आरोग्य आहार : मलई कोफ्ता

 आरोग्य आहार 

मलई कोफ्ता 

साहित्य : अर्धा किलो बटाटे , पाव किलो पनीर किसून, २ टे स्पून कॉर्नफ्लोअर . ४  मोठे कांदे किसून, ४ मोठे टोमॅटो उकडून सोलून, १ इंच आलं , ५-६ लसूण पाकळ्या वाटून , १ वाटी सायीचे दही, १ टे स्पून खसखस भिजवून वाटून, १ टी स्पून गरम मसाला , १ टी स्पून तिखट , पाव चमचा हळद , मोठ चवीनुसार , १ टी स्पून जिरे, १०० ग्राम फ्रेश क्रीम . 

कृती : उकडलेले बटाटे थोडे गारं असतांनाच मळून घ्यावेत . त्यात किसलेले पनीर घालावे.त्यात.कॉर्नफ्लोअर,मीठ,आले, लसूण मिरपूड व मिरच्या घालून मळावे . मोठ्या आकाराचे गोळे करून तेलात तळून घ्यावेत. 

पातेल्यात तेल गरम करून १ चमचा जिरे व किसलेला कांदा गुलाबी परतला कि, वाटलेली खसखस व एक वाटी सायीचे दही घालून फोडणीत घोटून एकजीव करावे. त्यात चिरलेले टोमॅटो घालावेत.३ वाट्या उकळते पाणी घालावे. उकळी आल्यावर  चवीनुसार मीठ घालावे व उतरवावे. 

वाढण्यापूर्वी रस्सा गरम करून त्यात कोफ्ते घालून बाऊल मध्ये काढावे. वरून फेटलेली फ्रेश क्रीम व चिरलेली बारीक कोथिंबीर घालून गार्निश करावे. 

टीप : 

* कोफ्ते टाळतांना जर फुटत असतील तर १ चमचा कॉर्नफ्लोअर जास्त घालावे . 


* कोफ्ते  रश्श्यात घालून  ठेवल्यास फुटण्याची  व  गरम करता  येत नाही .    

        

Post a Comment

0 Comments