ अंतर्गत कलम ७३ नुसार एखाद्या अजामीनपात्र गुन्ह्यात गुन्हेगार फरार असल्यास व अटक कारवाई चुकवत असल्यास त्याच्या विरोधात न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक अधिकारातील कोणत्याही व्यक्ती वॉरंट लिहू शकते. फरार आरोपीला अटक करून स्थानिक पोलिसांच्या हवाली करता येणार आहे. न्यायालयाचे हे वॉरंट राज्यातील सर्व पोलिसांना पाठवण्यात येईल. न्यायालयाचे हे वॉरंट पाठवल्याने फरार आरोपी कुठेही दिसला तरी अटक करणे सोपे होणार आहे. त्याच बरोबर फरार आरोपीचा फोटो आणि माहितीच्या आधारे नागरिकांनाही आवाहन करता येईल. तसेच फौजदारी प्रक्रिया १९७३ अंतर्गत कलम ८२ आणि ८३ नुसार आरोपीच्या मालमत्तेची जप्तीची कारवाई होऊ शकते मात्र त्यापूर्वी कलम ७३ नुसार धोरणाची प्रक्रिया पूर्ण व्हावी लागते. त्यामुळेच या अर्जावर काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.           


Post a Comment

0 Comments